Thane: ठाणेकरांनो सावधान! शहरात फिरतायेत दक्षिण आफ्रिकेतून आलेले सात जण, पालिकेकडून शोध सुरू
Thane Municipal Corporation: नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी, असे आवाहन महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.
Thane Municipal Corporation: दक्षिण आफ्रिकेमध्ये ओमिक्रॉन या विषाणूचा फैलाव वेगाने होत असल्यामुळे त्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात ज्या पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे. त्या सर्व सुविधा अद्ययावत ठेवण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या. ओमिक्रॉन या विषाणूच्या फैलावाचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिका सज्ज झाली आहे. नागरिकांनी या नव्या विषाणूबाबत घाबरुन न जाता आपल्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी, असे आवाहन महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.
नव्या विषाणूच्या फैलावाबाबत आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीकोनातून नागरिकांनी मास्क वापरणे, आवश्यकता नसल्यास गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, सोशल डिस्टन्सींगचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे आदीं गोष्टीचे पालन करणे गरजेचे असल्याचे या बैठकीत नमूद करण्यात आले. सद्यस्थितीत ठाणे महापालिकेच्या पार्किंगप्लाझा या कोविड रुग्णालयात आवश्यक औषधसाठा, व्हेटीलेंटर, ऑक्सीजन सुविधा व इतर वैदयकीय सुविधा तसेच रुग्ण्वाहिका सज्ज ठेवण्याच्या सूचना आरोग्य विभागास व सर्व अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी उपस्थित असलेले आयएमएचे अध्यक्ष व टाक्सफोर्स समितीचे सदस्य डॉ.संतोष कदम, डॉ. आनंद भावे, डॉ. योगेश शर्मा यांनीदेखील यांनी या नवीन विषाणूच्या फैलावाबाबत महापालिका अधिकाऱ्यांना माहिती देत करावयाच्या उपाययोजना करण्याच्या सूचना आरोग्यविभागाला दिल्या. ठाणे शहरात 12 नोव्हेंबरपासून आजपर्यत परदेशातून सात व्यक्ती ठाणे शहरात आलेल्या आहेत. त्यांच्याशी दैनंदिन संपर्क साधून त्यांची आरटीपीसीआर चाचणी करणे व आवश्यकता भासल्यास त्यांना कोरंटाईन करण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-