डिझेल दरवाढीचा सर्वसामान्यांप्रमाणे शेतकऱ्यांनाही फटका, शेती मशागतीचे दरही दुप्पटीने वाढले
Nandurbar: इंधनाचे वाढलेले दर हे सर्व क्षेत्रावर परिणाम कारक ठरत आहेत. सर्वसामान्यांप्रमाणे शेतकऱ्यांनाही याचा फटका बसताना दिसत आहे.
Nandurbar: इंधनाचे वाढलेले दर हे सर्व क्षेत्रावर परिणाम कारक ठरत आहेत. सर्वसामान्यांप्रमाणे शेतकऱ्यांनाही याचा फटका बसताना दिसत आहे. डिझेल दरवाढीमुळे शेतीसाठी भाडोत्री पद्धतीने पुण्यात येणाऱ्या ट्रॅक्टरचे दर वाढले आहेत. यामुळे आधीच शेतीत काम करण्यासाठी मजूर मिळत नसल्याने आणि आता वाढत्या डिझेलच्या किमती मुळे मशागतीचा खर्च वाढल्याने अल्पभूधारक शेतकरी शेती सोडून देण्याची भाषा करत आहे.
नंदुरबार जिल्ह्यात खरीप हंगाम सुरू व्हायला दोन महिने शिल्लक असले तरी एप्रिल महिन्यापासून खरीप पूर्व मशागतीना सुरुवात होत असते. तसेच आता रब्बी हंगामातील हरभरा आणि इतर पिकांची काढणी सुरू आहे. वाढत्या डिझेलच्या किमती मुळे मशागतीच्या आणि पिकांच्या काढणीच्या खर्च वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खर्च दुप्पट झाला आहे. वाढता खर्च आणि मजूर मिळत नसल्याने शेतकरी मरकुटीस आला आहे.
शेती मशागतीचे दर एकरी
- नागरणी: 2000
- कोळपणी: 2000
- रोटा: 1500
- कल्टीवेटर: 700
- थेशर मशीन वर धान्य काढणे 200 ते 300 प्रती पोती.
- मजुरांची प्रतिदिन मजुरी 250 ते 330
शेतीच्या खर्चात वाढ झाली आहे. त्यात डिझेल आणि खतांच्या दरवाढीमुळे शेतीच्या एकूण खर्च दुप्पट झाला आहे. मात्र शासनाने आतापर्यंत शेतीमालाच्या दरात कुठलीही वाढ केलेली नाही. ग्रामीण भागात मजुरांची मोठ्या प्रमाणात टंचाई असून शेतकरी यांत्रिकेतीकडे वळत असताना वाढलेले डिझेलचे दर डोकेदुखी ठरत आहे. सरकारने शेतकऱ्यांसाठी देण्यात येणार्या डिझेलमध्ये सबसिडी द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष घनश्याम चौधरी यांनी केली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Imtiyaz Jaleel : मला खासदार करण्यासाठी अब्दुल सत्तारांचा सिंहाचा वाटा; जलील यांचा गौप्यस्फोट
- मला उद्धव ठाकरेंची कुंडली पाहायची आहे, काय भाग्यवान माणूस! : चंद्रकांत पाटील
- Charging Station : चांद्यापासून बांद्यापर्यंत पेट्रोल पंपांवर चार्जिंग स्टेशन उभारणार : अजित पवार
- Online Games : ऑनलाइन गेम्समधून होणाऱ्या फसवणुकीला बसणार चाप! राज्य सरकारकडून लवकरच कायद्यात मोठे बदल?
- तुमची मुलं ऑनलाईन गेम्स खेळतायत? हॅकर्सने लुटले सव्वा तीन लाख रुपये, गेमिंगद्वारे फसवणूक
- FIR filed against Vaibhav Gehlot: राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल, फसवणूक केल्याचा आरोप