एक्स्प्लोर

Mumbai Drug Case: आर्यन खानला गांजा दिला होता, अनन्याने NCB ला दिली माहिती

Aryan Khan Case : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाच्या चौकशीदरम्यान अनन्या पांडे हिने धक्कादायक खुलासा केला आहे.

आर्यन खान प्रकरणाच्या चौकशीदरम्यान अनन्या पांडे हिने धक्कादायक खुलासा केला आहे. आर्यन खानला गांजा दिल्याची कबुली अनन्यानं एनसीबीच्या चौकशीदरम्यान दिली आहे. आर्यन खानसोबत झालेल्या चॅटिंगवरुन एनसीबी अनन्याची चौकशी करत आहे. शुक्रवारी चौकशीदरम्यान अनन्यानं आर्यनला एक ते दोन वेला गांजा दिल्याची कबुली दिली आहे. पण आपण कोणत्याच्या ड्रग्ज सप्लायरच्या संपर्कात नसल्याचेही यावेळी तिने एनसीबीला सांगितलं. एनसीबीनं अनन्याला सकाळी 11 वाजता चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं. मात्र अनन्या दुपारी 2 वाजता पोहोचली, त्यामुळं समीर वानखेडे यांनी तिला खडेबोल सुनावले. समीर वानखेडे यांनी म्हटलं की, तुम्हाला 11 वाजता बोलावलं आणि आपण आता आलात. अधिकारी तुमची वाट पाहात बसलेले नाहीत. हे तुमचं प्रोडक्शन हाऊस नाही. हे  सेंट्रल एजेंसीचं ऑफीस आहे. ज्यावेळेवर बोलावलं आहे, त्याच वेळेवर पोहोचा, अशी तंबीही त्यांनी अनन्याला दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  

चौकशीदरम्यान अनन्याने अनेक गोष्टींचे खुलासे केले. एनसीबीच्या चौकशीत अनन्या पांडेने मान्य केलं की तिने आर्यन खानला वीड म्हणजेच गांजा आणून दिला होता पण ती कुठल्याही ड्रग्स सप्लायरच्या संपर्कात नव्हती. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जे चॅट एनसीबीच्या हाती लागले आहेत त्यानुसार, अनन्या पांडेने एनसीबीला सांगितलं की ती गांजा सप्लाय करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीच्या संपर्कात नाही. मात्र तिचा एक मित्र आहे जो खूप मोठा व्यक्ती आहे. त्याला सांगितल्यावर तो गांजा अरेंज करून देतो. आर्यन खानच्या सांगण्यावरून फक्त एकदा किंवा दोनदाच त्याला गांजा आपल्या या मित्राकडून मागून दिला.  अनन्याच्या मित्राने त्याच्या घरी काम करणाऱ्या कर्मचाऱ्याकडून गांजा पाठवला होता..असं अनन्याने एनसीबीला सांगितलं. हा गांजा अनन्याने आपल्या स्टाफ द्वारे कलेक्ट केला होता जे नंतर तिने आर्यनला दिला.

शुक्रवारी पहाटे एनसीबीची टीम या हाऊस स्टाफ ला घेऊन एनसीबी कार्यालयात पोहोचली होती. ज्याचा उल्लेख अनन्या पांडे आणि आर्यन खानच्या चॅट मध्ये केला होता. या हाऊस स्टाफ कर्मचाऱ्याला काल सायंकाळी एनसीबी ने जाऊ दिलं मात्र सोमवारी त्याला पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.  तसेच या हाऊस स्टाफ कर्मचार्‍याचा फोन एनसीबी ने जप्त केला आहे.

एनसीबी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हाउस स्टाफ कर्मचाऱ्यांकडून करण्यात आलेल्या चौकशीमध्ये आणि मोबाईलच्या चॅटच्या माध्यमातून एका बड्या आणि नावाजलेल्या सेलिब्रिटीच ड्रग्स कनेक्शन समोर आला आहे. अनन्या पांडेच्या दोन्ही मोबाईल मधला डेटा काढण्याचं काम एनसीबी कडून करण्यात येत आहे. ज्यामुळे अनन्या खरं बोलत आहे की खोटं हे तपासून पाहिलं जाऊ शकेल आणि म्हणून तिला सोमवारी पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आला आहे. अनन्या पांडे हिने एनसीबी ला सांगितलं की एकाच गेट-टुगेदरमध्ये तिने फक्त एक किंवा दोन पफ याचे ट्राय केले होते मात्र तिने कधीच ड्रग्स सप्लाय केले नाही आणि त्याचा सेवनही करत नाही. मित्रांच्या गेट-टु गेदर मध्ये अनन्या जर मुंबईत असली तर ती थेट गेट-टुगेदर मध्ये जायची तिथे आर्यन खान सुद्धा असायचा त्या गेट-टुगेदर मध्ये तिने काही मित्रांना गांजाचं सेवन करताना पाहिला आहे, मात्र हा गांजा त्या पार्टी मध्ये कसा आला किंवा कोणी आणला याची आपल्याला माहिती नसल्याच अनन्याने एनसीबी सांगितलं. 

अनन्याची चौकशी का केली जात आहे?
अनन्या पांडेची गुरुवारी सुमारे 2 तास चौकशी करण्यात आली. अनन्या पांडेला ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानसोबत झालेल्या चॅटच्या आधारावर बोलावले होते. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चॅटमध्ये असा आरोप केला जात आहे की अनन्या गांजाबद्दल बोलत होती. आर्यन त्या चॅटमध्ये गांजाची व्यवस्था करण्याबद्दल बोलत होता असाही आरोप आहे. मात्र, पहिल्याच दिवशी चौकशीदरम्यान अनन्याने आरोप नाकारले होते.

चौकशीच्या पहिल्या दिवशी काय झालं?
गुरुवारी, जेव्हा अनन्या पांडे तिचे वडील चंकी पांडे यांच्यासह NCB च्या झोनल हेड क्वार्टरमध्ये दुपारी 4 च्या सुमारास पोहोचली, तेव्हा चंकी पांडेला चौकशीतून बाहेर बसवले गेले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास अधिकारी व्ही.व्ही.सिंग, झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि एका महिला अधिकाऱ्याने अनन्या पांडेची चौकशी केली.

महत्त्वाच्या बातम्या

Ramayan Release Date:4000 कोटींच्या 'रामायण'च्या रिलीज डेटबाबत मोठा ट्विस्ट! भारतात अन् परदेशात वेगवेगळ्या तारखांना होणार रिलीज, कधी येणार?
4000 कोटींच्या 'रामायण'च्या रिलीज डेटबाबत मोठा ट्विस्ट! भारतात अन् परदेशात वेगवेगळ्या तारखांना होणार रिलीज, कधी येणार?
Mitali Mayekar Kanyadaan Onscreen Father: ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
Colors Marathi Serials: स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
CID Fame Actor Vivek: CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget