एक्स्प्लोर
मराठा मोर्चांकडे दुर्लक्ष करु नका, अन्यथा...: राणे

नागपूर: 'मराठा समाजाचे मोर्चे जरी मूक असले तरी त्याकडे दुर्लक्ष करु नका. अन्यथा ते कोणतंही रुप धारण करु शकतात.' असा इशारा नारायण राणे यांनी सरकारला दिला आहे. दरम्यान, आज नागपूरमध्ये मराठा मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आला आहे. नागपूरमध्ये मोर्चाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. या मोर्चात अनेक आमदारही सहभागी होणार असल्याची माहिती मिळते आहे. विरोधकांसोबतच सत्ताधारी पक्षांमध्ये या मोर्चाचं श्रेय घेण्याची चढाओढ बघायला मिळत आहे. भाजपचे मंत्री अणि आमदार या मोर्चा सर्व शक्ती पणाला लावत आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेच्या सर्व आमदारांना उद्या भगवे फेटे परिधान करुन या मोर्चात सहभागी होण्याचे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
राजकारण
व्यापार-उद्योग























