Aryan Khan : काय सांगता? आर्यन खान तुरुंगात वाचतोय राम-सितेवर आधारित पुस्तक
क्रुझ ड्रग्ज प्रकरणी अटकेत असलेला Aryan Khan तुरुंगात वाचतो राम-सीतेवर आधारित पुस्तके
Aryan Khan Read Books In Jail : क्रुझ ड्रग्ज प्रकरणी अटकेत असलेला आर्यन खान (Aryan Khan) सध्या मुंबईतील आर्थर रोडवरील तुरुंगात कैद आहे. तुरुंगातील वेळ घालवण्यासाठी अनेकजण काहीतरी उद्योग करत असतात. पण आर्यन खान चक्क राम-सीतेवर आधारित पुस्तके वाचतोय अशी माहिती आहे.
क्रुझ ड्रग्ज प्रकरणी सुनावणीवेळी न्यायालयानं आर्यनची कोठडी 30 ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे आर्यनला आणखी दहा दिवस तुरुंगातच राहणार आहे. गेल्या 14 दिवसांपासून तुरुंगात असणाऱ्या आर्यनला आणखी काही दिवस आर्थर रोडमध्ये राहावं लागणार आहे. एनसीबीच्या सुत्रांच्या माहितीनुसार, उच्च न्यायालयाकडून आर्यन खानची सुटका होऊ नये यासाठी एनसीबी पूर्ण प्रयत्न करत आहे.
आर्यन खानला भेटण्यासाठी शाहरुख खान दोन दिवसांपूर्वी तुरुंगात गेला होता. जेलमध्ये कैद्यांसोबत संवाद साधण्यासाठी असलेल्या विशेष खोलीत आर्यन आणि शाहरुख एकमेकांना भेटले. पण या खोलीत फायबर ग्लासची एक भलीमोठी भिंत बसवलेली होती. त्यामुळे इंटरकोमच्या मदतीने आर्यन आणि शाहरुखने संवाद साधला.
Mumbai Drug Case: आर्यन खानला गांजा दिला होता, अनन्याने NCB ला दिली माहिती
तुरुंगात कैद्यांना आपला वेळ घालवण्यासाठी पुस्तके वाचता येतात. त्यासाठी कैद्यांना तुरुंगातील वाचनालयाचा वापर करता येतो. आर्यन तुरुंगात सध्या गोल्डन लायन आणि राम-सीतेवर आधारित पुस्तकाचे वाचन करतो आहे. एनसीबीच्या तुरुंगातील वाचनालयात शेकडो पुस्तकं उपलब्ध आहे. या वाचनालयात आधीच्या कैदींनी त्यांच्या नातेवाईकांकडून मागवलेली काही पुस्तकेदेखील आहेत. जेलमध्ये एक टीव्हीदेखील आहे. त्यात बातम्या, क्रिकेट, सिनेमे कैद्यांना पाहता येतात. तर विकेंण्डला कैदी खेळदेखील खेळतात. आर्यन सुरक्षारक्षकांव्यतिरिक्त इतर कैद्यांसोबत दिसून आलेला नाही.
अनन्याची चौकशी का केली जात आहे?
अनन्या पांडेची गुरुवारी सुमारे 2 तास चौकशी करण्यात आली. अनन्या पांडेला ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानसोबत झालेल्या चॅटच्या आधारावर बोलावले होते. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चॅटमध्ये असा आरोप केला जात आहे की अनन्या गांजाबद्दल बोलत होती. आर्यन त्या चॅटमध्ये गांजाची व्यवस्था करण्याबद्दल बोलत होता असाही आरोप आहे. मात्र, पहिल्याच दिवशी चौकशीदरम्यान अनन्याने आरोप नाकारले होते.