एक्स्प्लोर

राज ठाकरेंना हायकोर्टाचा दिलासा, मनसेसह इतर काही पक्षांविरोधातील याचिका हायकोर्टानं फेटाळली

निवडणुकीमध्ये इतर पक्षांच्या जाहिरनाम्यावर मतदारांना जागरुक करण्यासाठी जाहीर सभा घेण्याला राजकीय पक्षांना परवानगी आहे. त्यामुळे त्यामध्ये आयोगाच्या निर्णयानुसार कार्यवाही होते, हायकोर्टानं निर्देश देण्याचा गरज नाही. त्यामुळे हायकोर्टानं ही याचिका नामंजूर करत फेटाळून लावली.

मुंबई : निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाचा उमेदवार जरी निवडणूक लढत नसला तरी त्यांना जाहीर सभा घेण्याचा अधिकार आहे, असे स्पष्ट मत मुंबई उच्च न्यायालयानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह अन्य काही राजकीय पक्षांना मोठा दिलासा दिला आहे. उमेदवार लढत नसलेल्या पक्षातील नेत्यांना जाहीर सभा घेण्यास मनाई करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. पुण्यातील सामाजिक कार्यकर्ता संदीप गिड्डे यांनी अॅड. अविनाश आव्हाड आणि अॅड. सूरज चकोर यांच्यामार्फत दाखल केलेल्या जनहित याचिकेवर बुधवारी मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेने देशभरात एकही उमेदवार उभा केला नव्हता. तरीही राज ठाकरेंनी राज्यभरात जाहीर सभा आणि पदयात्रा काढल्या होत्या. त्यांच्या या सभांच्या खर्चाच्या तपशील, कोणत्या उमेदवारासाठी ते हा खर्च दाखवणार आहेत? याची स्पष्टता होणे आवश्‍यक आहे. जर या गोष्टींची पूर्तता झाली नाही तर भविष्यात निवडणुकीमध्ये जिथ मनसेचा उमेदवार नाही तिथं त्यांना मनसेसह जाहीर सभेसाठी परवानगी देऊ नये आणि दिली असल्यास रद्द करावी, अशा प्रमुख मागण्या या याचिकेत करण्यात आल्या होत्या. राजकीय पक्ष कोणताही असला तरी तो आचारसंहितेच्या कक्षेत येतो, त्यामुळे त्याच्या सर्व तरतुदींना ते पात्र आहेत. मग उमेदवार असो किंवा नसो, असं मत हायकोर्टानं व्यक्त केलं. तसेच खर्चाबाबत निवडणूक आयोगाने यापूर्वीच संबंधित पक्षाला निर्देश दिलेले आहेत असेही यावेळी कोर्टाला सांगण्यात आलं. निवडणुकीमध्ये इतर पक्षांच्या जाहिरनाम्यावर मतदारांना जागरुक करण्यासाठी जाहीर सभा घेण्याला राजकीय पक्षांना परवानगी आहे. त्यामुळे त्यामध्ये आयोगाच्या निर्णयानुसार कार्यवाही होते, हायकोर्टानं निर्देश देण्याचा गरज नाही. त्यामुळे हायकोर्टानं ही याचिका नामंजूर करत फेटाळून लावली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक

कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 

भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला

40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Somnath Suryawanshi Mother|मला न्याय मिळाला नाही मी इथेच जीव देते, सोमनाथ सूर्यवंशींच्या आईचा आक्रोशManoj jarange Health : अशक्तपणा, पोटदूखी, पाच दिवसाच्या उपोषणानंतर जरांगे रुग्णालयात दाखलPlane book for Yatra Kolhapur : भादवणकरांचा नाद खुळा, गावच्या यात्रेला थेट विमान बूक, मुंबईतून रवानाPune Police on Sam David | सॅमचा बॉलिवूड ते आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा प्रवास, पोलिसांकडून पर्दाफाश

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार

'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा

सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे

Embed widget