एक्स्प्लोर
'विग घालून उंची वाढवणाऱ्या परीक्षार्थीचा व्हिडिओ व्हायरल का केला?'
नाशिक : पोलिस भरती दरम्यान उंची वाढवण्यासाठी विग घालणाऱ्या परीक्षार्थीचा व्हिडिओ व्हायरल करुन पोलिसांनी चूक केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. नाशिकमध्ये पोलिस भरती दरम्यान उंची वाढवण्यासाठी विचित्र शक्कल लढवणाऱ्या परीक्षार्थीचा व्हिडिओ खुद्द पोलिसांनीच व्हायरल केला होता.
नोकरीसाठी हतबल असलेल्या मुलाकडून झालेला प्रकार हा गुन्हा आहे, मात्र त्याची अपप्रसिद्धी करुन त्याची बदनामी करणेही अयोग्य असल्याच्या प्रतिक्रिया सर्व स्तरात उमटत आहेत.
दोन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये झालेल्या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये एका तरुणाने सर्व परीक्षा पार पाडल्या. पण मुळातच उंची कमी असल्यानं आपण पास होणार नाही, या विचाराने एका तरुणाने विग घालून उंची वाढवण्याचा प्रयत्न केला.
एका पोलीस कर्मचाऱ्याला हा प्रकार लक्षात आला, तेव्हा पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी या तरुणाचा व्हिडिओ तयार करुन व्हायरल केला.
खरं तर त्याच्यावर रितसर कारवाई करुन त्याला सोडलं असतं, तरी चाललं असतं. पण पोलिसांनी त्याची बदनामी करुन चूक केल्याचा ठपका सामाजिक कार्यकर्त्यांनी ठेवला आहे. या उलट नोकरीसाठी असा प्रकार करण्याची वेळ त्या तरुणावर का आली? याचा विचार समाज म्हणून आपण करण्याची आज गरज आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement