(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बारामतीकरांच्या दबावाला बळी न पडता पंढरपूर-फलटण मार्गाला मुख्यमंत्र्यांनी निधी द्यावा : खासदार रणजित निंबाळकर
पंढरपूर-फलटण या नवीन रेल्वे मार्गाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निम्मा निधी द्यावा, अशी मागणी खासदार रणजित निंबाळकर यांनी केली. माढा लोकसभा मतदार संघातील रेल्वेच्या समस्यांबांबत शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
बारामती : केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मंजूर केलेल्या पंढरपूर-फलटण या नवीन रेल्वे मार्गाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निम्मा निधी द्यावा, आशी मागणी खासदार रणजित निंबाळकर यांनी केली आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील रेल्वे प्रश्नावर बोलण्यासाठी आज पंढरपूर येथे रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक बोलावण्यात आली होती. माढा लोकसभा मतदारसंघातील फलटण, वाठार, पंढरपूर, माळशिरस, सांगोला आणि माढ्यातील रेल्वे प्रश्नावरील जवळपास 500 विविध मागण्या यावेळी लोकप्रतिनिधींनी केल्या.
या मार्गाला जवळपास पावणे बाराशे कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. त्यातील 50 टक्के निधी केंद्र सरकार देणार आहे. उर्वरित 50 टक्के निधी राज्य सरकारने द्यावा अशी आम्हाला आशा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंढरपूरकरांना नाराज करणार नाहीत. बारामतीकरांचा कुठलाही दबाव न बाळगता मुख्यमंत्री निधी देतील, असं रणजित निंबाळकर यांनी म्हटलं. माढा लोकसभा मतदार संघातील रेल्वे बाबतच्या समस्याबांबत शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, आमदार बबनदादा शिंदे, प्रशांत परिचारक, अकलुजचे सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील, रेल्वेचे महाप्रबंधक संजीव मित्तल, मंडल रेल प्रबंधक शैलेश गुप्ता, अप्पर मंडल रेल्वे प्रबंधक सहर्ष वाजपेयी, वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक प्रदिप हिरडे, वरिष्ठ मंडल प्रबंधक पी.के चतुर्वेदी, मंडल सुरक्षा आयुक्त मिथुन सोनी यांच्या रेल्वे प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
यावेळी खासदार रणजितसिंह निबांळकर बोलताना म्हणाले, नागरिकांना रेल्वेचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाकडून सोयी-सुविधा मिळण्याबाबतच्या सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. रेल्वेच्या काही अंडरग्राऊंड ब्रिज आहेत त्याठिकाणी पावसाळ्यात पाणी साठते. वाहतूक व्यवस्थेला अडचणी निर्माण होतात. यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना खासदार रणजित निंबाळकर यांनी दिल्या.
इतर बातम्या
'नीरा देवघर'चा वाद कोर्टात, खासदार रणजित निंबाळकर यांचा आंदोलनाचा इशारा
कालवा समितीतून समर्थकांना डावललं, खा. निंबाळकरांचा आरोप, जयंत पाटलांकडून कृतीचं समर्थन