एक्स्प्लोर

नांदेडचा रँचो... प्रदूषण मुक्त चार्जिंग सायकलचा अनोखा अविष्कार; 4 तास चार्जिगवर 40 किमीचा प्रवास

अर्धापूर शहरातील बसवेश्वर चौक परिसरामध्ये रहात असलेल्या शिवहार प्रकाश घोडेकर या 32 वर्षीय तरुणाने इलेक्ट्रिक चार्जिंगवर चालणारी प्रदूषण मुक्त अशी सायकल तयार केली आहे.

नांदेड :  देशात दररोज वाढणाऱ्या इंधनाच्या किमती आणि वाढते प्रदूषण या सध्याच्या काळातील मोठ्या समस्या आहेत. त्यावर पर्यायी मार्ग म्हणून आजकाल लोक पेट्रोल बाईक किंवा स्कूटरऐवजी इलेक्ट्रिक बाईक्स आणि स्कूटरचा पर्याय स्वीकारत आहे. अशातच नांदेडच्या अर्धापूर शहरामधील बेरोजगार तरुणाने प्रदूषण मुक्त चार्जिंगची सायकल बनवली आहे.

अर्धापूर शहरातील बसवेश्वर चौक परिसरामध्ये रहात असलेल्या शिवहार प्रकाश घोडेकर या 32 वर्षीय तरुणाने इलेक्ट्रिक चार्जिंगवर चालणारी प्रदूषण मुक्त अशी सायकल तयार केली आहे. फक्त पाच रुपये खर्चामध्ये चार तास चार्ज केल्याने तब्बल 35 ते 40 किमीचे अंतर पार करता येते. त्या ही सायकल बनवण्यासाठी चौदा हजार रुपये खर्च आला. त्याच्या या कलेची सर्वत्र प्रशंसा होत आहे.

अर्धापूर शहरांमध्ये पान ठेल्याचे दुकान चालवत शिवहारने शिक्षण पूर्ण केले. आयटीआयमध्ये प्रशिक्षण घेत वायरमॅनचा कोर्स पूर्ण केला. त्यानंतर त्यांनी रेल्वे डिव्हिजनमध्ये तीन वर्ष आणि महावितरणमध्ये तीन वर्ष कंत्राटी पदावर काम केले. पण गेल्या दोन वर्षापासून कोणतेही काम नसल्याने तो पानठेला चालवायचा. लॉकडाउनमुळे सर्व अस्थापना बंद असल्याने त्याचं पान ठेल्याचं दुकानही बंद झालं. त्यानंतर त्याने चार्जिंगवरील सायकल बनवण्याचा प्रयोग करण्याचा संकल्प करत विजेवर चालणारी सायकल तयार करण्याचे स्वप्न सत्यात उतरविले आहे. त्याच्या या वैज्ञानिक कलेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पेट्रोल डिझेलवर चालणारी वाहने अनेकांनी बघितली आहेत. मात्र चार्जिंगवर बनवलेली सायकल पहिल्यांदाच बनवण्यात आली. ही सायकल पाहण्यासाठी गावातील नागरिक मोठी गर्दी करत आहे.

5 रूपयात 40 किमी पार

चार्जिंग सायकल बनवण्यासाठी शिवहारला 14 हजार रुपये खर्च आला. मोटार 24 होल्ट 350 वॅट, बॅटरी 24 होल्ट 350 वॅट, चार्जिंग किट, लाईट ,गिअर एक्सलेटर, इलेक्ट्रिक ब्रेक यांच्यासह वेल्डींगचा वापर करत ही सायकल बनविण्यात आली आहे. या सायकलवरुन 5 रूपये चार्जिगवर 40 किमी अंतर पार करता येते.

येत्या काळात या चार्जिंग सायकलवर आणखी संशोधन करून चार्जिंग फ्री मध्ये होण्याची व्यवस्था व्हावी आणि पुढील काळात सायकल चालवताना चार्जिंग व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती शिवहार याने दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
कारखानदारांनो आजच निर्णय घ्या, नाहीतर उद्यापासून तुमचे वाईट दिवस चालू होतील, दिवाळी साजरी करुन देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा
कारखानदारांनो आजच निर्णय घ्या, नाहीतर उद्यापासून तुमचे वाईट दिवस चालू होतील, दिवाळी साजरी करुन देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा
दात घासता घासता टूथब्रशच गिळला; अथक प्रयत्नानंतर शस्त्रक्रियेविनाच डॉक्टरांनी पोटातून काढला बाहेर
दात घासता घासता टूथब्रशच गिळला; अथक प्रयत्नानंतर शस्त्रक्रियेविनाच डॉक्टरांनी पोटातून काढला बाहेर
Sanjay Raut: अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार

व्हिडीओ

Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report
Dia Mirza vs BMC on Diwali Pollution : व्हिडीओवरून कुरबूर बीएमसीत 'मिर्झा'पूर Special Report
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
Video: सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
Sanjay Raut: अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
Satej Patil on Gokul: स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा
स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा
सात दिवसात पैसे चौपट? गुंतवणुकीचे आमिष दाखवून वृद्धाची तब्बल 2 कोटींची फसवणूक; ED चा धाक दाखवून 1 करोड लुटले
सात दिवसात पैसे चौपट? गुंतवणुकीचे आमिष दाखवून वृद्धाची तब्बल 2 कोटींची फसवणूक; ED चा धाक दाखवून 1 करोड लुटले
Cyclone Murasu: मुरासू चक्रीवादळाचे केंद्र आंध्र प्रदेशातून तेलंगणात सरकलं, 12 तासांसाठी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा; हजारो झाडे आणि विजेचे खांब कोसळले, 30 विमान उड्डाणे रद्द
मुरासू चक्रीवादळाचे केंद्र आंध्र प्रदेशातून तेलंगणात सरकलं, 12 तासांसाठी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा; हजारो झाडे आणि विजेचे खांब कोसळले, 30 विमान उड्डाणे रद्द
आधी विधानपरिषद, आता जिल्हा बँकेच्या निकालानंतर वादावादी; जयकुमार गोरे म्हणाले, महायुतीचा धर्म पाळला नाही
आधी विधानपरिषद, आता जिल्हा बँकेच्या निकालानंतर वादावादी; जयकुमार गोरे म्हणाले, महायुतीचा धर्म पाळला नाही
Embed widget