एक्स्प्लोर

खुशखबर! मध्य वैतरणा धरणातून 26.5 मेगावॉट संकरीत वीजनिर्मिती; वर्षाला सुमारे 9 कोटी रूपयांची होणार बचत

Mumbai News : मध्य वैतरणा धरण या ठिकाणी तरंगता सौरऊर्जा आणि जलविद्युत निर्मिती असलेला संकरित ऊर्जा प्रकल्प बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्प विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे.

Mumbai News मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा धरण या ठिकाणी तरंगता सौरऊर्जा आणि जलविद्युत निर्मिती असलेला संकरित ऊर्जा प्रकल्प बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्प विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. त्यातून एकूण 26.5 मेगावॅट (संकरित) वीज निर्मितीसाठी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. आगामी अडीच वर्षांच्या कालावधीत या प्रकल्पातून वीजनिर्मिती सुरू होणे अपेक्षित आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या या संकरित (हायब्रीड) वीजनिर्मिती प्रकल्पामुळे जवळपास 9 कोटी  रूपये इतकी वार्षिक बचत करणे शक्य होणार आहे. 

वर्षाला सुमारे 9 कोटी रूपयांची होणार बचत

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा धरणाच्या जलाशयाच्या मुंबईला दैनंदिन 455 दशलक्ष लिटर इतक्या पाण्याचा पुरवठा होतो. मुंबईच्या पाणीपुरवठा यंत्रणेत या धरणाचा 11 टक्के इतका वाटा आहे. या तलावाची एकूण साठवण क्षमता ही 1 लाख 93 हजार 530 दशलक्ष लिटर इतकी आहे. या प्रकल्पाच्या ठिकाणी सौरऊर्जा आणि जलविद्युत निर्मितीसाठी वैतरणा सोलार हायड्रो पॉवर जेनको कंपनीसोबत ऊर्जा खरेदी करार करण्यात आली  आहे. या  प्रकल्पातून निर्माण होणारी वीज प्रति युनिट 4.75 रूपये या समतुल्य दराने खरेदी करण्यात येणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनीमार्फत ही वीज राज्याच्या ग्रीडला जोडून वाहून नेण्यात येईल.

तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत वीज वितरण कंपनी (महावितरण) सोबत करार करण्यात येईल. वीज खरेदीसाठीचा महावितरणसोबतचा करार आगामी काळात करण्यात येईल. या वीजखरेदी करारामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पिसे पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रात लागणारी वीजवापराच्या मोबदल्यात जवळपास 9  कोटी रूपयांची बचत होणे अपेक्षित आहे. 

20 मेगावॅट इतकी वीज निर्मिती करणे शक्य 

जलविद्युत प्रकल्पाच्या ठिकाणी 10 मेगावॅटचे दोन जनरेटरच्या माध्यमातून 20 मेगावॅट इतकी वीज निर्मिती करणे शक्य होणार आहे. या प्रकल्पाशी संबंधित सर्व पर्यावरणीय तसेच वैधानिक परवानग्या घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. डिसेंबर 2024 पर्यंत या प्रकल्पाची वित्तीय परिनिश्चिती होणे अपेक्षित आहे. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरूवात होताना दोन वर्षांच्या कालावधीत या प्रकल्पाच्या ठिकाणी वीजनिर्मिती होणे अपेक्षित आहे.

25 वर्षांची देखभाल आणि दुरूस्तीची जबाबदारी पुरवठादार कंपनीची

सौरविद्युत निर्मितीच्या प्रकल्पाच्या ठिकाणी एकूण 6.5 मेगावॅट इतकी वीजनिर्मिती होणे अपेक्षित आहे. फ़्लोटिंग सोलर  या तंत्रज्ञानावर आधारित वीजनिर्मिती या प्रकल्पाच्या ठिकाणी करण्यात येणार आहे. एकूण ८.५ हेक्टर क्षेत्रफळाच्या पाण्यावर हा तरंगता सौरऊर्जा प्रकल्प व्यापलेला असेल. बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा (Build, operate and transfer) या तत्वावर प्रकल्प आधारित आहे. प्रकल्पाचे संचलन सुरू झाल्यापासून पुढील २५ वर्षांची देखभाल आणि दुरूस्तीची जबाबदारी ही सेवा पुरवठादार कंपनीची असेल.

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Embed widget