एक्स्प्लोर

हनुमानाने उध्दव ठाकरेंना जागा दाखविली, आता सतरंजी उचलायलाही कार्यकर्ता शिल्लक नाही - नवनीत राणा

मुंबई महापालिकेत उध्दव ठाकरेंचा सर्वनाश होणार - नवनीत राणा हनुमानाने उध्दव ठाकरेंना त्यांची जागा दाखविली..हो आम्ही मोदीजींचे फक्त...त्याचा आम्हाला अभिमान आहे

Uddhav Thackeray : आमदार रवी राणा व खासदार नवनीत राण माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नसल्याचं पाहायला मिळाले. जळगावमध्ये  एका कार्यक्रमात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. आम्हाला तुरुंगामध्ये टाकणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्याकडे आता सतरंजी उचलायला ही कार्यकर्ता शिल्लक नाही, अशी टीका राणा दाम्पत्यांनी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.  जळगाव शहरातील महाराणा प्रताप गणेश मंडळात आज खासदार नवनीत राणा व त्यांचे पती रवी राणा दाम्पत्याचा हनुमान चाळीसा पठणाचा कार्यक्रम झाला. यापूर्वी राणा दाम्पत्यांनी मंडळाच्या बाप्पाचं दर्शन घेत आरती केली. त्यानंतर हनुमान चाळीसा पठण केलं. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती असल्याचे पहायला मिळालं. नागरिकांनी राणा दाम्पत्यांच्या पाठोपाठ हनुमान चालीसा पठण केल्याचं पहायला मिळालं.

खासदार नवनीत राणा व त्यांचे पती रवी राणा यांची जळगावमध्ये खुल्या जीपमधून भव्य अशी रॅली काढण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या या रॅलीत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आल्याचंही पहायला मिळालं. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. हनुमान चालीस पठणापूर्वी राणा दाम्पत्याचे नगरसेवक कैलास सोनवणे व महाराणा प्रताप गणेश मित्र मंडळाच्या वतीने भव्य असा पुष्पहार अपर्ण करत स्वागत करण्यात आल्याचं पहायला मिळालं. हनुमान चालीसा पठणापूर्वी राणा दाम्पत्याने भाषणातून उध्दव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केल्याचं पहायला मिळालं. हनुमान चालीस पठणाचे आव्हान दिल्यानंतर ठाकरे सरकारने आम्हाला तुरुंगामध्ये टाकले. कसाबप्रमाणे आम्हाला वागणूक दिली, असे म्हणत उध्दव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं.  

सतरंजी उचलणाराही कार्यकर्ता उध्दव ठाकरेंकडे उरला नाही -
आमदार रवी राणा यांच्या भाषणातून त्यांच्यासोबत घडलेला प्रसंग कथन केला. सत्तेचा दुरूपयोग करण्यात येवून मला माझ्या पत्नीला त्रास देण्यात आला.  मला त्रास दिला असता तर चालले असते, पण महिलेचा आदर करणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंचे पूत्र उध्दव ठाकरेंनी महिलेचा अपमान केला. आमच्यासोबत जे घडलं, त्यांची शिक्षा उध्दव ठाकरेंना मिळाली आहे. आमच्यासाठी सतरंजी टाकली नाही, ज्याच्याकडे सतरंजी उचलायला सुध्दा कार्यकर्ता उरला नाही. चालीसा पठण केली नाही. अन् चाळीस आमदार बाहेर पडले, अशी जोरदार टीका रवी राणा यांनी केली..

उत्साहाच्या भरात रवी राणा.. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणाले..
आमदार रवी राणा उत्साहाच्या भरात भाषण करताना देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणाले. गेल्या अडीच वर्षांच्या काळात शेतकऱ्यांना मोठ्या अडचणी आणि त्रास सहन करावा लागला, मात्र उध्दव ठाकरेंनी लक्ष दिले नाही. आता महाराष्ट्रात जे सरकार आलं आहे, यातील देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने श्रेष्ठ सक्षम आणि मजबूत मुख्यमंत्री या महाराष्ट्राला मिळाला आहे. उध्दव ठाकरे जेवढे अडीच वर्षात फिरले नाही, तेवढे आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महिनाभरात फिरल्याचे रवी राणा म्हणाले. यावेळी उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करतांना रवी राणा यांनी फडवणीस हे उपमुख्यमंत्री असल्याचा विसर पडल्याचे पहायला मिळाले. 

हो आम्ही मोदीजींचे फक्त...त्याचा आम्हाला अभिमान आहे- नवनीत राणा
आम्ही मोदींचे भक्त आहोत, आम्हाला त्यांचा अभिमान आहे, असं सांगत नवनीत राणा यांनी मोदींवर स्तुतीसुमनं उधळल्याचं पहायला मिळालं. सर्व जण आपल्या कुटुंबासाठी करतात, मात्र मोदींजींना कुटूंब नाही, संपूर्ण भारत देश त्यांच कुटूंब आहे.  देशातील सर्व जनतेची ते सेवा करत असल्याचे नवनीत राणा म्हणाल्या. म्हणून आम्ही मोदी यांचे भक्त असल्याचे नवनीत राणा यांनी स्पष्ट केलं.  हनुमान चालीसातून मला खूप शिकायला मिळाले. महाराष्ट्राचे संकट दूर होण्यासाठी हनुमान चालीस पठण करावं एवढीच विनंती उध्दव ठाकरेंकडे केली, पण त्याचा उलटच त्रास झाला. मात्र मी मुंबईची मुलगी आहे,  आणि विदर्भाची सून आहे, कमजोर नाही. तुम्ही उध्दव ठाकरे आहेत, तर मी पण नवनीत  राणा आहे. तुम्ही शिवसेनेचे असाल तर मी पण विदर्भाची सून आहे, आमना सामना तर लवकरच होईलच व त्यात कळेल की कोण किती मजबूत आहे, ते असे म्हणत नवनीत राणा यांनी उध्दव ठाकरेंना आव्हान दिलं.

हनुमानाने उध्दव ठाकरेंना त्यांची जागा दाखविली..
जेलमधून बाहेर पडल्यावर मी तुटून जाईन असं उध्दव ठाकरेंना वाटलं होतं, मात्र मी आणखी मजबूत झाले. जेलमध्ये सुध्दा हनुमान चालीस पठण केली, यावेळी हनुमानाला म्हटलं होतं की, माझी भक्ती खरी असेल तर उध्दव ठाकरेंना त्यांची जागा दाखव आणि आज हनुमानाने उध्दव ठाकरेंना त्यांची जागा दाखविली. आता घरात उभ राहायला सुध्दा कार्यकर्ता उरला नाही असे म्हणत नवनीत राणा यांची उध्दव ठाकरेंचा जोरदार समाचार घेतला.

मुंबई महापालिकेत उध्दव ठाकरेंचा सर्वनाश होणार- नवनीत राणा 
विरोधकांना कुठलीही काम उरलं नाही, त्यांना आधीही काम नव्हतं, आता अमित शाह मुंबईमध्ये आलेले आहेत, त्यामुळे मुंबईचं काही ना काही तरी चांगलं होईल, असेही नवनीत राणा म्हणाल्या. यावेळी मुंबई महापालिकेत यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या पीढीचं भल केलं असं म्हणत नवनीत राणा यांनी नाव न घेता उध्दव ठाकरेंवर निशाना साधला. यावेळी लोकांच्या हिताची सरकार मुंबई महापालिकेत आली पाहिजे, आणि त्यासाठी जोमाने लढणार असल्याचेही राणा म्हणाल्या. जे दोन पिढ्यांपासून मुंबईला खाण्याचं काम करताहेत, त्या उध्दव ठाकरेंचा यावेळी सर्वनाश होणार असंही यावेळी नवनीत राणा म्हणाल्या.  आम्ही दोन्ही अपक्ष आमदार आणि खासदार म्हणून काम करत आहोत. पण मोदी यांचे जे विकासाचे मुद्दे आहेत, त्यामुळे आम्ही त्यांचे फॅन असल्याचे नवनीत राणा म्हणाल्या. वक्तव्यांमध्ये विरोधाभास दिसत असल्याचे विचारले असता, आम्ही जनतेच्या बाजूने आहे, आणि त्यांच्यासाठी काम करत असल्याचे म्हणत नवनीत राणा यांनी उत्तर देण टाळलं.

दसरा मेळाव्यावर काय म्हणाल्या?
हिंदू विचारधारेच्या प्रत्येक व्यक्तीचा दसरा मेळावा आहे, त्यामुळे एकाने तो साजरा करावा असं नाही. तुम्हीच दसरा मेळावा साजरा करा असं कुठेही लिहीलेले नाही, अस म्हणत नवनीत राणा यांनी उध्दव ठाकरेंना टोला लगावला. एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेवून चालण्याचे काम करत आहे, त्यामुळे एकनाथ शिंदेंचे भाषण त्या मैदानात दसरा मेळाव्यात झालं पाहिजे अशी माझी अपेक्षा असल्याचेही नवनीत राणा म्हणाल्या. 

भ्रष्टाचाराचा जो अड्डा आहे त्या अड्डयात खडसे सामील हे योग्य नाही- आमदार रवी राणा
मी त्यांच्यासोबत काम केलं आहे, त्यामुळे वारंवार माझ्या तोंडून फडणवीस हे मुख्यमंत्री असल्यांचे आले. भाषणात झालेली चूक सुधारत आमदार रवी राणा यांनी देवेंद्र फडणवीस हे आज उपमुख्यमंत्री आहेत, मात्र मुख्यमंत्री कसा असावा हे देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला दाखवून दिलं असल्याचेही सांगितले. तसेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे दोन्ही सक्षम असून ते महाराष्ट्राला पुढे नेतील असेही रवी राणा म्हणाले. एकनाथ खडसे विरोधात असल्याचे विचारल्यावर रवी राणा म्हणाले की, एकनाथ खडसेंना भाजपने खूप दिले, त्यांनी भाजपात असताना अनेक पदे भोगली मात्र यानंतरही ते का विरोधात गेले ते माहित नाही. मात्र ते भ्रष्टाचाराचा जो अड्डा आहे त्या अड्डयात ते सामील झाले आहेत, असे म्हणत रवी राणा यांनी उध्दव ठाकरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायला नराधमाला बायकोनेच मदत केली, कल्याण अत्याचार प्रकरणात धक्कादायक माहिती
मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायला नराधमाला बायकोनेच मदत केली, कल्याण अत्याचार प्रकरणात धक्कादायक माहिती
आरोपीच्या गर्लफ्रेंडचा नाशिकमध्ये फ्लॅट, अजितदादांनी बीडचं पालकमंत्रीपद घेऊन संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा: बजरंग सोनावणे
आरोपीच्या गर्लफ्रेंडचा नाशिकमध्ये फ्लॅट, अजितदादांनी बीडचं पालकमंत्रीपद घेऊन संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा: बजरंग सोनावणे
MSSC : महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेतून तगडा परतावा, 2 लाखांची गुंतवणूक केल्यास किती पैसे मिळणार? योजनेच्या नियम अटी काय?
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेतून दमदार परतावा, 2 लाखांची गुंतवणूक केल्यास किती पैसे मिळणार?
मद्यधुंद कारचालकाचा ताबा सुटला, पुण्यात पुन्हा भीषण अपघात, 9 वाहनांना जोरदार धडक
मद्यधुंद कारचालकाचा ताबा सुटला, पुण्यात पुन्हा भीषण अपघात, 9 वाहनांना जोरदार धडक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 | सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 25 December 2024 ABP MajhaBuldhana Lonar Lake Update : लोणार सरोवराचं नुकसान होत असल्याच्या बातमीची जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल, भूस्खलन होत असलेल्या भागाची पाहणी होणारNDA Meeting Update : एनडीएच्या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रतिनिधी जाण्याची शक्यता कमी, अजित पवार मुंबईत असल्याची सूत्रांची माहितीABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 25 December 2024 सकाळी ११ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायला नराधमाला बायकोनेच मदत केली, कल्याण अत्याचार प्रकरणात धक्कादायक माहिती
मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायला नराधमाला बायकोनेच मदत केली, कल्याण अत्याचार प्रकरणात धक्कादायक माहिती
आरोपीच्या गर्लफ्रेंडचा नाशिकमध्ये फ्लॅट, अजितदादांनी बीडचं पालकमंत्रीपद घेऊन संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा: बजरंग सोनावणे
आरोपीच्या गर्लफ्रेंडचा नाशिकमध्ये फ्लॅट, अजितदादांनी बीडचं पालकमंत्रीपद घेऊन संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा: बजरंग सोनावणे
MSSC : महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेतून तगडा परतावा, 2 लाखांची गुंतवणूक केल्यास किती पैसे मिळणार? योजनेच्या नियम अटी काय?
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेतून दमदार परतावा, 2 लाखांची गुंतवणूक केल्यास किती पैसे मिळणार?
मद्यधुंद कारचालकाचा ताबा सुटला, पुण्यात पुन्हा भीषण अपघात, 9 वाहनांना जोरदार धडक
मद्यधुंद कारचालकाचा ताबा सुटला, पुण्यात पुन्हा भीषण अपघात, 9 वाहनांना जोरदार धडक
Ladki Bahin Yojana : पहिल्या दिवशी किती लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले? नवीन नोंदणीबाबत अदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या?
पहिल्या दिवशी किती लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले? नवीन नोंदणीबाबत अदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या?
Ajit Pawar: अंथरुण पाहून पाय पसरा! योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर भार, अजित पवारांकडून अर्थखात्याच्या अधिकाऱ्यांना खास सूचना
अंथरुण पाहून पाय पसरा! योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर भार, अजित पवारांकडून अर्थखात्याच्या अधिकाऱ्यांना खास सूचना
लक्झरी बस आणि ट्रकची धडक, एक ठार, 15-20 जखमी; पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात
लक्झरी बस आणि ट्रकची धडक, एक ठार, 15-20 जखमी; पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात
तुळजाभवानीचं दर्शन आता 22 तास राहणार खुले, प्रक्षाळ पुजेनंतर मंदिर होणार भाविकांसाठी बंद, प्रशासनाचे आदेश
तुळजाभवानीचं दर्शन आता 22 तास राहणार खुले, प्रक्षाळ पुजेनंतर मंदिर होणार भाविकांसाठी बंद, प्रशासनाचे आदेश
Embed widget