एक्स्प्लोर

Maharashtra Elections 2022 : मोठी बातमी: 17 जिल्ह्यातील 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतीच्या निवडणुका स्थगित!

Maharashtra Elections 2022 : राज्यातील 92 नगर परिषदा आणि चार नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत.

Maharashtra Elections 2022 : राज्यातील 92 नगरपरिषदा आणि चार नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. 8 जुलै रोजी निवडणूक आयोगानं नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या. मात्र, ओबीसी आरक्षणाची सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. त्यामुळे 19 जुलै रोजी कोर्टात होणाऱ्या सुनावणीनंतरच पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. निवडणूक कार्यक्रम स्थगित झाल्यामुळे सर्व क्षेत्रात जाहीर करण्यात आलेली आचार संहिताही आता लागू होणार नाही.  निवडणूक आयोगाकडून याबाबतचे परित्रक काढण्यात आले आहे.  

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नयेत, अशी भूमिका राज्यातील सर्वच नेत्यांनी घेतली होती. यामध्ये सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचाही समावेश होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, नाना पटोले, पंकजा मुंडे, जयंत पाटील, धनंजय मुंडे यांच्यासह राज्यातील सर्वच नेत्यांनी ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नये अशी भूमिका घेतली होती. हे प्रकरण कोर्टात गेलेय. त्यामुळे आता 19 तारखेनंतरच पुढील निर्णय होण्याची शक्यता आहे. पुणे (Pune), सातारा, सांगली(Sangli), सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे (Dhule), नंदुरबार, जळगाव (jalgaon), अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड (Beed), उस्मानाबाद, लातूर (Latur), अमरावती आणि बुलढाणा या 17 जिल्ह्यातील 92  नगर परिषदा आणि चार नगरपंचायतीमध्ये निवडणुका होणार होत्या. 

निवडणूक आयोगानं परिपत्रकात काय म्हटलेय? 

राज्य निवडणूक आयागाचे दि. आठ जुलै 2022 रोजीच्या पत्रान्वये 17 जिल्ह्यातील 92 नगरपरिषदा व 4 नगर पंचायतींच्या सदस्या पदांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम 2022 दिला होता. 

सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका क्रमांक 19756/2021 ची सुनावणी दि. 12 जुलै 2022 रोजी झाली. त्यावेळी शासनाने समर्पित आयोगाने नागरिकांच्या मागसप्रवर्गाबाबत दिलेला अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला. सर्वोच्च न्यायालयाने या संर्भातील पुढील सुनावणी 19 जुलै 2022 रोजी ठेवलेली आहे. 

सदर पार्श्वभूमीच्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की, आयागाचे 8 जुलै 2022 रोजीच्या आदेशान्व्ये देण्यात आलेला राज्यातील 92 नगर परिषदा व चार नगरपंचायतींमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम 2022 याद्वारे स्थगित करण्यात येत आहे. सदर निवडणूकांसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम यथावकाश देण्यात येईल.  निवडणूक कार्यक्रम स्थगित झाल्यामुळे सर्व क्षेत्रात जाहीर करण्यात आलेली आचार संहिताही आता लागू होणार नाही. 

17 जिल्ह्यातील 92  नगरपरिषदा आणि चार नगरपंचायतीमध्ये निवडणुका स्थगित  -

अ वर्गातील ६ नगरपरिषदा-

भुसावळ (bhusaval)
बारामती (baramati)
बार्शी (barshi)
जालना (jalana)
बीड (Beed)
उस्मानाबाद उस्मानाबाद (Osmanabad)

ब वर्गातील २८ नगरपरिषदा- 
मनमाड (Manmad)
सिन्नर (Sinnar)
येवला (Yeola )
दौंडाईचा- वरवाडे (Dondaicha-Warwade)
शिरपूर- वरवाडे (Shirpur-Warwade) 
शहादा (Shahada)
अंमळनेर (Amalner)
चाळीसगाव (Chalisgaon )
कोपरगाव (Kopargaon)
संगमनेर (Sangamner)
श्रीरामपूर (Shrirampur)
चाकण (चाकण)
दौंड (Daund)
कराड (Karad)
फलटण (Phaltan)
इस्लामपूर (Islampur)
विटा (Vita)
अक्कलकोट (Akkalkot)
पंढरपूर (Pandharpur)
अकलूज (Akluj)
जयसिंगपूर (Jaysingpur)
कन्नड (Kannad)
पैठण (Paithan)
अंबेजोगाई (Ambajogai)
माजलगाव (Majalgaon )
परळी-वैजनाथ (Parli Vaijnath)
अहमदपूर (Ahmedpur)
अंजनगाव- सुर्जी  (Anjangaon Surji)

क वर्गातील नगरपरिषदा-

कोल्हापूर (Kolhapur )- 
कुरुंदवाड (Kurundwad)
मुरगुड (Murgud)
वडगांव (Vadgaon )
औरंगाबाद (Aurangabad)- 
गंगापूर (Gangapur )

क वर्गातील

(नाशिक, Nashik )
चांदवड   (Chandwad)
नांदगाव  (Nandgaon)
सटाणा (Satana)
भगूर (Bhagur)

(जळगाव, Jalgaon )
वरणगांव (Varangaon)
धरणगाव  (Dharangaon )
एरंडोल (Erandol)
फैजपूर  (Faizpur)
पारोळा (Parola )
यावल (Yawal)

(अहमदनगर Ahmednagar)
जामखेड (Jamkhed )
शेवगाव (Shevgaon )
देवळाली प्रवरा (Deolali Pravara)
पाथर्डी (Pathardi )
राहता (Rahata)
राहुरी (Rahuri)

(पुणे, Pune)
राजगुरु नगर (Rajgurunagar)
आळंदी (Alandi )
इंदापूर (Indapur )
जेजुरी  (Jejuri )
सासवड  (Saswad)
शिरुर  (Shirur)

(सातारा, Satara)
म्हसवड  (Mhaswad)
रहिमतपूर (Rahimatpur)
वाई (Wai)

(सांगली, Sangli)
आष्टा (Ashta)
तासगाव  (Tasgaon )
पलूस  (Palus)

(सोलापूर, Solapur)
मोहोळ (Mohol)
दुधनी (Dudhani)
करमाळा (Karmala )
कुर्डुवाडी (Kurduvadi )
मैंदर्गी (Maindargi)
मंगळवेढा (Mangalwedha )
सांगोला (Sangola)

(कोल्हापूर Kolhapur )
गडहिंग्लज (Gadhinglaj )
कागल (Kagal)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prakash Ambedkar Bag Checking : अकोल्यात प्रकाश आंबेडकरांचया बॅगची प्रशासनाकडून तपासणीAvinash Pandey on CM Post : मविआची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण? अविनाश पांडेंचं मोठं वक्तव्यManda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabhaSharad pawar Baramati : युगेंद्र पवराांसाठी शरद पवारांची सभा, मंचावर जोरदार स्वागत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Sharad Pawar : राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
Embed widget