एक्स्प्लोर
नगरपालिका निवडणुकीत कमळ फुललं, भाजपचे 52 नगराध्यक्ष
मुंबई : तब्बल 31 नगरपालिका जिंकून भाजपनं मिनी विधानसभेत आघाडी घेतली आहे. सोबतच 52 ठिकाणी भाजपचे थेट नगराध्यक्षही निवडून आले आहेत. त्यामुळे नगरपालिकेसाठी भाजपने आखलेली रणनीती पूर्णपणे यशस्वी झाल्याचं मानलं जात आहे. रविवारी 147 नगरपरिषदा आणि 18 नगरपंचायतीसाठी एकूण 165 ठिकाणी मतदान पार पडलं. सरासरी 70 टक्के मतदान झाल्याची माहिती आहे.
भाजपपाठोपाठ 20 नगरपालिका जिंकत काँग्रेसनं दुसऱ्या क्रमांकावर बाजी मारली आहे. काँग्रेसचेही 22 ठिकाणी थेट नगराध्यक्ष निवडून आले आहेत. तर राष्ट्रवादी 17 नगरपालिकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. शिवसेना 16 नगरपालिकांसह शेवटच्या नंबरवर आहे. विशेष म्हणजे यावेळी स्थानिक आघाड्यांनाही बऱ्यापैकी यश मिळालं आहे. कारण त्यांचीही 25 नगरपालिकांवर सद्दी असणार आहे. तर त्रिशंकू अवस्थेतील नगरपालिकांची संख्या तब्बल 34 आहे.
यंदा नगराध्यक्षपदासाठी थेट निवडणूक घेण्याचा सर्वात जास्त फायदा भाजपलाच झाला आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार 55 नगरपालिकांमध्ये भाजपचा नगराध्यक्ष विराजमान होणार आहे. अनेक ठिकाणी बहुमत काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा इतर पक्षाला मिळालं असलं तरी नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकण्यात भाजप यशश्वी ठरला आहे.
नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत शिवसेना 25 जागांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर काँग्रेसचे 22 नगरपालिकांमध्ये नगराध्यक्ष निवडून आले आहेत. नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीचा सर्वात मोठा फटका राष्ट्रवादीला बसला आहे. आतापर्यंत 17 ठिकाणी राष्ट्रवादीला यश मिळालं आहे, तर 25 नगरपालिकांचं नगराध्यक्षपद हे इतर पक्ष आणि अपक्षांकडे गेलं आहे.
146 पालिकांमध्ये सत्ता कोणाची
भाजप - 31 काँग्रेस - 20 राष्ट्रवादी - 17 शिवसेना - 16 स्थानिक आघाडी - 25 त्रिशंकू- 34 शेकाप -2 भारिप- 1कोणत्या पक्षाचे किती नगराध्यक्ष
भाजप - 52 शिवसेना - 25 काँग्रेस - 22 राष्ट्रवादी - 17 स्थानिक आघाडी - 25 शेकाप - 1 भारिप- 3 मनसे- 1गड आला पण सिंह गेला :
गड आला पण सिंह गेला, अशी अवस्था बऱ्याच ठिकाणी झाली आहे. कराडमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जंगजंग पछाडून सत्ता काबीज केली. मात्र तिथं नगराध्यक्षपदावर भाजपनं बाजी मारली. दुसरीकडे वाईमध्ये राष्ट्रवादीनं सत्ता मिळवली, मात्र नगराध्यक्षपदी भाजपचा उमेदवार जिंकून आला. तर सांगोल्यात शेकापनं सत्तेवर आपली मोहोर उमटवली मात्र नगराध्यक्ष महायुतीचा निवडून आला आहे. खेडमध्ये मनसे आणि राष्ट्रवादी आघाडीला शिवसेनेनं धोबीपछाड दिली, मात्र नगराध्यक्षपदी मनसेचा उमेदवार निवडून आला आहे.प्रतिष्ठेच्या लढती :
परळीमध्ये मुंडे बहिण-भावाच्या लढतीत भावाने बाजी मारली आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे. परळी नगरपालिकेच्या 33 पैकी 27 जागांवर राष्ट्रवादी काँग्रसनं मोठी आघाडी घेतली आहे. याशिवाय नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतही राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाला आहे. परळी नगरपालिकेच्या निकालामुळे पंकजा मुंडेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे. परळीत विजय मिळवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी याठिकाणी जोरदार प्रचार केला होता. मात्र मतदारांनी राष्ट्रवादीला साथ दिली. भोकरदनमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना धोबीपछाड मिळाला आहे. काँग्रेसला 17 पैकी नऊ जागा मिळाल्या आहेत, तर भाजपला फक्त चार जागांवर समाधान मानावं लागलं आहे. मालवणमध्ये नारायण राणे यांना धक्का बसला आहे. कारण मालवणचा किल्ला शिवसेनेनं जिंकला आहे. शिवसेनेचे उमेदवार महेश कांदळगावकर नगराध्यक्षाच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. शिवसेनेला 5, भाजपला 5, काँग्रेसला 4 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. देवगड नगरपालिका मात्र नारायण राणेंनी जिंकली आहे. नितेश राणेंनी आपल्या मतदारसंघात वर्चस्व कायम ठेवलं आहे. सावंतवाडीत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला आहे. शिवसेनेला सात, काँग्रेसला आठ, भाजपला एक आणि अपक्षांना एक उमेदवार विजयी झाला आहे. साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा सत्ता राखली आहे. आपली कॉलर टाईट असल्याचं उदयनराजेंनी ठणकावून सांगितलं आहे. साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले आणि शिवेंद्र राजे यांच्यात प्रमुख लढत होती. यामध्ये उदयनराजे यांच्या सातारा विकास आघाडीचे 22 नगरसेवक निवडून आले, तर शिवेंद्र राजेंच्या नगरविकास आघाडीला फक्त 12 जागांवर समाधान मानावं लागलं. या विजयानंतर उदयनराजेंनी सातारकरांचे आभार मानले.गड गमावले :
इस्लामपूर,सांगली - जयंत पाटील परळी, बीड - पंकजा मुंडे कळमनुरी, हिंगोली - राजीव सातव परतूर, अहमदनगर - बबनराव लोणीकर राहता, अहमदनगर - राधाकृष्ण विखे पाटील खामगाव, बुलडाणा - दिलिप सानंदा मालवण, सिंधुदुर्ग - नारायण राणे सावंतवाडी, सिंधुदुर्ग - दीपक केसरकरसंबंधित बातम्या :
नगरपालिका निवडणूक : तुमचा नगराध्यक्ष कोण?
नगरपालिका निवडणूक निकाल अपडेट
नगरपालिका निवडणूक : जिल्हानिहाय प्रतिष्ठेच्या लढती
राज्यातील 147 नगरपालिका निवडणुकांची संपूर्ण आकडेवारी
नगरपालिका निवडणूक : पत्नीसाठी दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement