एक्स्प्लोर

शत्रूची झोप उडवणारं घातक ड्रोन खरेदी करणार भारत, अमेरिकेसोबतच्या करारासाठी DACकडून प्रस्ताव मंजूर

Defence Deal: भारत अमेरिकेकडून अत्यंत घातक 'MQ-9B रीपर' ड्रोन खरेदी करणार आहे. पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यापूर्वी संरक्षण अधिग्रहण परिषदेनं ड्रोन कराराचा प्रस्ताव मंजूर केला आहे.

MQ-9 Reaper Armed Drone Deal: संरक्षण अधिग्रहण परिषदेनं (DAC) गुरुवारी (15 जून) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या अमेरिका दौऱ्यापूर्वी अमेरिकन कंपनी जनरल अॅटोमिक्सकडून प्रीडेटर MQ-9B रीपर (MQ-9B Reaper) ड्रोन खरेदी करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. भारत अमेरिकेकडून असं तब्बल 30 ड्रोन खरेदी करणार आहे. भारतीय नौदलाकडे हे दोन ड्रोन आधीच भाड्यानं आहेत. MQ-9B रीपर हे जगातील सर्वात घातक ड्रोन मानलं जातं.

ड्रोन खरेदीचा करार सुमारे तीन अब्ज डॉलर्सचा : सूत्र

वृत्तसंस्था पीटीआयनं सूत्रांच्या हवाल्यानं माहिती दिली की, चीनच्या सीमेवर सशस्त्र दलांची देखरेख करण्यासाठी तेवढ्या सक्षम उपकरणांची गरज आहे. त्यासाठी अमेरिकेकडून MQ-9B प्रीडेटर ड्रोन खरेदी केले जाणार आहेत. सुमारे तीन अब्ज डॉलर्सचा हा खरेदी करार असून, त्यासाठी संरक्षण मंत्रालयानं हिरवा कंदील दिला आहे.

मोदी-बायडन भेटीनंतर घोषणा होण्याची शक्यता 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन पुढील आठवड्यात व्हाईट हाऊसमध्ये भेटणार आहेत. दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर ड्रोन खरेदी करण्यासंदर्भातील कराराची घोषणा होण्याची शक्यता आहे. डीएसीच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत ड्रोन खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली आहे.

हे ड्रोन सागरी निगराणीसह अनेक गोष्टींसाठी सक्षम

MQ-9B रीपर्स ड्रोनचे दोन प्रकार आहेत, जे स्काय गार्डियन आणि सी गार्डियन म्हणून ओळखले जातात. भारताच्या तिन्ही सशस्त्र दलांसाठी 'सी गार्डियन' प्रकार खरेदी करण्यात आला आहे. हे ड्रोन सागरी देखरेखीसाठी वापरले जाऊ शकतात, तसेच पाणबुडीविरोधी युद्धासह विविध भूमिका बजावू शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेकडून खरेदी करण्यात येणार्‍या 30 ड्रोनपैकी 14 नौदलाला, तर हवाई दल आणि लष्कराला प्रत्येकी आठ ड्रोन मिळू शकतात.

अमेरिकेकडून ड्रोन खरेदी करण्याची इच्छा भारत पूर्वीपासूनच दाखवत आला आहे. मात्र, काही अडचणींमुळे ही ड्रोन डील लांबत गेली आहे. आता पंतप्रधान मोदी वॉशिंग्टन दौऱ्यावर जाणारच आहेत, तर त्यापूर्वी ही डील फायनल व्हावी यासाठी अमेरिकेचं परराष्ट्र खातं, पेंटागॉन आणि बायडेन सरकार हे मिळून प्रयत्न करत आहेत. अशातच पंतप्रधान मोदी 22 जून रोजी अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे आता मोदींच्या दौऱ्यावेळीच ड्रोन डील होण्याची शक्यता आहे. 

