एक्स्प्लोर

Nashik : गणेशोत्सवात यंदाही डीजे वाजवण्यास बंदीच, नाशिक पोलीसांचा गणेश मंडळांना सूचना; अशी आहे नियमावली 

Nashik Ganeshotsav : यंदाचा गणेशोत्सव (Ganeshotsav 2023) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून यासाठी मंडळाकडून जय्यत तयारी सुरु झाली आहे.

नाशिक : गणेशोत्सव (Ganeshotsav 2023) साजरा करतांना ध्वनी मर्यादा आणि शासन नियमांचे पालन करणे अनिवार्य असल्याचे सांगून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार डीजे वापर करण्यास बंद आहे. यामुळे डीजेचा (DJ) वापर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना करता येणार नाही. तसेच शासनाच्या नियमांचे पालन करणाऱ्या उत्कृष्ट मंडळाला प्रथम क्रमांकाचे 5 लाखांचे बक्षिस देण्यात येणार आहे. यंदाचा गणेशोत्सव सालाबादाप्रमाणे शांततेत पार पाडावा, असे आवाहन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे (Ankush Shinde) यांनी केले.  

यंदाचा गणेशोत्सव (Ganeshotsav 2023) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून यासाठी मंडळाकडून जय्यत तयारी सुरु झाली आहे. यासाठी परवानगी, मंडप उभारणी, डेकोरेशन आदीसंह इतर कामकाजांना सुरुवात झाली आहे. तत्पूर्वी पोलिसांनी महत्वपूर्ण सूचना गणेश मंडळांना दिल्या आहेत. नाशिक पोलिस आयुक्तालयात झालेल्या गणेशमंडळ आणि शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मंडप उभारताना वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, मौल्यवान मंडळांनी सुरक्षा रक्षक नियुक्त करावे, आरासमध्ये धार्मिक भावना दुखावणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, गणेश मंडळांनी पोलिस आणि मनपाच्या नियमांचे पालन करावे, असा सूचना देण्यात आल्या आहेत. उत्सव सर्वांचा असून शांततेत पार पाडण्याकरिता सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे आवाहन आयुक्त शिंदेंनी केले. 

दरम्यान यंदाही गणेशोत्सव आरास स्पर्धा (Ganeshotsav Competition) आयोजित करण्यात आल्या असून यात 'पर्यावरणपूरक सजावट, ध्वनि प्रदूषण विरहित उत्सव, पाणी वाचवा, अंधश्रद्धा निर्मूलन, मुलगी वाचवा अभियान, सामाजिक सलोखा देखावे, स्वातंत्र्य चळवळ, शिवाजी महाराज राज्याभिषेक सजावट, रक्तदान शिबिरांचे आयोजन, सेंद्रीय शेती आदी देखावे सादर करणाऱ्या मंडळांना प्रथम बक्षीस 5  लाख रुपये, द्वितीय 2 लाख 50 हजार, तृतीय 1 लाख तसेच 41 मंडळांना 25  हजारांचे बक्षीस दिले जाणार आहे. त्यामुळे गणेश मंडळांनी नियम पाळल्यास बक्षिसे देखील मिळणार आहेत. त्यामुळे अनेक गणेश मंडळांचा स्पर्धेसाठी चांगली आरास बनविण्याकडे कल असणार आहे. 

गणेश मंडळांना ऑनलाईन परवानगी 

नाशिक महापालिका (Nashik NMC) आणि पोलिसांनी ऑनलाईन परवानगी देण्याची सोय केली आहे. महापालिकेने केलेल्या पोर्टलवर 24 तास ते दोन दिवसात मंडळांना परवानगी दिली जात आहे. मंडळांनी सर्व आवश्यकता कागदपत्रांसह अर्ज केल्यास त्यांना परवानगी दिली जाणार आहे. त्याचबरोबर ध्वनी व वायू प्रदूषण तसेच सार्वजनिक वाहतूक तिला अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन मंडळांना केले आहे. उत्सव सुरू होण्यापूर्वी सात दिवस अगोदरपर्यंतच महापालिका ऑनलाईन परवानगी देणार आहे. त्यासाठी अर्जदारांनी अर्ज मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची यादी मंडपाचा नकाशा पोलिसांची परवानगी वाहतूक पोलिसांची सहमती अग्निशमन दलाचा दाखला या गोष्टींची पूर्तता करणे अनिवार्य करण्यात आली आहे

इतर महत्वाची बातमी : 

Pune Ganeshotsav 2023 : मंडपाची अन् गणशेमूर्तीची उंची किती असावी?, गणेश मंडळांसाठी महापालिकेची नियमावली जाहीर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget