एक्स्प्लोर
मूर्तीदान उपक्रमाला नाशिककरांचा भरघोस प्रतिसाद
नाशिक: नदी प्रदूषण रोखून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गणपती मूर्ती आणि निर्माल्य दान करण्याचा नाशिक पॅटर्न राज्य आणि देशभरात नावाजला आहे.
सालाबादाप्रमाणे यंदाही नाशिककरांच्या गणपती मूर्ती आणि निर्माल्य दान करण्याच्या मोहिमेला उस्फूर्त प्रतिसाद मिळतोय.
गणपतींचं नदीत विसर्जन करण्याऐवजी त्या मूर्ती सामाजिक संस्थांना, महापालिकेला दान करण्याकडे नाशिककरांचा कल असल्याचं पाहायला मिळतंय.
या मोहिमेच्या सुरुवातीला साधारण 10 वर्षापूर्वी फक्त 100 गणपती मूर्ती दान झाल्या होत्या. मात्र प्रबोधन आणि त्याला नाशिककरांनी प्रतिसाद दिल्याने दरवर्षी ही संख्या वाढत गेली.
गेल्या वर्षी तब्बल 2 लाख 71 हजार गणेशमूर्ती आणि शेकडो टन निर्माल्य नाशिककरांनी दान केलं होतं. यंदाही या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी नाशिक महापालिकेसह स्वयंसेवी संस्था सज्ज झाल्या आहेत. 59 विसर्जनस्थळांजवळ ही मोहिम राबवण्यात येतेय.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement