(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भ्रष्टाचाराला चाप लावण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र यावं - दरेकर
Pravin Darekar : सर्वांनी एकत्रितपणे या भ्रष्टाचाराला चाप लावला पाहिजे मग ते सत्ताधारी असो की विरोधक. महाराष्ट्राचा नंबर लागला तर त्याचे खापर सत्ताधाऱ्यांवरती फोडायचं
मुंबई : भ्रष्टाचाराच मूल्यांकन करणारी सिस्टम आहे. ती लोकसंख्येच्या आधारावर असते. अनेक राज्य महाराष्ट्रच्या पुढे आहेत. मला तुलना करायची नाही. मूल्यमापनात मागील सरकारचा देखील काळ होता. त्यात आता कंट्रोल आणलं आहे. विरोधक ज्या पद्धतीने विरोध करत आहे अशा प्रकारची जाहीर वाचता करणे योग्य नाही. सरकारला मदत करून भविष्यात भ्रष्टाचार कमी कसा करता येईल, याची दक्षता घेणे गरजेचे आहे, असे प्रविण दरेकर म्हणाले.
सर्वांनी एकत्रितपणे या भ्रष्टाचाराला चाप लावला पाहिजे मग ते सत्ताधारी असो की विरोधक. महाराष्ट्राचा नंबर लागला तर त्याचे खापर सत्ताधाऱ्यांवरती फोडायचं. या अगोदर तुम्ही देखील सत्तेमध्ये होता, असा निशाणा दरेकरांनी विरोधकांवर लगावला.
राज ठाकरेंच्या ट्विटवर काय म्हणाले?
ढोंग आणि सोंग या राज्यामध्ये कोण कोण करतं, हे राज्यातील जनतेला नीट माहित आहे. देवेंद्र फडणवीस ढोंगी आहे की सोंगी आहे, त्या ठिकाणी निरपेक्षपणे, नीस्वार्थीपणे काम करणारे नेते आहेत, हे महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेवर चिखल फेकण्याचा प्रयत्न केला, असे दरेकर म्हणाले.
गुन्हे मागे घेण्याबाबत काय म्हणाले ?
आपण पुन्हा पाहिजे तर आपल्याकडे रेकॉर्ड असेल.देवेंद्र फडणवीस यांचं असं वक्तव्य होतं की तपासा अंती गुन्हे मागे घेऊ . त्यामुळे तपास होऊन जर तपासात निष्पन्न झालं असेल की पोलिसांनाही प्रतिकार करून जर पोलिसांवर त्या ठिकाणी हात उगारले असतील मारहाण झाली. तशा अर्थाने जे काही मागेपुढे होत असेल ते होईल. तपासाअंती गुन्हे मागे घेऊ बोलले तपास न करता गुन्हे मागे घेऊ असं म्हटले नव्हते.
फडणवीसांवर काय म्हणाले ?
राज्यकर्ता म्हणून राज्याचा गृहमंत्री म्हणून परिस्थिती हाताळणं हे त्यांच्यासमोर पहिलं आव्हान असते. त्या तत्कालीन परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी दिलगिरी व्यक्त केली. आपला इगो कमीपणा त्या ठिकाणी समजले नाही. तर त्यांना वातावरण शांत करणे ही प्रायोरिटी होती, म्हणून त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.
तसं देवेंद्र फडणवीस यांचं काही चुकलं नव्हतं. दिलगिरी मागण्याचा काहीच कारण नव्हतं, परंतु माझ्या इगोपेक्षा महाराष्ट्रला शांत होणं महत्त्वाचं आहे. तपासाअंती निर्णय घेऊ अशी भूमिका होती, असे दरेकर म्हणाले.
प्रफुल पटेल यांच्यावर काय म्हणाले ?
प्रफुल पटेल यांच्यावरती आरोप झाले. जेल झाली नाही, काही सिद्ध झाले नाही. आता नवाब मलिक यांचं प्रुफ झालेल आहे. त्यांच्यावर आरोप सिद्ध झालेत, त्याचे पुरावे देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. देशद्रोही म्हटलं त्याला सोबत घेणं हे नैतिकतेला धरून नाही, असे दरेकर म्हणाले. प्रफुल पटेल यांच्याबाबत असेल योग्य चौकशी होईल, असेही दरेकर म्हणाले.
NIA छापेमारीवर काय म्हणाले ?
NIA छापेमारीवर देखील विरोधक म्हणतील यामागे काहीतरी उद्देश आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा छापे मारते देशाच्या रक्षणासाठी हितासाठी हे छापेमारी मारत असे देश विघातक जी प्रवृत्ती आहे, ते थांबवण्यासाठी ही छापीमारी आहे. एका खासदाराच्या घरी 200 कोटी कॅश सापडली. त्याचा देखील समर्थन करणारे ट्विट अमोल कोल्हे करत असतील याच्या पेक्षा दुर्देवी नाही, असे दरेकर म्हणाले.
संजय राऊत यांच्यावर काय म्हणाले ?
संजय राऊत यांना बोलण्याचा धाडस कसे होतं. त्यांच्या इज्जतीचे दिंधोंडे अब्रू गेलेली आहे. पाटकर प्रकरण काय आहे. नैतिक गप्पा कोणी मारायच्या आपल्याकडे चार बोट आहेत त्याचा विचार पहिला करायचा. देवेंद्र फडणवीस यांच्या नैतिकीच्या आसपास संजय राऊत हे फिरकू शकत नाहीत.पाटकर प्रकरण काय झालं आहे, हे सर्वांनी पाहिलं आहे. आपण जेल मध्ये जाऊन आलात कुठला नैतिक अधिकार आहे. तुम्हाला बोलायचं ज्याची नैतिकता लोक पावली आहे, तो नैतिकेचा गप्पा मारत आहे.
उद्धव ठाकरे यांच्याबरोबर निष्ठा दाखवायच्या, बाळासाहेब शिवसैनिक बोलायचं आणि शरद पवार पायाशी घासण्याचे काम ते करत आहे. घाशीराम संजय राऊत यांनी स्वतःचा आपण काय घासतो आहोत, त्याचा विचार करावा, संजय राऊत म्हणाले.