Aryan Khan Drugs Case : शाहरुखनं भाजप प्रवेश केला, तर ड्रग्सची पिठी साखर होईल : छगन भुजबळ
Aryan Khan Drugs Case : जर शाहरुख खाननं भाजपमध्ये प्रवेश केला तर अंमली पदार्थ पिठी साखर होतील, असं म्हणत छगन भुजबळ यांनी भाजपला चिमटा काढला आहे.
Aryan Khan Drugs Case : नागरी आणि अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मुंबई क्रूझ ड्रग्स केस प्रकरणावरुन भाजप (BJP) ला टोला लगावला आहे. छगन भुजबळ यांनी भाजपला फैलावर घेत म्हटलं की, जर बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) भाजपमध्ये गेला तर ड्रग्ज पिठीसाखर होतील. दरम्यान, या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शाहरुख खानचा मुलगा अटकेत आहे. सध्या तो आर्थर रोड तुरुंगात आहे. आर्यनच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी पार पडणार आहे.
शाहरुख खान एनसीबीच्या रडारवर : छगन भुजबळ
छगन भुजबळ यांनी आरोप लावलाय की, गुजरातच्या मुंद्रा बंदरात मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. परंतु, या प्रकरणाचा तपास करण्याऐवजी केंद्रीय तपास यंत्रणा शाहरुख खानच्या मागे लागल्या आहेत.
...तर ड्रग्स पिठी साखर बनतील : छगन भुजबळ
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) चे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनी भाजपला टोला लगावत म्हटलं की, "जर शाहरुख खाननं भाजपमध्ये प्रवेश केला तर अंमली पदार्थ पिठी साखर होतील." समता परिषद - एनसीपीच्या एका कार्यक्रमात छगन भुजबळ यांनी म्हटलं की, महाराष्ट्र सरकारनं ओबीसी कोट्यावर एका अध्यादेश पारित केला होता. परंतु, तिथेही भाजपच्या एका पदाधिकाऱ्यानं न्यायालयात आव्हान दिलं होतं.
रद्द झालेल्या ओबीसी आरक्षणाला अध्यादेश आणून महाविकास आघाडी सरकारनं हा प्रश्न मार्गी लावला आहे. हा निर्णय छगन भुजबळ यांच्यामुळे होऊ शकला आणि म्हणून समता परिषद आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काल (शनिवारी) बीडमध्ये छगन भुजबळ यांचा कृतज्ञता सोहळा पार पडला. या सोहळ्यामध्ये छगन भुजबळा नि शेरो शायरी करत विरोधकांचे ही चिमटे काढले. पेट्रोल महाग झालं म्हणून आम्ही डिझेलच्या गाड्या घेतल्या, डिझेल महाग झाले म्हणून सिएनजीच्या गाड्या घेतल्या. पण तोही महागला नंतर आम्ही इलेक्ट्रिक गाड्या घेतल्या. पण आता म्हणाले कोळसाच संपला. असं म्हणत वाढत्या महागाईवर भुजबळ यांनी बोट ठेवलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :