एक्स्प्लोर

महायुतीत राष्ट्रवादीला झुकतं माप? विधानसभेच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शाहांसोबत अजित पवारांची वेगळ्या फिल्डिंगच्या चर्चा

अमित शाहांच्यादौऱ्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने जागावाटपचा विषय चंगालाच लावून धरला असल्याची माहिती पुढे आली आहे. जवळपास 10 जागा आणखी मिळाव्यात, ही मागणी त्यांनी यावेळी केलीय.

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीत राज्यात आणि विशेषत: विदर्भात जबर दणका बसल्यानंतर आता भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी (State Legislative Assembly Election 2024) चांगलीच कंबर कसली आहे. त्यासाठी भाजपचे  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे नुकतेच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येऊन गेले आहेत. दरम्यान, अमित शाह (Amit Shah) यांनी भाजप नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तर आगामी निवडणुकांसाठीचे आपले प्रमुख उद्दिष्ट  सांगत पूर्ण ताकदीने कामाला लागण्याच्या सूचना ही  त्यांनी दिल्या आहेत.

दरम्यान, यावेळी महायुतीच्या जागावाटापाबाबत अमित शाह (Amit Shah) यांच्या सोबत महत्वाची चर्चा झाल्याची माहिती आहे. अशातच आता  महायुतीच्या गोटातून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. अमित शाहांच्यादौऱ्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने जागावाटपचा विषय चंगालाच  लावून धरला असल्याची माहिती पुढे आली आहे. जवळपास 10 जागा आणखी मिळाव्यात, ही मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

गृहमंत्री अमित शाहांसोबत अजित पवारांची वेगळी फिल्डिंग? 

भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)हे काल (मंगळवारी) महाराष्ट्राच्या दौऱ्यानिमित्य मुंबईत येऊन गेलेत. त्यांच्या या मुंबई दौऱ्यादरम्यान विमानतळापासून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते अमित शाहांच्या मागे होते. काल विमानतळावर अमित शाहांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel)आणि सुनिल तटकरे (Sunil Tatkare) भेटले. त्यानंतर रात्री फक्त दोन्ही उपमुख्यमंत्री आणि अमित शाह यांच्या बराच वेळ चर्चा झाली. त्यांनतर आज पुन्हा सकाळी भाजप,राष्ट्रवादीचे नेते अमित शाहांना भेटले आणि आज अमित शाह माघारी गेल्यानंतर परत विमानतळावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार,सुनिल तटकरे, प्रफुल पटेल यांनी भेट घेतल्याची माहिती आहे. 

दरम्यान, भेटींचे हे सत्र लक्षात घेता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला हे माहिती आहे की, मुख्यमंत्री शिंदे यांची शिवसेना आणि भाजप त्यांना जास्त जागा देणार नाही. म्हणून अमित शाहांकडे अजित पवार फिल्डिंग लावत असल्याचे बोलले जात आहे. परिणामी, म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी यावेळी भेटणे टाळलं असावं, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.  

सह्याद्री अतिथीगृहावर भाजपची महत्त्वाची बैठक

विधानसभा निवडणुकीत भाजपने 150 ते 160 जागांवर लढण्याचा चंग बांधला आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी मुंबईत महत्त्वाच्या घडामोडी सुरु आहेत. सह्याद्री अतिथीगृहावर अमित शाह यांची महायुती आणि भाजपच्या नेत्यांसोबत बैठक सुरु आहे. महायुतीचा राज्यातील नेत्यांची वादातीत जागांवर चर्चा पार पडल्यानंतर आजच्या बैठकीत अमित शाह यांच्याकडे या जागांची माहिती देण्यात येणार आहे. या बैठकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप नेते गणेश नाईक यांनी अमित शाह यांची भेट घेतली.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra News Live Updates: भाजप नगरसेवक लक्ष्मण जंगम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल; एबीपी माझाच्या बातमीनंतर पोलिसांची कारवाई
Maharashtra News Live Updates: भाजप नगरसेवक लक्ष्मण जंगम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल; एबीपी माझाच्या बातमीनंतर पोलिसांची कारवाई
Sushma Andhare on Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस, तुम्ही महिलांना तुच्छ लेखता, तुमच्यात चांगदेवाचा अहंकार भरलाय; सुषमा अंधारेंची टीका, मुख्यमंत्र्यांचं 'ते' आव्हानही स्वीकारलं
देवेंद्र फडणवीस, तुम्ही महिलांना तुच्छ लेखता, तुमच्यात चांगदेवाचा अहंकार भरलाय; सुषमा अंधारेंची टीका, मुख्यमंत्र्यांचं 'ते' आव्हानही स्वीकारलं
Tushar Doshi: तुषार दोशींसह राज्यातील 9 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; दोशींना साताऱ्यातील कामगिरीबद्दल शिक्षा बक्षीस? सगळेच कोड्यात
तुषार दोशींसह राज्यातील 9 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; दोशींना साताऱ्यातील कामगिरीबद्दल शिक्षा बक्षीस? सगळेच कोड्यात
Ahilyanagar Crime News: संगमनेरच्या भोंदू गडगेला महावितरणचा शॉक! दत्तधाम आश्रमात मीटर बायपास करून चोरली वीज; पोलिसांनंतर आता महावितरणची मोठी कारवाई
संगमनेरच्या भोंदू गडगेला महावितरणचा शॉक! दत्तधाम आश्रमात मीटर बायपास करून चोरली वीज; पोलिसांनंतर आता महावितरणची मोठी कारवाई

व्हिडीओ

Parth Pawar On Baramati Bypoll : बारामतीत मुद्दाम काही लोकांना उभा केला, पार्थ पवार यांचा मोठा आरोप
Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amravati Video Viral : महागडे मोबाईल अन् मुलींवर उडवण्यासाठी पैशांचा हव्यास! आईचे दागिने विकून अयान अहमद पूर्ण करायचा शौक; थार गाडी मालकाचाही मोठा खुलासा
महागडे मोबाईल अन् मुलींवर उडवण्यासाठी पैशांचा हव्यास! आईचे दागिने विकून अयान अहमद पूर्ण करायचा शौक; थार गाडी मालकाचाही मोठा खुलासा
Devendra Fadnavis and Prajakt Tanpure: देवेंद्र फडणवीस फोनवर मोजून तीन वाक्य बोलले, प्राजक्त तनपुरेंना एका मिनिटात माघार घ्यायला लावली, नेमकं काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस फोनवर मोजून तीन वाक्य बोलले, प्राजक्त तनपुरेंना एका मिनिटात माघार घ्यायला लावली, नेमकं काय म्हणाले?
Raigad Crime news: माणगावच्या लॉजवर सफाई कर्मचाऱ्याने दरवाजा उघडताच दिसलं भयानक दृश्य, तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ
माणगावच्या लॉजवर सफाई कर्मचाऱ्याने दरवाजा उघडताच दिसलं भयानक दृश्य, तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ
Highest Paid Indian Actors 2026: देशातला सर्वात महागडा स्टार कोण? दोन वर्षांपासून एकही फिल्म नाही, तरीसुद्धा सलमान-शाहरुख-आमिर पेक्षा जास्त फी घेतोय 'हा' सुपरस्टार
देशातला सर्वात महागडा स्टार कोण? दोन वर्षांपासून एकही फिल्म नाही, तरीसुद्धा सलमान-शाहरुख-आमिर पेक्षा जास्त फी घेतोय 'हा' सुपरस्टार
Maharashtra Weather Updates मोठी बातमी: पुढील 3 तासांत मुंबईसह ठाणे, पालघर रायगडमध्ये पावसाचा इशारा; मंत्रालयाकडून सतर्कतेचा इशारा
मोठी बातमी: पुढील 3 तासांत मुंबईसह ठाणे, पालघर रायगडमध्ये पावसाचा इशारा; मंत्रालयाकडून सतर्कतेचा इशारा
Maharashtra Live blog updates: भाजप नगरसेवक लक्ष्मण जंगम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल; एबीपी माझाच्या बातमीनंतर पोलिसांची कारवाई
Maharashtra Live blog updates: भाजप नगरसेवक लक्ष्मण जंगम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल; एबीपी माझाच्या बातमीनंतर पोलिसांची कारवाई
Dhurandhar 2 vs Vaazha 2: ना कोणता बडा हिरो, ना हिरोईन; तरीसुद्धा 'धुरंधर 2'ला पाजलं पाणी, 'या' फिल्मनं बजेटच्या 20 पट केलीय कमाई
ना कोणता बडा हिरो, ना हिरोईन; तरीसुद्धा 'धुरंधर 2'ला पाजलं पाणी, 'या' फिल्मनं बजेटच्या 20 पट केलीय कमाई
Sunetra Pawar and Sharad Pawar: अजितदादांच्या बारामतीत सांगता सभा, देवेंद्र फडणवीस प्रचारसाठी येणार, शरद पवारांचं काय, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
अजितदादांच्या बारामतीत सांगता सभा, देवेंद्र फडणवीस प्रचारसाठी येणार, शरद पवारांचं काय, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
Embed widget