एक्स्प्लोर
शालेय साहित्य मागणाऱ्या मुलीला दारुड्या बापाने विष पाजलं
नाशकातील शेतकऱ्याकडे मुलीने अभ्यासाची पुस्तकं विकत घेण्यासाठी पैसे मागितले. मात्र याचा राग आल्यामुळे त्याने मारहाण करत मुलीला घरातील कीटकनाशक पाजलं.

प्रातिनिधीक फोटो
नाशिक : मुलीने शालेय साहित्याची मागणी केल्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्याने तिला विष पाजल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये समोर आला आहे. दारुच्या नशेत आरोपी पंढरीनाथ बोराडेने मुलीला कीटकनाशक पाजल्याची माहिती आहे.
सहाव्या इयत्तेत शिकणाऱ्या संबंधित मुलीने शालेय साहित्य विकत घेण्यासाठी काही पैशांची मागणी केली. मात्र दारुड्या पित्याला या गोष्टीचा राग आल्यामुळे त्याने थेट मुलीचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. नाशिकमधील शिंदे गावात शुक्रवारी रात्री हा प्रकार घडला.
आरोपीचा मुलीच्या शिक्षणाला विरोध होता. शुक्रवारी रात्री पंढरीनाथ बोराडे दारु पिऊन घरी आल्यानंतर मुलीने त्याच्याकडे अभ्यासाची पुस्तकं विकत घेण्यासाठी पैसे मागितले. मात्र याचा राग आल्यामुळे त्याने मारहाण करत मुलीला घरातील कीटकनाशक पाजल्याची माहिती आहे.
मुलीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. धाकट्या मुलाने वडिलांविरोधात पोलिसात तक्रार दिल्यानंतर या घटनेला वाचा फुटली. त्यानंतर वडील पंढरीनाथ बोराडेला नाशिक रोड पोलिसांनी अटक केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
