एक्स्प्लोर
पनवेल महानगरपालिका स्थापन करण्यास हायकोर्टाची परवानगी
पनवेल : पनवेल नगरपालिकेचे रुपांतर महानगरपालिकेत करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला परवानगी दिली आहे. पनवेल महापालिका करण्याचा निर्णय एका आठवड्यात घ्या आणि त्याची प्रक्रिया पूर्ण करा, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.
याप्रकरणी श्रीनंद पटवर्धन यांनी जनहित याचिका दाखल केली होती. महानगरपालिकेसाठी तीन लाख लोकसंख्या आवश्यक आहे. जर पनवेल महानगरपालिकेत 68 गावांचा समावेश होणार असून त्यांची सध्याची लोकसंख्या सुमारे साडेपाच लाख आहे. त्यामुळे या नगरपालिकेचे महानगरपालिकेत रुपांतर करावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
येत्या 22 नोव्हेंबरला पनवेल नगरपरिषदेचा कार्यकाळ संपत आहे. त्यानंतर निर्णय घेऊन पनवेल महापालिका केल्यास ते योग्य ठरणार नाही. त्यामुळे आताच निर्णय घ्या, असा आदेश न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभूदेसाई यांच्या खंडपीठाने दिला आहे.
पनवेल नगरपालिकेची स्थापना 1864 मध्ये झाली होती. सर्वात जुनी नगरपालिका म्हणून या नगरपालिकेची ओळख आहे. या नगरपालिकेचे महानगरपालिकेत रुपांतर करावं, असा ठराव वेळोवेळी करण्यात आला. मात्र याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
भारत
महाराष्ट्र
नाशिक
Advertisement