सावधान! बूस्टर डोसच्या नावाखाली होऊ शकते फसवणूक, क्षणभरात बँक खाते होईल रिकामं
Online fraud over Covid booster dose : देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच आलेल्या ओमायक्रॉन या व्हेरियंटने चिंता वाढवली आहे.
Online fraud over Covid booster dose : देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच आलेल्या ओमायक्रॉन या व्हेरियंटने चिंता वाढवली आहे. याच पार्श्वभूमीवर ज्यांनी आतापर्यंत कोरोनाची लस घेतलेली नाही, त्यांनी लवकरात लवकर लस घ्यावी असं आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. 15 - 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणालाही सुरुवात झाली आहे. तसेच 10 जानेवारीपासून 60 वर्षांवरील नागरिकांना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना तिसरा डोस दिला जाणार, असल्याची घोषणा नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. देशातही लवकरच तिसऱ्या लसीच्या डोसला सुरुवात होण्याची शक्यता आहे. याच संधीचा गैर फायदा घेत ऑनलाईन गंडा घालण्याचा प्रकार होऊ शकतो. बूस्टर डोसच्या नावाखाली फसवणूक होण्याची शक्यता आहे, काही ठिकाणी अशाप्रकराच्या घटनाही समोर आल्या आहेत. बूस्टर डोसच्या नावाखाली ऑनलाईन गंडा घालण्यात येत असल्याचा प्रकार काही ठिकाणी उघडकीस आला आहे. त्यामुळे पोलिसांकडून सतर्क राहण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.
बूस्टर डोस देण्याच्या नावाखाली सायबर गुन्हेगार सर्वसामान्य लोकांना फसवतात. सर्वसामान्य लोकांना फोन करुन बूस्टर डोससाठी नोंदणी करण्यास सांगितली जाते. त्यानंतर रजिस्टर करायचं आहे, असे सांगत तुमचं आधारकार्ड आणि पॅनकार्डची माहिती घेतात. त्यानंतर मोबाईलवर येणारा ओटीपी क्रमांक विचारतात, त्यानंतर संपूर्ण बँक खात्यावरील रक्कम लंपास केली जाते. त्यामुळे तुम्हाला अशाप्रकराचा फोन आल्यास सावध राहा.
कोरोना रुग्णाची संख्या दिवसागणिक वाढत आहे, या पार्श्वभूमीवर काही तज्ज्ञांकडून बूस्टर डोसची शिफारस करण्यात आली आहे. याचाच फायदा घेत सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करत आहे. मोबाईलवर फोन करुन अथवा लिंक पाठवत लोकांना आपल्या जाळ्यात ओढत आहेत. बूस्टर डोसबाबत बनावट मेसेज अथवा लिंक पाठवली जात आहे. त्यानंतर बँक तपशील, ओटीपी क्रमांक घेऊन खात्यातून पैसे लंपास करण्यात येत आहेत.
काय काळजी घ्याल?
बूस्टर डोससाठी फोन आल्यास विश्वास ठेवू नका. कुणालाही आपली वैयक्तिक माहिती पाठवू नका, असं आवाहन सायबर तज्ज्ञांनी केलं आहे.
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live