Coastal Road Tunnel Leakage : मुंबई कोस्टल रोडवरील बोगद्यात लिकेज; मुंबई महापालिकेने नेमके काय उपाय केले?
Coastal Road Tunnel Leakage : मुंबई किनारी रस्त्याच्या भूमिगत बोगद्याच्या भिंतीत असलेल्या काही जोडणी सांध्यातून पाणी झिरपल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे महापालिकेने यावर उपाय करून हे थांबवलं आहे.
Costal Road Project मुंबई : मुंबई किनारी रस्त्याच्या भूमिगत बोगद्याच्या (Mumbai Coastal Road) भिंतीत असलेल्या काही जोडणी सांध्यातून पाणी झिरपल्याचे निदर्शनास आले आहे. 300 मीटरच्या लांबीतील अंतरात पाच ठिकाणी पाणी झिरपत असून दोन साध्यांमध्ये हे पाणी झिरपत आहे. परंतु तीन सांध्यात केवळ ओलसरपणा दिसून आला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने यावर काही उपाय करून हे थांबवलं आहे. यात जोडणीच्या दोन सांध्यामध्ये टाकण्यात आलेले सिलिंगचे सोल्यूशन (केमिकल) मध्ये अंतर निर्माण झाल्याने प्रथमदर्शनी पाणी गळती होत असावी, असा मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.
अशी केली उपाययोजना
मुंबई किनारी रस्त्याच्या भूमिगत बोगद्यातील जोडणी सांध्यात इंजेक्शनद्वारे पॉलिमर ग्राऊट सोडण्यात आले. त्यामुळे सांध्याच्या ठिकाणी पाणी झिरपणे थांबले आहे. सिमेंट कॉक्रिटमध्ये असलेली पोकळी भरून काढण्यासाठी हे पॉलिमर ग्राऊट मदत करते. या गळतीमुळे बोगद्याचा बांधकाम दर्जा किंवा वाहतुकीवर कोणताही परिणाम होणार नाही. असे सांगण्यात आले आहे.
पॉलिमर ग्राऊटींग म्हणजे काय?
सिमेंट काँक्रिटच्या बांधकामात काही कन्स्ट्रक्शन जाईंट असतात. त्यातून जमिनीत असलेले पाणी झिरपते. त्या भेंगामध्ये इंजेक्शनद्वारे ग्राऊटींग केले जाते. ज्यामुळे या कन्स्ट्रक्शन जाईंटमध्ये हे केमिकल शिरून त्याचा संपर्क जॉईंटमध्ये येणाऱ्या पाण्याशी येतो. ग्राऊट प्रसरण पावते आणि पाणी येणे आपोआप बंद होते. म्हणजेच जमिनीत असलेले कन्सट्रक्शन जाईंट भरले जातात. एकदा पॉलिमर ग्राऊटींग केल्यानंतर पुढील सात ते आठ दिवस त्याचे निरीक्षण केले जाते. त्यानंतर हे कन्स्ट्रक्शन जाईंट पूर्णपणे बंद झाल्याचा अनुमान काढला जातो.
मुंबई किनारी रस्त्याच्या भूमिगत बोगद्यातील जोडणी सांध्यातून पाणी झिरपल्याचे दिसून आले आहे. त्याबाबत तज्ज्ञांमार्फत अभ्यास करून भविष्यात आणखी पूरक उपाययोजना करण्यात येतील. मुंबई किनारी रस्त्याच्या भूमिगत बोगद्याच्या डावी आणि उजवीकडे असलेल्या भिंतीमध्ये 40 जोडणी सांधे आहेत. या 40 जोडणी सांध्यांपैकी ज्या सांध्यातून पाणी झिरपत आहे किंवा ज्याच्या आजूबाजूला ओलावा आला आहे, अशा जोडणी सांध्यांवर ही प्रक्रिया करण्यात येईल.
मुंबईसाठी महत्त्वकांक्षी प्रकल्प
मुंबईच्या दृष्टिकोनातून महत्वकांक्षी असलेला हा प्रकल्प तितकाच खर्चिक आहे. या रोडमुळे मुंबई आणि उपनगरातील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. मुंबईचा कोस्टल रोड प्रकल्प हा दोन भागात विभागला गेला आहे. दक्षिण भाग आणि उत्तर भाग असे हे दोन भाग आहेत. यामध्ये दक्षिण भागाचं काम आधी हाती घेण्यात आलं आहे. मुंबई ते कांदिवली दरम्यान जवळपास 29 किलोमीटरचा हा कोस्टल रोड प्रकल्प आहे. दक्षिण कोस्टल प्रकल्प हा साडेदहा किलोमीटरचा आहे जो मरीन ड्राईव्हच्या प्रिन्सेस स्ट्रीट फ्लाओवर पासून सुरू होतो ते वरळी वांद्रे सी-लिंकपर्यंत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या