Maharashtra Rain LIVE | चंदगड तालुक्यातील कोवाड बाजार पेठेत पाणी शिरलं
Mumbai Rains Forecast and Alert LIVE Updates | मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात सलग दुसऱ्या मुसळधार पाऊस सुरुच आहे. पालघर जिल्ह्याला पावसाने झोडपून काढलं असून कोकणातही दमदार पाऊस सुरु आहे. याशिवाय कोल्हापुरातही पावसाचा जोर वाढला आहे.
LIVE
Background
मुंबई : मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात आजही मुसळधार पाऊस सुरुच आहे. सोमवारी रात्रीपासून सुरु झालेला पाऊस अद्यापही कायम आहे. पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं आहे. काही ठिकाणी झाडं कोसळण्याच्या घटनाही घडल्या. रेल्वे रुळावर पाणी आल्याने लोकलही अडकल्या होत्या. एनडीआरएफ जवानही मदतकार्यात गुंतले आहे. शिवाय ठाणे आणि पालघर जिल्ह्यालाही पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. हवामान विभागाने येत्या 24 तासास मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
तिकडे कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात दमदार पाऊस सुरु आहे. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून काही ठिकाणी बाजारपेठांमध्ये पाणी शिरलं आहे. रत्नागिरीत काही भागात वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने झाडं, विजेचे खांब कोसळून पडल्यामुळे विजेचा लपंडाव सुरु आहे.
तर कोल्हापुरातही जोरदार पाऊस कायम आहे. पंचगंगा नदीने यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच पात्र सोडलं आहे. पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली असून नदीशेजारच्या गावातील नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर केलं जात आहे. कोल्हापुरात धरणक्षेत्रातही पावसाचा जोर वाढला आहे.