कधी होणार महापालिकेच्या निवडणुका? प्रभागरचना प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या महत्वाचे टप्पे
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या (Municipal Corporation Elections) प्रभागरचना ऑक्टोबर महिन्यात अंतिम होणार आहे. प्रभागरचना प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.

Municipal Corporation Elections : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या (Municipal Corporation Elections) प्रभागरचना ऑक्टोबर महिन्यात अंतिम होणार आहे. प्रभागरचना प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. महापालिका, नगरपालिका निवडणुका ऑक्टोबर महिन्यानंतरच होणार आहेत. महापालिका नगरपालिकांच्या प्रभाग रचना अंतिम करण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे. मुंबई महापालिका प्रभाग रचना 6 ऑक्टोबरनंतर अंतिम होणार आहे. तर ड वर्ग महापालिका प्रभाग रचना 13 ऑक्टोबरला अंतिम होणार आहे.
असे असणार महत्त्वाचे टप्पे
प्रारुप प्रभाग रचना तयार करणे
- यामध्ये जनगणनेची माहिती तपासणे, स्थळ पाहणी, गुगल मॅप वर प्रभागाचे नकाशे तयार करणे, प्रारूप प्रभाग रचनेचा मसुदा तयार करून त्यावर समितीने स्वाक्षऱ्या करणे. 17 जून ते 31 जुलै दरम्यान हे काम पूर्ण केले जाणार आहे.
- प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव नगरविकास विभागास सादर करणे - 1 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट
- प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव नगर विकास विभागाने राज्य निवडणूक आयोगाला सादर करणे - 6 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट
- राज्य निवडणूक आयोगाने प्रारूप प्रभाग रचनेस मान्यता देणे
- प्रारुप प्रभाग रचना प्रसिद्ध करणे व त्यावर हरकती मागवणे - 22 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट
- प्राप्त हरकती आणि सूचनांवर सुनावणी घेणे - 29 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर
- सुनावणीनंतर हरकती आणि सूचनांवर शिफारशी विचारात घेऊन प्राधिकृत अधिकाऱ्यांनी प्रभाग रचना अंतिम करून नगर विकास विभागाला पाठवणे
- अंतिम केलेली प्रभाग रचना नगर विकास विभागाने राज्य निवडणूक आयोगाला सादर करणे- 26 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर
- राज्य निवडणूक आयोग यांनी अंतिम प्रभाग रचनेला मान्यता देणे
- राज्य निवडणूक आयुक्त यांनी अंतिम प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करणे - 3 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबर
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार टप्प्यांमध्ये होणार आहेत. ऑक्टोंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच मतदानाला सुरुवात होणार आहे. याबाबत आता निवडणूक आयोग तयारी करत आहे. राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती, आदींच्या निवडणुका कधी कोरोनाच्या संसर्गाचे कारण देत, तर कधी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा समोर आणून घेतल्या गेल्या नाहीत. ओबीसी आरक्षण द्यायचे की नाही यावरसुद्धा बराच गदारोळ झाला. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर 2020 पासून राज्यात कुठे एकदा तर कुठे दोनदा, तीनदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी करण्यात आली होती. पण, या निवडणुका घेण्यात आलेल्या नाहीत.
महत्वाच्या बातम्या:
Municipal Elections 2025 : महापालिकेची खडाजंगी: मनसे आणि शिवसेना उबाठा गटाच्या संभाव्य युतीचा विदर्भात कुणाला फायदा? चारही महापालिकांमध्ये कोणाचे बलाबल?
























