नाशिक जिल्ह्यातील कार्यकारी सोसायटीच्या सभासदांवर बरखास्तीची टांगती तलवार; 514 संस्थांवर जिल्हा बँकेकडून कारवाईसंदर्भात हालचाली
Nashik : नाशिक जिल्हा बँकेत (District Bank) विविध कार्यकारी सोसायटीवर प्रशासक नेमण्याच्या निर्णयाच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.

Nashik : नाशिक जिल्हा बँकेत (District Bank) विविध कार्यकारी सोसायटीवर प्रशासक नेमण्याच्या निर्णयाच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. नाशिक जिल्हा बँकेकडून वसुलीसाठी विविध कार्यकारी सोसायटीकडून लक्ष करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. शेतकऱ्यांकडून वसुली, जप्ती आणि लिलाव कारवाईनंतर थेट पंच कमिटीवर कायदेशीर पडताळणीनंतर कठोर कारवाई करणार असणार असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील विविध कार्यकारी सोसायटीच्या सभासदांवर बरखास्ततीची टांगती तलवार असणार आहे. अशातच जिल्ह्यात 514 संस्थांवर जिल्हा बँकेकडून कारवाई करण्यासाठी हालचाली सुरू झाल्याचे बघायला मिळत आहे.
विविध कार्यकारी सोसायटींवर बरखास्तीची टांगती तलवार
नाशिक जिल्हा बँक गेल्या अनेक दिवसांपासून आर्थिक अडचणीमध्ये सापडली असताना जिल्हा बँकेकडून, तर बाकीदार शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर बोजा चढवत लिलावाची प्रक्रिया करण्याची नामुष्की आली होती. मात्र आता विविध कार्यकारी सोसायटी संस्थांवर देखील कारवाई करण्याची प्रक्रिया जिल्हा बँकेने हाती घेतली आहे. पंच कमिटींना कायदेशीर माहिती पडताळणीनंतर थेट कारवाई करून संचालक मंडळ बरखास्त करणार असल्याची चर्चा देखील जिल्हा बँकेच्या माध्यमातून समोर येत आहे. यामुळे आता येणाऱ्या काळात नाशिक जिल्हा सहकारी बँकेकडून विविध कार्यकारी सोसायटींवर बरखास्तीची टांगती तलवार असणार आहे.
निष्काळजीपणाचा कळस! पत्रकाराचा अपघातात मृत्यू
नाशिकच्या एकलहारा परिसरात राहणारे स्थानिक पत्रकार निलेश छाजेड यांचा तीन दिवसांपूर्वी अपघात मृत्यू झाला होता. एकलहारा कॉलनी परिसरात पाईपलाईनचे काम करून खड्डा व्यवस्थित बुजवला नसल्याने छाजेड यांचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात असून सबंधित ठेकेदारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. रात्रीच्या सुमारास घरी जात असताना रस्त्यावर खड्ड्याचा अंदाज न आल्याने गाडीवरचे नियंत्रण सुटले आणि रस्त्याचा बाजूला जाऊन छाजेड यांची गाडी स्लिप झाली, यात गंभीर जखमी झाल्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी नाशिकरोड पोलिसांना निवेदन देऊन सम्पूर्ण घटनेची चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे एका व्यक्तीचा बळी गेला आहे. याला जबाबदार कोण? असा सवाल ही आता विचारला जाऊ लागला आहे.
हे ही वाचा