MQ-9 Reaper Armed ड्रोनची वैशिट्य 

जनरल अ‍ॅटोमिक्सने बनवलेलं MQ9 हे ड्रोन विशेषतः सागरी युद्धांसाठी वापरलं जातं. क्वाड देशांपैकी भारत वगळता सर्वांकडे हे ड्रोन आहेत. या ड्रोनचं वैशिष्ट म्हणजे, केवळ सर्विलियन्स नाही तर अटॅक करण्यासाठीही या ड्रोनचा वापर करता येतो. सॅटेलाईटनं ऑपरेट करता येणारं हे ड्रोन 45 हजार फूट उंच उडू शकतं. एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल 35 तास हे ड्रोन वापरता येऊ शकतं. यासोबतच यात रेडार आणि अत्याधुनिक सेन्सर लावण्यात आले आहेत. या ड्रोनमध्ये मिसाईल आणि गनपावडर ठेवता येते.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
Crime News: नवऱ्याला मारून नीळ्या ड्रममध्ये भरणाऱ्या मुस्कानची इच्छा ऐकून भुवया उंचावल्या; प्रियकराला दाखवायचाय झालेल्या मुलीचा चेहरा!
नवऱ्याला मारून नीळ्या ड्रममध्ये भरणाऱ्या मुस्कानची इच्छा ऐकून भुवया उंचावल्या; प्रियकराला दाखवायचाय झालेल्या मुलीचा चेहरा!
IndiGo Flight Crisis: इंडिगो एअरलाईन्सचं प्रवाशांसोबत धक्कादायक कृत्य, नागपुरातून पुण्याला निघालेल्या प्रवाशांना हैदराबादला नेऊन सोडलं, एक तास डांबून ठेवलं
इंडिगो एअरलाईन्सचं प्रवाशांसोबत धक्कादायक कृत्य, नागपुरातून पुण्याला निघालेल्या प्रवाशांना हैदराबादला नेऊन सोडलं, एक तास डांबून ठेवलं
Pune Crime News: पुण्यात भरदिवसा जादूटोणा? बंद घराच्या दारात दही, भात, लिंबू ठेवून नारळ फोडलं; परिसरात खळबळ
पुण्यात भरदिवसा जादूटोणा? बंद घराच्या दारात दही, भात, लिंबू ठेवून नारळ फोडलं; परिसरात खळबळ
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Election Politics : राजकराण बेभान, राडेबाजीला उधाण; मतदान झालं, गोंधळ सुरूच..Special Report
Wedding Fight : लग्नाचा मंडप की कुस्तीचा फड? अजब लग्नांच्या गजब कहाण्या Special Report
Godwoman Defrauded : माझाची काठी, वसूल 14 कोटी, माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट Special Report
IndiGo Plane : इंडिगो जमिनीवर, खोळंब्याचा टेक ऑफ, सेवा विस्कळित का झाली? Special Report
Sayaji Shinde :सयाजींची भूमिका सत्ताधाऱ्यांना पटेना, वृक्षतोडीला सयाजी शिंदेंचा विरोध Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
Crime News: नवऱ्याला मारून नीळ्या ड्रममध्ये भरणाऱ्या मुस्कानची इच्छा ऐकून भुवया उंचावल्या; प्रियकराला दाखवायचाय झालेल्या मुलीचा चेहरा!
नवऱ्याला मारून नीळ्या ड्रममध्ये भरणाऱ्या मुस्कानची इच्छा ऐकून भुवया उंचावल्या; प्रियकराला दाखवायचाय झालेल्या मुलीचा चेहरा!
IndiGo Flight Crisis: इंडिगो एअरलाईन्सचं प्रवाशांसोबत धक्कादायक कृत्य, नागपुरातून पुण्याला निघालेल्या प्रवाशांना हैदराबादला नेऊन सोडलं, एक तास डांबून ठेवलं
इंडिगो एअरलाईन्सचं प्रवाशांसोबत धक्कादायक कृत्य, नागपुरातून पुण्याला निघालेल्या प्रवाशांना हैदराबादला नेऊन सोडलं, एक तास डांबून ठेवलं
Pune Crime News: पुण्यात भरदिवसा जादूटोणा? बंद घराच्या दारात दही, भात, लिंबू ठेवून नारळ फोडलं; परिसरात खळबळ
पुण्यात भरदिवसा जादूटोणा? बंद घराच्या दारात दही, भात, लिंबू ठेवून नारळ फोडलं; परिसरात खळबळ
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यालयात क्लास वन अधिकारी असल्याचे सांगत हिरे व्यापाऱ्याला कोट्यवधी रुपयांचा गंडा!
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यालयात क्लास वन अधिकारी असल्याचे सांगत हिरे व्यापाऱ्याला कोट्यवधी रुपयांचा गंडा!
Maharashtra Local Body Election: नगरपालिकांचे निकाल मागे-पुढे घेणार नाही, 21 तारखेलाच मतमोजणी, सुप्रीम कोर्टाचे निर्देश
मोठी बातमी : नगरपालिकांचे निकाल मागे-पुढे घेणार नाही, 21 तारखेलाच मतमोजणी, सुप्रीम कोर्टाचे निर्देश
Nandurbar News: सारंगखेडा अश्वबाजारातून 11 लाखांना 'नुकरा' घोडीची खरेदी, पुण्यातील भाजप आमदाराच्या पुत्राचे अश्वप्रेम; घोडीची वैशिष्ट्यं काय?
सारंगखेडा अश्वबाजारातून 11 लाखांना 'नुकरा' घोडीची खरेदी, पुण्यातील भाजप आमदाराच्या पुत्राचे अश्वप्रेम; घोडीची वैशिष्ट्यं काय?
बायकोनं बॉयफ्रेंडच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, विष दिलं, पण परिणाम झाला नाही, प्लॅन बी केला, घरातील कुत्रं भुकता नये म्हणून त्यालाही बेशुद्ध करून..
बायकोनं बॉयफ्रेंडच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, विष दिलं, पण परिणाम झाला नाही, प्लॅन बी केला, घरातील कुत्रं भुकता नये म्हणून त्यालाही बेशुद्ध करून..
Embed widget