एक्स्प्लोर

Naval Bajaj is New ATS Chief: नवल बजाज महाराष्ट्राचे नवे ATS प्रमुख!

Naval Bajaj is New ATS Chief: राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाच्या प्रमुखपदी आज अपर पोलीस महासंचालक नवल बजाज यांची नियुक्ती करण्यात आली.

Naval Bajaj Appointed As Maharashtra New ATS Chief : मुंबई : वरिष्ठ पोलीस अधिकारी नवल बजाज (Naval Bajaj) यांची महाराष्ट्र पोलीस दहशतवाद विरोधी पथकाच्या (ATS) प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सदानंद दाते (Sadanand Date) यांची राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) महासंचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर गेल्या तीन महिन्यांपासून महाराष्ट्र एटीएस प्रमुखाचं पद रिक्त होतं. त्यामुळे एटीएस प्रमुखपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होतं. अखेर नवल बजाज यांची या पदावर नियुक्ती करण्याचे आदेश बुधवारी गृहविभागानं जारी केले होते. 

नवल बजाज सीबीआयमध्ये सहसंचालक म्हणून कार्यरत होते आणि कोळसा घोटाळ्यासारख्या महत्त्वाच्या प्रकरणांच्या तपासात ते सहभागी होते. 1995 च्या बॅचचे पोलीस अधिकारी नवल बजाज केंद्रात प्रतिनियुक्तीवर होते. ते केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) चे संयुक्त संचालक होते. यापूर्वी बजाज केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे महानिरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी राज्याच्या आर्थिक गुन्हे शाखेत अतिरिक्त महासंचालक म्हणूनही काम केलं आहे.

नवल बजाज यांनी केलेली कोळसा घोटाळ्याची चौकशी 

नवल बजाज यांनी सीबीआयमध्ये सहसंचालक असताना कोळसा घोटाळ्याची चौकशी केली होती. त्यानंतर त्यांना पुन्हा महाराष्ट्रात पाठवण्यात आलं. लोकसभेच्या आचारसंहितेमुळे त्यांची नियुक्ती झालेली नाही. आता अखेर त्यांची एटीएसच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बजाज हे दहशतवाद विरोधी पथकाच्या प्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारणार आहेत. एटीएस ही पोलीस दलाची विशेष शाखा आहे. ज्यामुळे देशातील दहशतवादी कारवाया थांबतात. एटीएस अधिकारी प्रत्येक परिस्थितीत दहशतवादी हल्ल्यांचा मुकाबला करण्यात तज्ज्ञ असतात.

सीबीआयमध्ये सहसंचालक म्हणून कोळसा घोटळ्याचा तपास नवल बजाज यांनी केला होता. त्यानंतर त्यांना पुन्हा महाराष्ट्रात परत पाठवण्यात आले होते. लोकसभेच्या आचारसंहितेमुळे त्यांना नियुक्ती मिळाली नव्हती. अखेर त्यांची एटीएसच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई हल्ल्यात ATS नं दहशतवाद्यांशी केलेला मुकाबला

सदानंद दाते यांनी 26/11 च्या मुंबई हल्ल्यात दहशतवाद्यांशी लढा दिला होता आणि आपल्या शौर्यानं अनेकांचे प्राण वाचवले. ते महाराष्ट्रातील मीरा भाईंदर, वसई विरारचे पोलीस आयुक्तही राहिले आहेत. याशिवाय त्यांनी सीआरपीएफमध्ये आयजी पदही भूषवलं आहे. त महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील रहिवासी आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

और एक फायनल...एक कप की और
और एक फायनल...एक कप की और
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये ''घरवापसीची पे चर्चा''
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये ''घरवापसीची पे चर्चा''
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
और एक फायनल...एक कप की और
और एक फायनल...एक कप की और
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये ''घरवापसीची पे चर्चा''
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये ''घरवापसीची पे चर्चा''
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Maharashtra Budget 2024 : अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
Maharashtra Budget 2024 :  कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
विधानसभा निवडणुकीच्या तयारीली वेग, निवडणूक आयोग लागले कामाला
विधानसभा निवडणुकीच्या तयारीली वेग, निवडणूक आयोग लागले कामाला
Embed widget