एक्स्प्लोर
नागपुरात दोन एटीएम मशिन जळून खाक, नुकसानीबाबत अस्पष्टता

नागपूर : नागपूरच्या प्रगती सभागृहाजवळील एटीएम मशिन्सला काल मध्यरात्री अचानक आग लागली. या आगीत दोन्ही एटीएम मशिन्स जळून खाक झाल्या आहेत. सोमवारी रात्री नागपूरच्या प्रगती सभागृह परिसरात एचडीएफसी बँकेच्या मशिन्समधून अचानक धूर यायला लागला आणि बघता बघता या दोन्ही मशिन्स आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या. दरम्यान या एटीएम मशिन्सच्या देखभालीसाठी तैनात करण्यात आलेला सुरक्षारक्षक यावेळी जागेवर हजर नसल्याचं उघड झालं आहे. या आगीत नेमकं आर्थिक नुकसान किती झालं याची माहिती कळू शकलेली नाहीये. त्याचप्रमाणे आग नेमकी कशी लागली याचा सध्या तपास घेतला जात आहे.
आणखी वाचा























