एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Nagpur Murder : इन्स्टाग्रामवर झाली ओळख, घरच्यांनी समजूत काढली, पण तरीही अनर्थ झालाच!

एकतर्फी प्रेमातून माथेफिरुने कथित प्रेयसीच्या वृद्ध आजी आणि 10 वर्षांच्या भावाचा जीव घेतला. या प्रकरणातील आरोपीने काल रात्री आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. दीड वर्षापूर्वी Instagram वर एकमेकांचे फोटो पाहून त्यांची ओळख झाली होती.

नागपूर : एकतर्फी प्रेम किती घातक वळणावर जाऊ शकते आणि वेळीच मुलींना होणाऱ्या त्रासाची पोलिसांकडे तक्रार केली नाही, तर किती भयावह परिणाम होऊ शकतात याची प्रचिती काल नागपुरात आली आहे. एकतर्फी प्रेमातून माथेफिरुने कथित प्रेयसीच्या वृद्ध आजी आणि 10 वर्षांच्या भावाचा जीव घेतला. दिवसा ढवळ्या 65 वर्षीय लक्ष्मीबाई धुर्वे आणि 10 वर्षाच्या यश धुर्वेच्या हत्येने नागपुरात खळबळ उडाली. या प्रकरणातील आरोपीने काल रात्री आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. हा आरोपी अल्पवयीन होता. त्याने मनकापुर परिसरात रेलवे ट्रॅक वर रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली.

तरुणीचे कुटुंब कनिष्ठ मध्यमवर्गीय आहे.तरी ते तरुणीला नागपूरच्या नावाजलेल्या महाविद्यालयात शिकवत होते, ती द्वितीय वर्षात होती. तर तरुण साडे सतरा वर्षाचा असून कोणतंही काम धंदा करत नव्हता. तरुण आणि तरुणी दोघे नागपूरच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात राहतात. सुमारे दीड वर्षापूर्वी Instagram वर एकमेकांचे फोटो पाहून ओळख झाली. महाविद्यालयाजवळ भेटही झाली.

एकतर्फी प्रेमातून भरदिवसा आजीसह चिमुकल्या भावाचा खून, दुहेरी हत्याकांडाने नागपूर हादरलं

तरुणीच्या कुटुंबियांना तिच्या मोबाईल द्वारे या मैत्रीची माहिती मिळाली. त्यांनी तिला अभ्यासात लक्ष घालायला सांगत त्याच्या पासून दूर राहण्यास सांगितले. तिचा मोबाईल काढून घेत त्या तरुणाच्या कुटुंबियांना भेटून माहिती त्यांनाही दिली. कुटुंबियांनी समजूत घातल्यानंतर तरुणी त्याला टाळू लागली. तरी तो तरुण नागपूरच्या दुसऱ्या कोपऱ्यात राहणाऱ्या तरुणीच्या कृष्णगर भागात यायचा. तरुणीच्या कुटुंबियांशी वाद घालायचा. एकदा तर तरुणीच्या भावाला मारहाणही केली होती.

तरुणीवर दबाव आणायचा, तिला मारहाणही करायचा माहितीनुसार, तो माथेफिरू भेटण्यासाठी त्या तरुणीवर दबाव आणायचा, तिला मारहाण करायचा. 15 दिवसांपूर्वी ही त्याने तिला जबर मारहाण केली होती. त्यात तिच्या एका डोळ्याला जबर दुखापत झाली होती. तेव्हा धुर्वे कुटुंबातील काही कौटुंबिक मित्रांनी पोलिसांकडे तक्रार देण्याचा सल्ला दिला होता. मात्र, ती तरुणी मारहाणीनंतर एवढी जास्त घाबरलेली होती की तिची अवस्था पाहून तिच्या कुटुंबियांनी तक्रार देण्यास नकार दिला होता. शिवाय तो तरुण सतत धुर्वे कुटुंब राहत असलेल्या भागात यायचा. मारहाणीत डोळ्याला जबर दुखापत झाल्यानंतर परिसरात तिची ती अवस्था पाहून बदनामी होईल म्हणून धुर्वे कुटुंबियांनी आपल्या मुलीला नातेवाईकांकडे पाठवले. त्यानंतर माथेफिरू तरुण आणखी चिडला आणि त्याने काल टोकाचं पाऊल उचलत घरी येऊन तरुणी बद्दल विचारणा केली. तरुणीच्या आजीने समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे आधी त्यांची आणि नंतर 10 वर्षीय मुलाची हत्या केली.

नागपुरात एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या आजीसह भावाची हत्या करणाऱ्या आरोपीची आत्महत्या

काल दुपारी धुर्वे दाम्पत्य आपल्या कामावर गेल्यानंतर घरी लक्ष्मीबाई आणि चिमुकला यश हे दोघेच होते. त्याच वेळी तो तरुण त्या ठिकाणी आला आणि त्याने आपल्या हातातील धारधार शस्त्राने लक्ष्मीबाई आणि यशचा खून केला. शेजाऱ्यांनी धुर्वे यांच्या घरातून आलेल्या आवाजानंतर तिथे जाऊन पाहिले असता दुहेरी हत्याकांडाची ही घटना उघडकीस आली. लगेच घटनेची माहिती धुर्वे दाम्पत्याने पोलिसांना दिली. काल दुपारी दोघांची हत्या केल्यानंतर आरोपी एक्टिव्हाने मानकापूर परिसरात गेला. तिथे रात्री 9 वाजून 26 मिनिटांनी जाणाऱ्या केरळ एक्स्प्रेस समोर उडी घेऊन आत्महत्या केली. केरळ एक्स्प्रेसच्या ड्रायवरने रेल्वे एकाने रेल्वे समोर आत्महत्या केल्याची कंट्रोल रूमला माहिती दिली.रेल्वे कंट्रोल रूम ने पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली, त्यांनतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यावर दुहेरी हत्याकांडाच्या आरोपीने आत्महत्या केल्याची स्पष्ट झाले.

एकतर्फी प्रेमातून भरदिवसा आजीसह चिमुकल्या भावाचा खून, दुहेरी हत्याकांडाने नागपूर हादरलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेरणी संसदेत, हाती संविधान, प्रियंका गांधींनी घेतली खासदारकी शपथ; संजय राऊतांचं खास ट्विट
शेरणी संसदेत, हाती संविधान, प्रियंका गांधींनी घेतली खासदारकी शपथ; संजय राऊतांचं खास ट्विट
IPL 2025 RCB : आरसीबीने तब्बल 119 कोटी खर्च करूनही लिलावात केली मोठी चूक; आता विराट कोहलीला निर्णय घ्यावाच लागणार!
आरसीबीने तब्बल 119 कोटी खर्च करूनही लिलावात केली मोठी चूक; आता विराट कोहलीला निर्णय घ्यावाच लागणार!
विस्तार अधिकाऱ्याची ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी, महिलेने अधिकाऱ्याला काळं फासत दिला चांगलाच चोप, धुळ्यातील घटना
विस्तार अधिकाऱ्याची ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी, महिलेने अधिकाऱ्याला काळं फासत दिला चांगलाच चोप, धुळ्यातील घटना
Ambadas Danve: लोकसभेनंतर काँग्रेस नेत्यांचा अति आत्मविश्वास नडला, अंबादास दानवेंचं सूचक वक्तव्य, म्हणाले, स्वबळावर लढायचं तर..
लोकसभेनंतर काँग्रेस नेत्यांचा अति आत्मविश्वास नडला, अंबादास दानवेंचं सूचक वक्तव्य, म्हणाले, स्वबळावर लढायचं तर..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nana Patole PC : निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेवरच आम्हाला संशय, नाना पटोलेंचे आयोगावर गंभीरआरोपABP Majha Headlines :  3 PM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM :28 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaMahayuti Maharashtra : 8 कॅबिनेट मंत्रिपदांसह 3 राज्यमंत्रिपदांची राष्ट्रवादीची मागणी - सूत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेरणी संसदेत, हाती संविधान, प्रियंका गांधींनी घेतली खासदारकी शपथ; संजय राऊतांचं खास ट्विट
शेरणी संसदेत, हाती संविधान, प्रियंका गांधींनी घेतली खासदारकी शपथ; संजय राऊतांचं खास ट्विट
IPL 2025 RCB : आरसीबीने तब्बल 119 कोटी खर्च करूनही लिलावात केली मोठी चूक; आता विराट कोहलीला निर्णय घ्यावाच लागणार!
आरसीबीने तब्बल 119 कोटी खर्च करूनही लिलावात केली मोठी चूक; आता विराट कोहलीला निर्णय घ्यावाच लागणार!
विस्तार अधिकाऱ्याची ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी, महिलेने अधिकाऱ्याला काळं फासत दिला चांगलाच चोप, धुळ्यातील घटना
विस्तार अधिकाऱ्याची ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी, महिलेने अधिकाऱ्याला काळं फासत दिला चांगलाच चोप, धुळ्यातील घटना
Ambadas Danve: लोकसभेनंतर काँग्रेस नेत्यांचा अति आत्मविश्वास नडला, अंबादास दानवेंचं सूचक वक्तव्य, म्हणाले, स्वबळावर लढायचं तर..
लोकसभेनंतर काँग्रेस नेत्यांचा अति आत्मविश्वास नडला, अंबादास दानवेंचं सूचक वक्तव्य, म्हणाले, स्वबळावर लढायचं तर..
ठाकरे बंधू एकत्र येणार का, उद्धव ठाकरे मनसेप्रमुखांसोबत चर्चेसाठी पुढाकार घेणार का? ठाकरे गटाच्या नेत्याचं महत्त्वाचं वक्तव्य
ठाकरे बंधू एकत्र येणार का, उद्धव ठाकरे चर्चेसाठी पुढाकार घेणार का? ठाकरे गटाच्या नेत्याचं महत्त्वाचं वक्तव्य
पराभवानंतर एकनाथ शिंदेंचा बच्चू कडूंना फोन, माहिती घेतली; राणा दाम्पत्यास चॅलेंज, पुन्हा निवडणूक घ्या
पराभवानंतर एकनाथ शिंदेंचा बच्चू कडूंना फोन, माहिती घेतली; राणा दाम्पत्यास चॅलेंज, पुन्हा निवडणूक घ्या
Ramdas Kadam : एक दिवस असा येईल, उद्धव ठाकरे रात्री 2 वाजता फॅमिलीला घेऊन देश सोडतील; रामदास कदमांचं खळबळजनक विधान
एक दिवस असा येईल, उद्धव ठाकरे रात्री 2 वाजता फॅमिलीला घेऊन देश सोडतील; रामदास कदमांचं खळबळजनक विधान
नॉन व्हेज खाल्ल्यामुळं संतापला बॉयफ्रेंड, दोघांमधला वाद टोकाला; पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
नॉन व्हेज खाल्ल्यामुळं संतापला बॉयफ्रेंड, दोघांमधला वाद टोकाला; पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
Embed widget