एक्स्प्लोर
जळगावात आईविरुद्ध मुलगा लढत रंगणार!
जळगाव : राजकारणाच्या आखाड्यात महाराष्ट्राने काका-पुतण्याचा राजकीय संघर्ष आतापर्यंत पाहिला असेल. मात्र आता जळगावातील म्हसावद बोरनार गटात आईविरुद्ध मुलगा अशी लढत पाहायला मिळणार आहे. आईला भाजपकडून तर मुलाला शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे.
सुरेश जैन यांचे कट्टर समर्थक दिवंगत भिला गोटू सोनवणे यांचं जळगाव तालुक्यात म्हसावद बोरनार गटात चांगलं वर्चस्व होतं. गेल्या निवडणुकीत हा गट महिला राखीव झाल्याने त्यांच्या पत्नी लीलाबाई सोनावणे तेथून निवडून आल्या. मात्र दीर्घ आजाराने भिला गोटू सोनवणे यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर ही पहिलीच जिल्हा परिषद निवडणूक असल्याने त्यांच्या जागेचा वारसदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पवन हे त्यांच्या दुसऱ्या पत्नीचे चिरंजीव आहेत. पवन आणि लीलाबाई सोनावणे या दोघांनी शिवसेनेकडे आपली उमेदवारी मागितली होती. मात्र शिवसेनेने पवन यांना उमेदवारी दिल्याने लीलाबाईंनी भाजपाचा रस्ता धरला. त्यांना आता भाजपने उमेदवारी दिली आहे.
पवन भाजपमध्ये येणार असेल तर आपण आपली उमेदवारी मागे घेऊ, असं त्यांनी पवनला सांगितलं होतं. पवनला आपल्या विरोधात उभं करून आमच्या घरातील राजकारण संपवण्याचा विरोधकांचा डाव असल्याचं लीलाबाईंचं म्हणणं आहे.
मात्र शिवसेनेमुळे आपल्या वडिलांना या ठिकाणी निवडून येता आलं. त्यामुळे आपण शिवसेनेसोबत एकनिष्ठ असून भाजपमध्ये जाणार नाही, अशी भूमिका पवन यांनी घेतली. त्यामुळे आता आईविरुद्ध मुलगा, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
ठाणे
Advertisement