एक्स्प्लोर
Advertisement
अंथरुणात निघाला विषारी मण्यार साप, परभणीत कुटुंबाची उडाली घाबरगुंडी
झोपेतून उठल्यानंतर अंथरुणाची घडी करताना खाली साप दिसला आणि तो ही अत्यंत विषारी मण्यार. कुणाचीही घाबरगुंडी उडेल असाच प्रकार परभणी शहरातील मातोश्रीनगरमध्ये घडलाय.
परभणी : कल्पना करा, तुम्ही रात्रभर शांत झोपलात, सकाळी आरामात उठलात, आळस झटकलात आणि अंथरुण काढायला घेतलं. आणि त्याच वेळी तुमच्या अंथरुणातून एका विषारी सापाचे तुम्हाला दर्शन झाले. कल्पनेनेच अंगावर काटा उभारला ना...! पण ही घटना प्रत्यक्षात घडलीय. परभणीतील मातोश्रीनगरमध्ये. या प्रकाराने त्या कुटुंबाची प्रचंड घाबरगुंडी उडाली. मात्र सर्पमित्राने वेळीच सापाला पकडुन कुटुंबाला धीर देत भयमुक्त केलं आहे.
मातोश्री नगर येथे राहणाऱ्या माटेगावकर कुटुंबातील रंजनाताई या सकाळी साडेपाचला उठल्या. सकाळी उठल्याबरोबर त्या अंथरूण काढत होत्या. अंथरुण काढत असताना अंथरुणाखाली त्यांना साप दिसला. त्यानंतर त्यांनी या अंथरुणावर झोपलेल्या इतर सदस्यांना तात्काळ उठवले. सापाला पाहताच सर्वांची घाबरगुंडी उडाली. माटेगावकर कुटुंबाने तात्काळ ही बाब सर्पमित्रांना कळवली. सर्पमित्र रंजीत कारेगावकर यांनी तात्काळ माटेगावकर यांच्या घरी धाव घेतली. त्यावेळी त्यांना माहीत पडलं की हा साप अत्यंत विषारी म्हणून ओळखला जाणार मण्यार आहे. या सापाला पकडून कारेगावकर यांनी प्रथम कुटुंबाला भयमुक्त केले. महत्त्वाचं म्हणजे हा साप रात्रभर या अंथरुणा खाली होता. पण सुदैवाने या सापाने कुणालाही काहीही इजा पोहोचवली नाही.
मन्यार हा नागापेक्षा ही विषारी साप म्हणून ओळखला जातो. तो रात्री वावरतो, त्यामुळे नाईट रायडर अशी त्याची ओळख आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असून या दिवसात हा साप रात्री घरात देखील प्रवेश करु शकतो. त्यामुळे नागरिकांनी या दिवसात खाली झोपताना योग्य ती खबरदारी घेऊन झोपण्याचे आवाहन सर्पमित्र रंजीत कारेगावकर यांनी केले आहे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
भारत
क्रिकेट
Advertisement