एक्स्प्लोर

Jan Ashirwad Yatra Live : जन आशीर्वाद यात्रेचे महत्वाचे अपडेट्स

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात  झाली आहे. जन आशीर्वाद यात्रेत नारायण राणेंनी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली

Key Events
Narayan Rane's Jan Ashirwad Yatra Live Updates Mumbai Jan Ashirwad Yatra begin BJP Union Minister criticized Shiv sena Mahavikas Aghadi government CM Uddhav Thackeray Jan Ashirwad Yatra Live : जन आशीर्वाद यात्रेचे महत्वाचे अपडेट्स
live_blog_(7)

Background

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला थोडयाच वेळात सुरुवात  झाली आहे. जन आशीर्वाद यात्रेत नारायण राणेंनी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी नारायण राणे म्हणाले की,  उद्धव ठाकरे नावाप्रमाणे राज्याला उध्वस्त करायला निघालेत. जनतेचा प्रतिसाद पाहता, महाविकास आघाडीला कंटाळलेली आहे, असं राणे म्हणाले. 

राणे म्हणाले की, मी प्रथमच एवढे दिवस दिल्लीत राहिलो. मी काम आणि विकास करू शकेल या विश्वासाने फडणवीस यांनी मला दिल्लीला पाठवले.  फडणवीस यांनी ज्या उद्देशाने पाठवले त्या उद्देशाने मोदी यांना पाठबळ देणार आहे आणि देश आघाडीवर कसं जाईल यासाठी प्रयत्न करेल, असं राणे म्हणाले. राणे म्हणाले की, गर्दी कमी करायच्या मी विरोधात आहे, फक्त नियम पाळा. दीड महिना मंत्री होऊन झाला, एक वेगळा अनुभव मिळाला, मंत्रिमंडळाच्या बैठकीत बसल्यावर आपण नवीन मंत्री झालो अस वाटलं नाही, असंही राणे म्हणाले. 

राणे म्हणाले की, हे राज्यातील जनतेचं पद आहे. जनतेची सेवा, विकास, रोजगार निर्माण करणार. जीडीपी मध्ये देश आघाडीवर असावा यासाठी प्रयत्न करणार.  महाराष्ट्राचं नाव दिल्लीत केल्याशिवाय राहणार नाही, असंही ते म्हणाले. 

हे खंडणी वसूल सरकार - देवेंद्र फडणवीस
यावेळी रथावरती नारायण राणे यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, आशिष शेलार यांच्यासह भाजप नेते उपस्थित होते. यावेळी फडणवीस म्हणाले की,  राणेंना महत्वाची जबाबदारी मिळाली आहे. मोदींना राणेंच्या नेतृत्वावर विश्वास आहे. महाविकास आघाडीच्या काळात राज्य पिछाडीवर आहे. हे खंडणी वसूल सरकार आहे, असं ते म्हणाले. फडणवीस म्हणाले की, राणेंची यात्रा ही साधी असूच शकत नाही, म्हणून वरुण राजाचा आशीर्वाद आहे. मंत्रिमंडळात सार्वजनिक भौगोलिक प्रतिनिधित्व मिळालं. बहुजनांचा नेतृत्व मिळालं, असं ते म्हणाले. 

13:16 PM (IST)  •  19 Aug 2021

जन आशीर्वाद यात्रेनिमित्त मंत्री नारायण राणे यांचं बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन

Jan Ashirwad Yatra Live : जन आशीर्वाद यात्रेनिमित्त मंत्री नारायण राणे यांचं बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन, स्मृतीस्थळावर जाऊन घेतलं दर्शन
https://marathi.abplive.com/news/maharashtra/narayan-rane-s-jan-ashirwad-yatra-live-updates-mumbai-jan-ashirwad-yatra-begin-bjp-union-minister-criticized-shiv-sena-mahavikas-aghadi-government-cm-uddhav-thackeray-999479

13:03 PM (IST)  •  19 Aug 2021

 केंद्रीय मंत्री नारायण राणे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेणार

 केंद्रीय मंत्री नारायण राणे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचत आहेत 

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report
Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report
Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report
Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
Embed widget