Nashik Corona Restrictions : नाशकात बाजारपेठेत खरेदीसाठी आकारणार 5 रुपयांचं शुल्क, गर्दी टाळण्यासाठी महापालिकेची नामी शक्कल
नाशिक शहर सध्या कोरोनाचा हॉटस्पॉट बनलं आहे. अशातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी आता नाशिक शहर पोलीस आणि महापालिकेने अनोखी शक्कल लढवली आहे. आता नाशिककरांना बाजारात खरेदीसाठी जायचे असेल तर प्रतितास 5 रुपये शुल्क महापालिकेकडून आकारण्यात येणार आहे.
नाशिक : सध्या राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. नाशिकमध्येही कोरोना बाधितांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी आता नाशिक शहर पोलीस आणि महापालिकेने अनोखी शक्कल लढवली आहे. बाजारात खरेदीसाठी जायचे असेल तर प्रतितास 5 रुपये शुल्क महापालिकेकडून आकारण्यात येणार आहे. जर एक तास उलटूनही तुमची खरेदी सुरु असेल तर 500 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.
नाशिक शहर सध्या कोरोनाचा हॉटस्पॉट बनलं आहे. विशेष म्हणजे प्रशासनाने अनेक निर्बंध लागू केले तरी नागरिकांकडून कोरोना नियमांचे पालन होत नसल्याने बाजारपेठांमधील गर्दी टाळण्यासाठी आता पोलीस आणि महापालिकेने एक अनोखी शक्कल लढवली आहे. बाजारात खरेदीसाठी जायचे असेल तर प्रतितास 5 रुपये शुल्क महापालिकेकडून आकारले जाणार आहेत आणि एक तास उलटूनही तुमची खरेदी सुरु असेल तर 500 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 43 अंतर्गत ही कारवाई सुरु करण्यात आली आहे. सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत बाजारपेठेत प्रवेश करता येणार आहे, बाजारपेठांना बॅरिकेटिंग केले जाऊन त्या पोलिसांकडून सील केल्या जातात. चेक पॉईंटवरच चेक ईन टाईमिंग लिहीलेली 5 रुपयांची पावती दिली जाते, बाजारातून निघताच वेळ तपासली जाते. बाजारपेठेत पोलिसांची पायी गस्त सुरु राहणार असून कोरोना नियम न पाळणारे नागरिक आणि व्यावसायिकांवर वॉच ठेवला जात आहे.
विशेष म्हणजे पावतीच्या माध्यमातून जमा होणारा खर्च बाजारपेठा सील करण्यासाठी जो खर्च येईल त्यासाठी वापरला जाणार असल्याचं पोलिसांच्या आदेशात नमूद करण्यात आलं आहे. 15 तारखेपर्यंत हा आदेश लागू राहणार असून सर्व शॉपींग मॉल्स, भाजी आणि फळ मार्केट, कपड्यांची बाजारपेठ, आठवडी बाजार आणि मुख्य बाजारपेठांमध्ये हा अनोखा पॅटर्न राबवण्यात येत असून याला नागरिकांचा मात्र विरोध होतांना बघायला मिळतोय.
15 तारखेपर्यंत हा आदेश लागू राहणार असून सर्व शॉपींग मॉल्स, भाजी आणि फळे मार्केट, कपड्यांची बाजारपेठ, आठवडे बाजार आणि मुख्य बाजारपेठांमध्ये हा अनोखा पॅटर्न राबवण्यात येत असून व्यावसायिकांकडून या कारवाईचे स्वागत करण्यात येते आहे मात्र नागरिकांचा या कारवाईला विरोध होतांना दिसून येत आहे.
पावतीच्या माध्यमातून जमा होणारा पैसा बाजारपेठा सील करण्यासाठी जो खर्च येईल त्यासाठी वापरात येणार आहे असं पोलिसांच्या आदेशात नमूद करण्यात आलं आहे. या कारवाईमुळे आज तरी बाजारपेठेतील गर्दीमध्ये फार काही फरक पडलेला दिसून येत नसून नागरिकांकडून या कारवाईकडे एक लुटीचे साधन म्हणून बघितले जाते आहे त्यामुळे पोलिस आणि महापालिकेकडून सुरु करण्यात आलेली ही कारवाई कितपत यशस्वी ठरेल हा प्रश्नच आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Coronavirus Update : राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय वापरासाठी 80 टक्के ऑक्सिजन पुरवठा बंधनकारक
- BMC Guidelines | कोरोनाचा वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून गाईडलाईन्स जारी
- राज्यात लॉकडाऊन लागणार का? आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणतात...
- उद्धवजी अडचण अशी आहे की... ; आनंद महिंद्रांकडून लॉकडाऊनच्या मुद्द्यावर ठाकरे सरकारला महत्त्वाचा सल्ला
- कोरोना रुग्णांना बेड मिळाला नाही, तर थेट मला फोन करा, मी बेड देईनच : महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल