एक्स्प्लोर

Wardha HinganGhat Case : हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी विकेश नगराळे दोषी; फाशी की जन्मठेप? उद्या निकाल

Wardha HinganGhat Case Update : हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील आरोपी विकेश नगराळे याच्यावरील आरोप सिद्ध झाल्यानंतर त्याला दोषी ठरवण्यात आलं आहे.

Wardha HinganGhat Case Update : एकतर्फी प्रेमातून एका शिक्षिकेला जिवंत जाळण्यात आलेलं. हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी न्यायालय आज निकाल दिला आहे. आरोपी विकेश नगराळेनं एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेला पेटवलं होतं, हा गुन्हा न्यायालयात सिद्ध झाला आहे. त्यामुळे न्यायालयानं त्याला दोषी ठरवलं आहे. आज न्यायालयात दोष सिद्ध झाला. उद्या दोन्ही पक्षांच्या युक्तीवादानंतर न्यायालय दोषीच्या शिक्षेवर निर्णय देणार असल्याची माहिती सरकारी वकील उज्वल निकम यांनी दिली आहे. 

एकतर्फी प्रेमातून एका शिक्षिकेला जिवंत जाळण्यात आलेलं. त्या हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी आज न्यायालयात सुनावणी पार पडली. आज आरोपीवरील गुन्हे सिद्ध झाले असून त्याला न्यायालयाच्या वतीनं दोषी ठरवण्यात आलं आहे. उद्या न्यायालय दोषीला शिक्षा सुनावणार असून निकाल देणार आहे. 3 फेब्रुवारी 2020 रोजी आरोपी विकेश नगराळेनं एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेला पेटवलं होतं. 10 फेब्रुवारीला तिचा मृत्यृ झाला होता. या गुन्ह्यात आज दोषी ठरलेल्या विकेशला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे. या प्रकरणी 426 पानांचं दोषारोपपत्र, 64 सुनावणी, 29 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. महत्वाचं म्हणजे, पीडित तरुणीच्या मृत्यूला 2 वर्ष पूर्ण होताना आज हा निकाल दिला जाणार होता. परंतु, आता दोषी विकेशच्या शिक्षेवर उद्या सुनावणी होणार आहे. दरम्यान, प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत सरकारनं विशेष सरकारी वकिल म्हणून उज्वल निकमांची नियुक्ती केली होती.

विशेष म्हणजे 29 साक्षीदारांपैकी एकही साक्षीदार फितूर झालेला नाही. त्यामुळे आरोपीचा दोष सिद्ध करण्याइतपत भक्कम पुरावे असून ते सरकारी पक्षाने न्यायालयापुढे सादर केल्याचे दीपक वैद्य म्हणाले होते. अखेर आज न्यायालयानं पुराव्यांच्या आधारे विकेश नगराळेला दोषी सिद्ध केलं. 

दरम्यान या प्रकरणाचा आरोपी विकेश उर्फ विकी नगराळे यानं न्यायालयात त्याची सुनावणी झाली त्यावेळी आपल्यावरील आरोप खोटे असल्याचं आणि त्यांनी असं कोणतंही जळीत हत्याकांडाचं कृत्य केलं नसल्याचे सांगत आरोप फेटाळले होते. मात्र सरकारी पक्षानं सादर केलेले भक्कम पुरावे लक्षात घेऊन या प्रकरणात न्यायालय योग्य शिक्षा सुनावेल अशी अपेक्षाही दीपक वैद्य यांनी व्यक्त केली आहे. 

3 फेब्रुवारी 2020 रोजी हिंगणघाट येथे दोषी विकेश नगराळेनं एकतर्फी प्रेमातून प्राध्यापिका तरुणीवर पेट्रोल टाकून पेटवलं होतं. यांत गंभीररित्या जखमी झालेल्या पीडित प्राध्यापिका तरुणीचा उपचारादरम्यान 10 फेब्रुवारी 2020 रोजी मृत्यू झाला होता. या जळीतकांड प्रकरणाच्या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली होती. दोषी विकेश नगराळेविरोधात तब्बल 426 पानांचे दोषारोपपत्र हिंगणघाटच्या प्रथम श्रेणी न्यायालयात दाखल केलं होतं. या प्रकरणात आतापर्यंत 29 साक्षीदार तपासण्यात आले आहेत. 

दरम्यान, एका तरुण शिक्षिकेला रस्त्यावर अशा पद्धतीने जिवंत जाळल्या गेल्यामुळे हिंगणघाट आणि ग्रामीण भागात वातावरण मोठ्या प्रमाणावर बदल्याचे मतही अनेक शिक्षिका आणि विद्यार्थिनींनी व्यक्त केले आहे. जळीत हत्याकांडाच्या त्या दुर्दैवी घटनेनंतर महिला आणि मुलींच्या बाबतीत घरातून अनेक बंधनं लादली गेल्याचं त्यांचं मत आहे. एकटे बाहेर जाण्यापासून जास्त वेळ बाहेर राहण्याबद्दल ही निर्बंध असल्याचे महिला शिक्षिका आणि विद्यार्थिनींचे मत आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'चर्चा अंतिम टप्प्यात, संयुक्त सभा होणार, फक्त मुंबईच नाही, तर जेव्हा पहिल्या मेळाव्याची घोषणा होईल तेव्हा..' संजय राऊतांनी सांगितला ठाकरे बंधूंचा मास्टर प्लॅन!
'चर्चा अंतिम टप्प्यात, संयुक्त सभा होणार, फक्त मुंबईच नाही, तर जेव्हा पहिल्या मेळाव्याची घोषणा होईल तेव्हा..' संजय राऊतांनी सांगितला ठाकरे बंधूंचा मास्टर प्लॅन!
Manikrao Kokate Arrest: मोठी बातमी: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना झटका, कोणत्याही क्षणी अटक वॉरंट निघण्याची शक्यता
मोठी बातमी: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना झटका, कोणत्याही क्षणी अटक वॉरंट निघण्याची शक्यता
Pradnya Satav: स्वर्गीय राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा यांचा भाजप प्रवेश ठरला! भाजपकडून काँग्रेसला तगडा धक्का
स्वर्गीय राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा यांचा भाजप प्रवेश ठरला! भाजपकडून काँग्रेसला तगडा धक्का
Maharashtra Local Body Election: महापालिकेसह कोल्हापूर, सांगली साताऱ्यासह 'या' 14 जिल्हा परिषद निवडणुकीचा सुद्धा धुरळा उडणार? नगरपालिकांचा निकाल येताच निर्णयाची शक्यता
महापालिकेसह कोल्हापूर, सांगली साताऱ्यासह 'या' 14 जिल्हा परिषद निवडणुकीचा सुद्धा धुरळा उडणार? नगरपालिकांचा निकाल येताच निर्णयाची शक्यता

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिंदेंची शिवसेना ही अमित शाहांची टेस्ट ट्यूब बेबी, संजय राऊत यांचा घणाघात
Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report
NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर; कुणाला डोकेदुखी? Special Report
Thackeray Brother Alliance : बिगुल वाजलं तरी ठाकरे बंधूंच्या युतीचं नाही ठरलं? Special Report
Chandrapur Farmer :कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी? शेतकऱ्याचा धक्कादायक दावा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'चर्चा अंतिम टप्प्यात, संयुक्त सभा होणार, फक्त मुंबईच नाही, तर जेव्हा पहिल्या मेळाव्याची घोषणा होईल तेव्हा..' संजय राऊतांनी सांगितला ठाकरे बंधूंचा मास्टर प्लॅन!
'चर्चा अंतिम टप्प्यात, संयुक्त सभा होणार, फक्त मुंबईच नाही, तर जेव्हा पहिल्या मेळाव्याची घोषणा होईल तेव्हा..' संजय राऊतांनी सांगितला ठाकरे बंधूंचा मास्टर प्लॅन!
Manikrao Kokate Arrest: मोठी बातमी: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना झटका, कोणत्याही क्षणी अटक वॉरंट निघण्याची शक्यता
मोठी बातमी: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना झटका, कोणत्याही क्षणी अटक वॉरंट निघण्याची शक्यता
Pradnya Satav: स्वर्गीय राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा यांचा भाजप प्रवेश ठरला! भाजपकडून काँग्रेसला तगडा धक्का
स्वर्गीय राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा यांचा भाजप प्रवेश ठरला! भाजपकडून काँग्रेसला तगडा धक्का
Maharashtra Local Body Election: महापालिकेसह कोल्हापूर, सांगली साताऱ्यासह 'या' 14 जिल्हा परिषद निवडणुकीचा सुद्धा धुरळा उडणार? नगरपालिकांचा निकाल येताच निर्णयाची शक्यता
महापालिकेसह कोल्हापूर, सांगली साताऱ्यासह 'या' 14 जिल्हा परिषद निवडणुकीचा सुद्धा धुरळा उडणार? नगरपालिकांचा निकाल येताच निर्णयाची शक्यता
Buldhana : पोक्सोसारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी शिक्षिकेला वर्षभर फुकटचा पगार; गटशिक्षण अधिकाऱ्याचे स्वयंघोषित नियम, बुलढाण्यात जनतेच्या पैशांची उधळपट्टी
पोक्सो सारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी शिक्षिकेला वर्षभर फुकटचा पगार; गटशिक्षण अधिकाऱ्याचे स्वयंघोषित नियम, बुलढाण्यात जनतेच्या पैशांची सर्रास उधळपट्टी
Zaira Wasim: 'बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी माफी मागावी...', 'त्या' व्हिडीओवर दंगल गर्ल संतापली, थेट पोस्ट करुन म्हणाली...
'बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी माफी मागावी...', 'त्या' व्हिडीओवर दंगल गर्ल संतापली, थेट पोस्ट करुन म्हणाली...
Yamuna Expressway Accident: आईच ती! गळ्यात काचेचा तुकडा घुसला, रक्तबंबाळ झाली तरी जळत्या बसची खिडकी फोडून दोन्ही मुलांना बाहेर काढलं अन्...; मातेचा आगीत होरपळून मृत्यू
आईच ती! गळ्यात काचेचा तुकडा घुसला, रक्तबंबाळ झाली तरी जळत्या बसची खिडकी फोडून दोन्ही मुलांना बाहेर काढलं अन्...; मातेचा आगीत होरपळून मृत्यू
Ambernath Crime News: अंबरनाथ गोळीबारानं हादरलं! भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर फायरिंग, मध्यरात्री दुचाकीवरून दोघे आले अन्....घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
अंबरनाथ गोळीबारानं हादरलं! भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर फायरिंग, मध्यरात्री दुचाकीवरून दोघे आले अन्....घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
Embed widget