Nanded Crime: अनैतिक संबंधातून मित्राची हत्या, मृतदेह जाळून हाडे फेकली नदीत; महिन्यानंतर उकललं गूढ
Nanded Crime: याप्रकरणी वजिराबाद पोलिसांनी चार जणांना अटक केली असून पुढील तपास करीत आहेत. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजलीय.
![Nanded Crime: अनैतिक संबंधातून मित्राची हत्या, मृतदेह जाळून हाडे फेकली नदीत; महिन्यानंतर उकललं गूढ Nanded Crime: Murder of a friend by an immoral relationship, Bodies burned and bones thrown into river Nanded Crime: अनैतिक संबंधातून मित्राची हत्या, मृतदेह जाळून हाडे फेकली नदीत; महिन्यानंतर उकललं गूढ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/18/0f12ccf4a664fd54462d7562b3ab2c07_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nanded Crime: नांदेड शहरातील वजिराबाद येथे अनैतिक संबंधातून मित्राची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. याप्रकरणी वजिराबाद पोलिसांनी चार जणांना अटक केली करण्यात आलीय. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजलीय. वाजिराबाद पोलीस पुढील तपास करीत आहेत.
सुनील सुरेश सुलगेकर असं हत्या झालेल्या तरूणाचं नाव आहे. दरम्यान, कस्तुरीबाई सुलगेकर यांनी 21 जानेवारी रोजी सुनील एका महिन्यापासून बेपत्ता असल्याची वजिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी वजिराबाद पोलिसांनी मिसिंग क्रमांक 1/2022 दाखल केला. परंतु, सुनील याचा चुलत भाऊ व्यंकटेश राजू सुलगेकर यानं काल नांदेड पोलीस ठाणे येथे लिहून दिलेल्या जबाबात असं सांगितलं की, सुनील त्याला 18 डिसेंबर रोजी भेटला होता. सुनीलचे वडील सुरेश सुलगेकरचा शिवाजीनगर भागात खून झाल्यानं मृत्यू झालाय. तर, आईचा आजारानं मृत्यू झालाय. दरम्यान, सुनीलला दारु, गुटखा, गांजा पिण्याचं व्यसन जडलं. तसेच त्याची मित्र मंडळी ही व्यसनाधीन होती.
अनिरुद्ध आंचेवार, अभिजित पुजारी, गोविंद नायके, अनिल पवार हे सुनीलचे जिवलग मित्र होते. त्यामुळे या चौघांच्या घरी सुनीलचं येणं-जाणं होतं. या दरम्यान सुनीलचे एका मित्राच्या पत्नी सोबत अनैतिक संबंध होते. तसेच दुसऱ्या मित्राच्या मैत्रिणीसोबत त्याचं बोलणं होतं. या गोष्टीचा सुगावा त्याच्या मित्रांना लागला. त्यातून वाद निर्माण झाला. त्यानंतर सुनीलच्या चार मित्रांनी मिळून 18 डिसेंबर रोजी नांदेड शहरातील कौठा परिसरात त्याला एकटा शोधून त्याच्या डोक्यात दगड घालून त्याची निघृण हत्या केली. तसेच त्याला जाळून त्याची हाडे गोदावरी नदीत टाकून दिल्याची माहिती आरोपी गोविंद नायके यानं नांदेड ग्रामीण पोलिसांना दिलीय. त्यानुसार नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील चौकशी करीत आहेत.
हे देखील वाचा-
- Nanded: नांदेड जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाडसी कार्यवाही, 20 लाख रुपये किमतीचा अवैध दारूसाठा जप्त
- Satara : बाळ विकत घेणेही कायद्याने गुन्हा; पती पत्नीविरोधात गुन्हा; भांडणामध्ये बाळ मात्र शिशूगृहात
- ऑनलाईन लॉटरी गिफ्ट्सच्या नावाखाली लोकांची आर्थिक फसवणूक, केमिकल इंजिनियरला साकीनाका पोलिसांनी केली अटक
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)