एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबईतील 1993 बॉम्बस्फोटप्रकरणी 6 दोषी, 1 निर्दोष
मुंबई: मुंबईतील 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी आरोपी मुस्तफा डोसा, अबू सालेमसह 6 जणांना दोषी ठरवलं आहे. तर एका आरोपीची निर्दोष सुटका होणार आहे. विशेष टाडा कोर्टानं हा महत्वपूर्ण निकाल दिला.
डॉन अबू सालेम, मुस्तफा डोसा, फिरोज खान, ताहिर मर्चंट, रियाज सिद्दीकी आणि करीमुल्लाह शेख यांना दोषी ठरवण्यात आलं आहे.
तर अब्दुल्ल कय्यूम हा मात्र सर्व आरोपातून मुक्त झाला असून, कोर्टाने त्याला निर्दोष ठरवलं आहे.
कट रचणे, हत्या आणि टाडा कलमांअंतर्गत आरोपींना दोषी ठरवण्यात आलं. मात्र 25 वर्षानंतर दिलेल्या निर्णयाला न्याय म्हणायचं कसं हाच प्रश्न आता उपस्थित होत आहे.
दरम्यान कोर्टाची आजची कारवाई पूर्ण झाली असून सोमवारीपासून दोषींवर शिक्षेसंदर्भात सुनावणी सुरु होणार आहे.
LIVE UPDATE
- 1993 मुंबई बॉम्बस्फोट- कट रचणे, हत्याप्रकरणी मुस्तफा डोसा टाडा कायद्याप्रमाणे दोषी
- आरोपी फिरोज खान आणि ताहीर मर्चंट कट रचणे, हत्या आणि टाडा कलमांअंतर्गत दोषी
- करीमुल्ला शेख दोषी, टाडा कोर्टाचा निकाल
- अबू सालेम दोषी
- भारताविरोधात युद्ध पुकारल्याच्या आरोपातून सर्व आरोपांची मुक्तता
12 मार्च, 12 स्फोट: 1993 मध्ये कुठे आणि कसे स्फोट झाले?
आरोपींमध्ये अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम, मुस्तफा डोसा, फिरोज खान, ताहिर मर्चंट, रियाज सिद्दीकी, करीमुल्लाह शेख आणि अब्दुल कय्यूम यांचा समावेश होता. आजच्या सुनावणीसाठी अबू सालेम संपूर्ण टक्कल करुन आणि काळे कपडे घालून कोर्टात आला होता. तर निकालाचं टेन्शन असल्याची प्रतिक्रिया मुस्तफा डोसाने एबीपी माझाकडे व्यक्त केली. साखळी बॉम्बस्फोटात एकूण 129 आरोपी असून 100 आरोपींना टाडा न्यायालयाने दोषी ठरवून 6 महिने ते मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा त्यांच्यावरील आरोपांनुसार सुनावली आहे. तर दाऊद इब्राहिम, टायगर मेमन, अनीस इब्राहीम यांसह एकूण 27 आरोपी अजूनही फरार आहेत. 12 मार्च 1993 साखळी बॉम्बस्फोट 12 मार्च 1993 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 257 जण मृत्युमुखी पडले होते. तर 713 जण जखमी झाले होते. एकूण 27 कोटी रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान झालं होतं. तर बॉम्बस्फोट घडवण्यासाठी 3 हजार किलो आरडीएक्स पाकिस्तानातून आणले होते. त्यापैकी फक्त 10 टक्के आरडीएक्सचा वापर केला होता. या बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार म्हणून याकूब मेमनला फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानुसार त्याला फाशी देखील देण्यात आली. संबंधित बातम्या12 मार्च, 12 स्फोट: 1993 मध्ये कुठे आणि कसे स्फोट झाले?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement