एक्स्प्लोर

के. चंद्रशेखर राव यांचे भाजपाविरोधी आघाडीसाठीचे प्रयत्न स्वागतार्ह, पण.... : नाना पटोले

Nana Patole : तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी भाजपाविरोधी आघाडी बनवण्यासाठी महाराष्ट्रात येऊन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.

Nana Patole Member of the Maharashtra Legislative Assembly : तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी भाजपाविरोधी आघाडी बनवण्यासाठी महाराष्ट्रात येऊन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. भाजपचा खरा चेहरा त्यांच्या लक्षात आला असून भाजपच्या हुकुमशाही विरोधात प्रादेशिक पक्षांना एकत्रित आणण्याचा त्यांचा प्रयत्न स्वागतार्ह आहे. पण काँग्रेस पक्षाशिवाय भाजपाविरोधातील आघाडी पूर्ण आणि यशस्वी होणार नाही असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. 

तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा महाराष्ट्र दौरा आणि राजकीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया देताना पटोले म्हणाले की, केंद्रीतल भाजपा सरकार हुकुमशाही वृत्तीने वागत आहे. संविधान आणि लोकशाही संपवण्याचे आणि देशाची मालमत्ता विकण्याचे काम सुरु आहे. भारतीय जनता पक्ष विरोधकांसोबतच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे भाजपला मदत करणा-या मित्र पक्षांनाही संपवत आहे. याचा अनेक पक्षांना अनुभव आल्याने आता ते पक्ष भाजपपासून दुरावले आहेत. के. चंद्रशेखर राव यांनी उघडपणे केंद्रातील भाजप सरकारविरोधी भूमिका घेऊन भाजपा विरोधात आघाडीसाठी प्रयत्न चालवले आहेत. यापूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही अशा आघाडीसाठी विविध राज्यात जाऊन नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या. पण पुढे यासंदर्भात काही ठोस घडले नाही. के. चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीने लोकसभा आणि राज्यसभेत प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे भाजपाला मदत होईल अशा भूमिका घेतल्या होत्या पण आता भाजपबद्दलचे त्यांचे विचार बदलले आहेत. भाजप हा लोकशाही आणि संविधानविरोधी असल्याचे त्यांच्या लक्षात आले आहे त्यांच्या या बदललेल्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. के. चंद्रशेखर राव यांच्याप्रमाणेच विविध राजकीय पक्ष आणि देशातील सर्वसामान्य जनतेला भाजपचा खरा चेहरा लक्षात आला असून देशातील जनता भाजपला सत्तेवरून पायउतार केल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेस आणि मित्रपक्षांची यूपीए आघाडी हीच भाजपाविरोधात सक्षम पर्याय असून काँग्रेसला वगळून प्रादेशिक पक्षांची भाजपला पर्याय होऊ शकत नाही असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

काँग्रेसला वगळून मोदींविरोधातली लढाई अशक्य, यशोमती ठाकूर यांचे वक्तव्य - 
यशोमती ठाकूर यांनी ट्वीट करत तिसऱ्या आघाडीच्या शक्यतेवर टीकास्त्र सोडलं आहे. यशोमती ठाकूर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, ‘काँग्रेसला वगळून मोदींविरोधातली लढाई यशस्वी होणार नाही. काँग्रेसने अतिशय प्रामाणिकपणे 'संघी' अजेंड्याविरोधात लढाई लढली आहे. आज देशात बदलाचे जे वारे वाहतायत, विरोधी पक्षांच्या आवाजाला जी बळकटी मिळतेय ती काँग्रेसमुळेच आहे.’ काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी ट्वीट करत तिसऱ्या आघाडीच्या शक्यतेवर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच काँग्रेसशिवाय मोदींचा पराभव करणे शक्य नसल्याचे सांगितले आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, 87.90 टक्के विद्यार्थी पास; येथे पाहा निकाल
CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, 87.90 टक्के विद्यार्थी पास; येथे पाहा निकाल
Pravin Tarde : बोटाला शाई लावण्याअगोदर प्रवीण तरडेंचा पुणेकरांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
बोटाला शाई लावण्याअगोदर प्रवीण तरडेंचा पुणेकरांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
Video: शिरुर मतदारसंघात राडा, व्हिडिओ शेअर करत अमोल कोल्हेंचा संताप; सर्वात कमी मतदान
Video: शिरुर मतदारसंघात राडा, व्हिडिओ शेअर करत अमोल कोल्हेंचा संताप; सर्वात कमी मतदान
Kareena Kapoor Saif Ali Khan Viral Video :  ही असली कामे बेडरुममध्ये करा ना; सैफीनाच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकरी भडकले
Video : ही असली कामे बेडरुममध्ये करा ना; सैफीनाच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकरी भडकले
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Raksha Khadse Birthday Celebration : रक्षा खडसेंचा वाढदिवस, सासरे एकनाथ खडसेंकडून शुभेच्छाAnna Hajare Ralegan Voting  : चारित्र्य बघून मतदान करा, अण्णा हजारेंचं मतदारांना आवाहनBajrang Sonwane On oppenent : विरोधकांकडून पैसै वाटले जातात, बजरंग सोनावणेंचा आरोपABP Majha Headlines : 10 AM : 13 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, 87.90 टक्के विद्यार्थी पास; येथे पाहा निकाल
CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, 87.90 टक्के विद्यार्थी पास; येथे पाहा निकाल
Pravin Tarde : बोटाला शाई लावण्याअगोदर प्रवीण तरडेंचा पुणेकरांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
बोटाला शाई लावण्याअगोदर प्रवीण तरडेंचा पुणेकरांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
Video: शिरुर मतदारसंघात राडा, व्हिडिओ शेअर करत अमोल कोल्हेंचा संताप; सर्वात कमी मतदान
Video: शिरुर मतदारसंघात राडा, व्हिडिओ शेअर करत अमोल कोल्हेंचा संताप; सर्वात कमी मतदान
Kareena Kapoor Saif Ali Khan Viral Video :  ही असली कामे बेडरुममध्ये करा ना; सैफीनाच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकरी भडकले
Video : ही असली कामे बेडरुममध्ये करा ना; सैफीनाच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकरी भडकले
Chandrashekhar Bawankule : 'मशाल अन् तुतारी चार जूननंतर राज्यात दिसणार नाही', चंद्रशेखर बावनकुळेंचा घणाघात
'मशाल अन् तुतारी चार जूननंतर राज्यात दिसणार नाही', चंद्रशेखर बावनकुळेंचा घणाघात
Beed Lok Sabha: पंकजा मुंडेंनी सांगितली विचित्र योगायोगाची कथा, गोपीनाथ मुंडेंना अग्नी दिला त्याचदिवशी लागणार लोकसभेचा निकाल
पंकजा मुंडेंनी सांगितली विचित्र योगायोगाची कथा, गोपीनाथ मुंडेंना अग्नी दिला त्याचदिवशी लागणार लोकसभेचा निकाल
मोठी बातमी : ठाण्यात सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरुस्त, मध्य रेल्वेच्या वाहतुकीचे तीनतेरा; लोकल अद्यापही उशिराने
मोठी बातमी : ठाण्यात सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरुस्त, मध्य रेल्वेच्या वाहतुकीचे तीनतेरा; लोकल अद्यापही उशिराने
Lok Sabha Election Voting Maharashtra : राज्यात सुरुवातीच्या टप्प्यात नंदुरबारची आघाडी, जळगावसह रावेरमध्ये मतदानाची स्थिती काय? जाणून घ्या आकडेवारी
नंदुरबारची सुरुवातीच्या टप्प्यात आघाडी, जळगावसह रावेरमध्ये मतदानाची स्थिती काय? जाणून घ्या आकडेवारी
Embed widget