एक्स्प्लोर
नागपुरातील CCTV कॅमेरा चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश
नागपूर : नागपुरातील अनंतनगरमधील सीसीटीव्ही कॅमेरा चोरी प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. या भागातच राहणाऱ्या एका व्यक्तीने हे कॅमेरे चोरल्याचे उघड झालं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या स्मार्ट अँड सेफ नागपूर सिटी या योजनेतंर्गत अनंतनगर भागात दोन अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. मात्र संबंधित आरोपीला हे कॅमेरे वैयक्तिक आयुष्यात अडचणीचे ठरत होते. त्यामुळं त्यानं एके दिवशी रात्री दीड वाजताच्या सुमारास आपल्या भावाच्या मदतीने हे कॅमेरे चोरून स्वतःच्या घरी ठेवले होते.
एवढेच नाही तर या दोघांनी सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले लोखंडी खांबही रस्त्यावर टाकून दिले होते. पोलिसांनी या प्रकरणात चोरीचा गुन्हा नोंदवत सीसीटीव्ही जप्त केले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement