एक्स्प्लोर
लातूरमध्ये मुस्लीम समाजाचा विराट मूक मोर्चा

लातूर : आरक्षणाच्या मागणीसाठी आज लातूरमध्ये मुस्लीम समाजाने विराट मूक मोर्चा काढला. पाच मुलींच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांना मागण्याचं नियोजन देऊन हा मोर्चा विसर्जित करण्यात आला. शहरातील इदगाह मैदानातून हा मोर्चा काढण्यात आला. आरक्षणासह इतर मागण्यांसाठी मुस्लीम समाजाकडून राज्यभर मूक मोर्चांचा आयोजन केलं जात आहे.
मुस्लिम समाजाच्या मागण्या मुस्लीम समाजाला शिक्षणात, नोकरीत आरक्षण द्यावं, मुस्लीम पर्सनल लॉमध्ये शासनाने हस्तक्षेप करू नये. तसेच मुस्लीम समाजावर दिवसेंदिवस वाढणाऱ्या हल्ल्यांपासून सरंक्षण द्यावं, अघोषित गोसंरक्षकांवर बंदी आणावी, वक्फ बोर्डाच्या जमिनीवरील अतिक्रमण हटवावं, अशा मुस्लीम समाजाच्या मागण्या आहेत.

आणखी वाचा