Nagpur Metro : मेट्रोची 10 रुपये प्रवास स्कीम बंद; आता किलोमीटरनुसार द्यावे लागणार भाडे
मेट्रो प्रवाशांना 1 ते 6 किलोमीटरकरता 5 रुपये, 6 ते 9 किलोमीटरकरता 10 रुपये, 9 ते 12 किलोमीटरकरता 15 रुपये, 12 ते 15 किलोमीटर अंतरासाठी 20 रुपये आणि त्यानंतर 35 रुपये द्यावे लागणार आहे.
![Nagpur Metro : मेट्रोची 10 रुपये प्रवास स्कीम बंद; आता किलोमीटरनुसार द्यावे लागणार भाडे Nagpur Metro Rs 10 travel scheme closed Now the fare has to be paid per kilometer Nagpur Metro : मेट्रोची 10 रुपये प्रवास स्कीम बंद; आता किलोमीटरनुसार द्यावे लागणार भाडे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/17/1b5b0c03dda1651bbee1f3bd66e029e41673964867192440_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nagpur Metro News : नागपुरात कोरोना काळात प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता मेट्रोने 10 रुपयात मेट्रो प्रवास करण्याची सुविधा दिली होती. ही सुविधा आता बंद करण्यात आली असल्याने मेट्रो प्रवाशांना मोठा झटका बसला आहे. आता किलोमीटरनुसार प्रवाशांना भाडे द्यावे लागेल. 10 रुपये नाममात्र भाडे असल्याने मेट्रोच्या रायडरशिपमध्ये उल्लेखनीय वाढ झाली आहे. प्रतिदिन सरासरी 1.30-1.40 लाख लोक मेट्रोने प्रवास करीत होते. आता दरवाढीमुळे प्रवाशांची संख्या कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
असे आहेत प्रवासभाडे
मिळालेल्या माहितीनुसार आता 1 ते 6 किलोमीटरकरता प्रवाशांना 5 रुपये, 6 ते 9 किलोमीटरकरता 10 रुपये, 9 ते 12 किलोमीटरकरता 15 रुपये, 12 ते 15 किलोमीटर अंतरासाठी 20 रुपये आणि 15 किलोमीटरपेक्षा अधिक अंतरासाठी 35 रुपये द्यावे लागेल. वरील दर कोराना काळापूर्वीसुद्धा लागू होते. आता एकदा पुन्हा मेट्रो व्यवस्थापनाने जुने दर लागू करण्याची घोषणा केली आहे.
उत्पन्नही आवश्यक
यासंबंधी उपमहाव्यवस्थापक (कम्युनिकेशन) अखिलेश हळवे यांनी सांगितले की, मेट्रो संचालनकरता मोठ्या प्रमाणात खर्च लागतो. कोरोना काळात आम्ही स्कीम दिली होती, केवळ ती बंद केली जात आहे. याला भाडेवाढ म्हणता येणार नाही. भाडे वाजवी असून सुविधा भरपूर आहे. त्यामुळे याचा प्रवाशांच्या संख्येवर कोणताही परिणाम होणार नाही, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
रायडरशिपने नुकताच पार केला 2 लाखांचा टप्पा
2022 मध्ये रायडरशिपचे नवीन उच्चांक गाठल्यावर, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नागपूर मेट्रोने आणखी एक मैलाचा दगड गाठला होता. महामेट्रो ची रायडरशिप नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी 2,02,608 वर इतकी होती. या वाढणाऱ्या प्रवासी संख्येचा अंदाज घेत महा मेट्रोने फेऱ्यात आज करता वाढ केली आणि रात्री 10.30 पर्यंत सर्वच टर्मिनल स्टेशनवर मेट्रो सेवा दिली होती. नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्प टप्पा-1 माननीय पंतप्रधानांनी राष्ट्राला समर्पित केल्यानंतर अवघ्या तीन आठवड्यांनंतर महा मेट्रोने हा महत्वाचा टप्पा गाठला होता. नागपूर मेट्रोने हा आकडा मेट्रो गाडीच्या डब्यातील तसेच स्टेशन वरील गर्दी या वाढलेल्या रायडरशीपचे प्रमाण आहे.
ही बातमी देखील वाचा...
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलाच, अध्यक्ष निवडीसाठी महाराष्ट्रातही निवडणूक घ्या; माजी आमदार आशिष देशमुख यांचं पक्षश्रेष्ठींना पत्र
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)