Morning Headlines 16th June : मॉर्निंग न्यूजमध्ये वाचा, देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
1. Cyclone Biparjoy : बिपरजॉय चक्रीवादळामुळं गुजरातमध्ये 22 जण जखमी तर 23 जनावरांचा मृत्यू, 940 गावातील विजपुरवठा खंडीत
Cyclone Biparjoy : बिपरजॉय (Cyclone Biparjoy) चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टी भागात धडकलंय. लॅंडफॉलची प्रक्रिया पूर्ण झाली असून, नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. ताशी तब्बल 145 किलोमीटर वेगाने धडकलेल्या चक्रीवादळानंतर गुजरातमध्ये मोठं नुकसान झालं आहे. या चक्रीवादळामुळं चक्रीवादळामुळे 22 लोक जखमी झाले आहेत तर 23 जनावरांचा मृत्यू झाला आहे. 524 झाडे उन्मळून पडली असून अनेक ठिकाणी विजेचे खांब पडले आहेत. त्यामुळे 940 गावातील वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. वाचा सविस्तर
2. Biparjoy Cyclone : बिपरजॉय चक्रीवादळाचा प्रभाव कायम; 18 जून पर्यंत 99 ट्रेन रद्द, पश्चिमी रेल्वेकडून नवीन अपडेट जारी
Cyclone Biparjoy Update : बिपरजॉय चक्रीवादळामुळे अनेक ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. बिपरजॉय चक्रीवादळ (Cyclone Biporjoy) गुरुवारी रात्री गुजरात किनारपट्टीवर धडकलं. बिपरजॉयमुळे झालेला परिणाम पाहता पश्चिम रेल्वेने 18 जूनपर्यंत 99 गाड्या रद्द केल्या आहेत. गुजरात आणि राजस्थानमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील चार दिवस राजस्थान, पंजाब, हरियाणा, नवी दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. वाचा सविस्तर
3. Wrestlers Protest: "बृजभूषण सिंह दोषीच, तसं आरोपपत्रात नमूद आहे, पण..."; दिल्ली पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टनंतर साक्षी मलिकचं वक्तव्य
Sakshi Malik On Wrestlers Protest: दिल्ली पोलिसांनी गुरुवारी (15 जून) भारतीय कुस्ती महासंघाचे निवर्तमान अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं आहे. क्रीडामंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांच्या आश्वासनानंतर कुस्तीपटूंनी 15 जूनपर्यंत आंदोलन स्थगित केलं होतं. अनुराग ठाकूर यांनी 15 जूनपर्यंत बृजभूषण यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं जाईल, असं आश्वासन कुस्तीपटूंना दिलं होतं. आता याप्रकरणी ऑलिम्पिक पदक विजेत्या साक्षी मलिकनं (Sakshi Malik) मोठं वक्तव्य केलं आहे. वाचा सविस्तर
4. Rajasthan : राजस्थान सरकारकडून रक्षाबंधनची खास भेट, स्मार्टफोन घेण्यासाठी महिलांच्या खात्यात जमा करणार रक्कम; नागरिकांना इतर योजनांऐवजीही पैसे देण्याची योजना
Rajasthan Election 2023 : राजस्थान विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांची सरकारकडून विविध योजना लागू केल्या जात आहेत. मुख्यमंत्री अशोक गेहलोत वचनपूर्ती करताना दिसत आहे. काही महिन्यांवर आलेल्या निवडणुकांआधी राजस्थान सरकारकडून महिलांना रक्षाबंधनची खास भेट देण्याची योजना आहे. दरम्यान, या योजनेमध्ये सरकार महिलांना स्मार्टफोन भेट देण्याऐवजी त्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याच्या विचारात आहे. राजस्थान सरकार यासाठी नवीन योजना लागू करण्याच्या तयारीत आहे. वाचा सविस्तर
5. शत्रूची झोप उडवणारं घातक ड्रोन खरेदी करणार भारत, अमेरिकेसोबतच्या करारासाठी DACकडून प्रस्ताव मंजूर
MQ-9 Reaper Armed Drone Deal: संरक्षण अधिग्रहण परिषदेनं (DAC) गुरुवारी (15 जून) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या अमेरिका दौऱ्यापूर्वी अमेरिकन कंपनी जनरल अॅटोमिक्सकडून प्रीडेटर MQ-9B रीपर (MQ-9B Reaper) ड्रोन खरेदी करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. भारत अमेरिकेकडून असं तब्बल 30 ड्रोन खरेदी करणार आहे. भारतीय नौदलाकडे हे दोन ड्रोन आधीच भाड्यानं आहेत. MQ-9B रीपर हे जगातील सर्वात घातक ड्रोन मानलं जातं. वाचा सविस्तर
6. Balbharati Book : बालभारतीच्या पुस्तकातून QR कोड वगळला, डिसले गुरुजींची नाराजी; कोडचा समावेश करण्याची मागणी
Balbharati Book : राज्यातील शाळा कालपासून (15 जून) सुरू झाल्या आहेत. पहिल्याच दिवशी ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी नाराजीचं ट्वीट केलं आहे. कारण पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शासनातर्फे पुस्तके देण्यात आली आहेत, पण या पुस्तकांत QR कोड (QR code) नाहीत. रणजितसिंह डिसले (Ranjitsinh Disale) यांच्या संकल्पनेतून शिक्षण अधिकरंजक करण्याच्या हेतूने पुस्तकांमध्ये QR कोडचा समावेश करण्यात आला होता. QR कोडमुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन ऑडिओ आणि व्हिडिओ रुपात अभ्यासक्रम शिकता येत होते. मात्र, हेच क्यूआर कोड पुस्तकातून काढल्याने त्यावर डिसले सरांनी ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे. वाचा सविस्तर
7. 16th June In History: लोकमान्य टिळकांची तुरुंगातून सुटका, प्रफुल्लचंद्र रे यांचे निधन, उत्तराखंडमध्ये ढगफुटी; आज इतिहासात...
16th June In History: आजच्या दिवशी इतिहासात महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. आजच्या दिवशी ब्रिटिशांनी राजद्रोहाच्या गुन्ह्यात अटक केलेल्या लोकमान्य टिळकांची मंडालेच्या तुरुंगातून सुटका करण्यात आली. तर, भारतात रसायन व औषधनिर्मिती उद्योगाची मुहूर्तमेढ रोवणारे रसायनशास्त्रज्ञ प्रफुलचंद्र रे यांचा आज स्मृतीदिन आहे. अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवसही आहे. आजच्या दिवशी 2013 मध्ये त्सुनामीनंतरची सर्वात मोठी नैसर्गिक आपत्ती उत्तराखंडमध्ये ढगफुटी झाली. वाचा सविस्तर
8. Horoscope Today 16 June 2023 : आज 'या' राशीच्या लोकांना होणार आर्थिक लाभ; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य
Horoscope Today 16 June 2023 : आज शुक्रवार हा एक महत्त्वाचा दिवस आहे. वृषभ राशीच्या लोकांच्या नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. तर तूळ राशीच्या बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याची चिन्हे आहेत. आज कुंभ राशीला सावध राहण्याची गरज आहे. मेष ते मीन राशीसाठी आजचा सोमवार कसा राहील? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर