एक्स्प्लोर

Horoscope Today 16 June 2023 : आज 'या' राशीच्या लोकांना होणार आर्थिक लाभ; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

Horoscope Today 16 June 2023 : आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? मेष ते मीन राशीच्या सर्व राशींसाठी दिवस कसा असेल? राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 16 June 2023 : आज शुक्रवार हा एक महत्त्वाचा दिवस आहे. वृषभ राशीच्या लोकांच्या नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. तर तूळ राशीच्या बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याची चिन्हे आहेत. आज कुंभ राशीला सावध राहण्याची गरज आहे. मेष ते मीन राशीसाठी आजचा सोमवार कसा राहील? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य.

मेष 

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. व्यवसाय करणारे लोक व्यवसायाला पुढे नेण्यात यशस्वी होतील. आज दिलेली कामे वेळेवर पूर्ण करा. वडिलांच्या माध्यमातून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांना तुमच्या जीवनात विशेष महत्त्व असेल. आज तुमचा जोडीदार तुमच्यासाठी काहीतरी खास प्लॅन करणार आहे. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांचा सन्मान वाढताना दिसेल. आज तुम्हाला तुमच्या गोड बोलण्याने लाभ मिळेल. विद्यार्थी मोठ्या मनाने अभ्यास करताना दिसतील. बदलत्या हवामानामुळे आरोग्यात चढ-उतार दिसून येतील. आज तुम्हाला दूरच्या नातेवाईकाकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. आजूबाजूला होणाऱ्या भजन आणि कीर्तनात सहभागी व्हा. 

वृषभ 

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरीच्या शोधात जे फिरत आहेत त्यांना चांगली नोकरी मिळण्याचे संकेत आहेत. नोकरदार लोकांना त्यांच्या नोकरीत बदल पाहायला मिळतील. तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रगतीमुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल. पालकांचा सहवास आणि सहकार्य मिळेल. आज तुम्ही तुमच्या मुलांबरोबर थोडा वेळ घालवा, ज्यामुळे तुम्हाला खूप ताजेतवाने वाटेल. वडिलोपार्जित व्यवसाय करणारे व्यवसायात काही बदल करतील. आज तणावापासून दूर राहण्यासाठी संगीत ऐका. आज जरा तब्येतीची काळजी घ्या आणि खाण्यापिण्यापासून दूर राहा. पोटाशी संबंधित कोणतीही समस्या तुम्हाला त्रास देऊ शकते. तुम्हाला ओळखीतून उत्पन्नाचे काही स्रोत उपलब्ध होतील. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. आज घरातील अनेक दिवसांपासून थांबलेली कामे तुम्ही पूर्ण कराल. कुटुंबीयांबरोबर धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हा, ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. राजकारणात यश मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही केलेल्या गुंतवणुकीचा तुम्हाला फायदा होईल. आज व्यवसायात डीलच्या नवीन ऑफर मिळू शकतात. जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर तेही तुम्ही वेळेवर परत करा. आधी केलेल्या गुंतवणुकीचा पूर्ण लाभ आज तुम्हाला मिळेल. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. 

कर्क 

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत काही बदल करणं गरजेचं आहे, ज्यामुळे तुम्हाला खूप उत्साही वाटेल. तुमची संपत्तीही वाढेल. वडिलोपार्जित संपत्तीतूनही आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. नवीन वाहनही खरेदी करण्याचा योग आहे. खाण्यापिण्याच्या निष्काळजीपणा करू नका. विरोधकांपासून सावध राहा. तुमची सर्व कामे आजचा करा ती उद्यावर ढकलू नका. आज तुम्हाला मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. तुमच्या जोडीदाराकडून तुमच्यावर काही काम सोपवले जाईल, जे तुम्हाला नक्कीच पूर्ण करावे लागेल. घरातून बाहेर पडताना ज्येष्ठांच्या चरणस्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घ्या, तुमची सर्व कामे पूर्ण होतील.नोकरदार लोकांना नवीन नोकरीची ऑफर देखील मिळेल, ज्यामध्ये उत्पन्न अधिक असेल. राजकारणात यश मिळेल, नेत्यांना भेटण्याची संधी मिळेल. जे युवक स्पर्धेची तयारी करत आहेत, त्यांच्या मेहनतीला यश येईल. 

सिंह 

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्ही खूप दिवसांपासून घर, प्लॉट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यात तुम्हाला त्यात यश मिळेल. आत्मविश्वासाने परिपूर्ण व्हा आणि अतिउत्साह टाळा. मित्राच्या मदतीने नोकरीच्या संधी मिळू शकतात. नोकरदार लोकांना अधिका-यांकडून काही संधी मिळतील, त्यामुळे तुमच्या नोकरीत प्रगती होईल. उत्पन्नात वाढ होईल. कुटुंबात मांगलिक कार्यक्रम आयोजित केले जातील, ज्यामध्ये सर्व नातेवाईकांचे येणे-जाणे सुरू होईल. 

कन्या
 
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आहे. आज घरातील सदस्यांबरोबर पैसे कसे वाचवायचे हे शिकून घ्या जेणेकरून भविष्यात तुम्हाला फायदा होईल. आज कुटुंबातील एखाद्या सदस्याबरोबर एखाद्या गोष्टीवरून वादाची परिस्थिती उद्भवू शकते, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या बोलण्यात गोडवा ठेवावा लागेल आणि जास्त राग टाळावा लागेल. आज तुम्हाला तुमच्या मुलांमुळे आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. मित्रांचे सहकार्य मिळेल. मित्रांच्या माध्यमातून उत्पन्नाच्या संधी उपलब्ध होतील. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल.

तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसाय करणारे लोक व्यवसायातील रखडलेल्या योजना पुन्हा सुरू करू शकतील, ज्यामध्ये तुमचे मित्र तुम्हाला मदत करतील. मित्रांद्वारे तुम्ही नवीन लोकांच्या संपर्कात याल ज्यातून तुम्हाला नफा होईल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुणाच्या तरी मदतीने तुमचे रखडलेले पैसेही मिळतील. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर प्रेमळ क्षण घालवाल. कुटुंबातील सदस्यांबरोबर बसून आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करा. ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. मनःशांतीसाठी धार्मिक कार्यक्रमात थोडा वेळ घालवा. 

वृश्चिक 

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्या इतर दिवसांपेक्षा खूप चांगला आहे. विद्यार्थी ज्या परीक्षेसाठी तयार करत होते त्यामध्ये त्यांना यश मिळेल. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. आज मुलाच्या आरोग्याबाबत तुम्हाला थोडी चिंता जाणवू शकते. आत्मविश्वासाने परिपूर्ण असा तुमचा दिवस असेल. तुमचं वैवाहिक जीवन तुम्ही अधिक सुखकर करण्याचा प्रयत्न कराल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कुटुंबातील सदस्यांसह एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याची योजना करा, जिथे सर्वजण खूप आनंदी दिसतील. जे घरापासून दूर शिकत आहेत, त्यांना कुटुंबाची आठवण येऊ शकते. आपल्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा. ज्यामध्ये तुमच्या आवडीच्या गोष्टी करा. 

धनु

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. नोकरीत यश मिळेल, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. रखडलेला पैसा तुम्हाला परत मिळण्याची चिन्हे आहेत. कौटुंबिक समस्या त्रासदायक असू शकतात. तुमच्या वैवाहिक जीवनात दुसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. बेरोजगारांना रोजगार मिळण्याचे संकेत आहेत. आज तुम्हाला तुमचा जुना मित्र देखील भेटू शकतो. ज्याच्यासोबत तुमच्या बालपणीच्या आठवणी ताज्या होतील. तुम्ही तुमचे सुख-दु:ख तुमच्या मित्रांसोबत शेअर करू शकता. विद्यार्थी स्पर्धेच्या तयारीसाठी मेहनत घेतील. परीक्षेच्या तयारीसाठी तुम्ही तुमच्या वरिष्ठांचीही मदत घ्या. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे.

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस अतिशय शुभ आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या कामात यश मिळेल. रिअल इस्टेट व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. जे घरबसल्या ऑनलाइन काम करतात, त्यांना चांगला फायदा होईल. प्रॉपर्टी डीलिंगचे काम करणार्‍यांना चांगली डील मिळू शकते ज्यातून त्यांना फायदा होईल. व्यवसाय करणारे लोक व्यवसायाला पुढे नेण्यात यशस्वी होतील. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. स्वतःसाठी थोडी खरेदी करा. जोडीदाराकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळेल. घरात मांगलिक कार्यक्रम आयोजित केले जातील. घरी पाहुण्यांची ये-जा असेल. 

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला जाणार आहे. नोकरीत यश मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही नोकरीशी संबंधित कामे मोठ्या समर्पणाने आणि मेहनतीने करताना दिसाल. वरिष्ठ तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक करतील. नवीन वाहनाचा आनंदही मिळेल. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित केले तर यश आणि प्रतिष्ठा तुमचीच असेल. तुमचा आत्मविश्वास अधिक वाढेल. कामाच्या ठिकाणी काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. खर्च वाढतील पण आर्थिक स्थिती मजबूत राहील. ऑनलाईन काम करणाऱ्यांना चांगला फायदा होईल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. भाऊ-बहिणीच्या उच्च शिक्षणासाठी तुम्ही तुमच्या ओळखीच्या लोकांशी संवाद साधा.

मीन

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. तुम्ही काही नवीन काम करण्याची योजना करत असाल तर त्यात तुम्हाला यश येईल ज्यामध्ये तुमचे मित्र तुम्हाला मदत करतील. तुमची रखडलेली कामे आज पूर्ण होऊ शकतात. जर कोणी तुमचे पैसे घेतले असतील तर तेही तुम्हाला आज परत मिळण्याची शक्यता आहे. आज घरात शुभवार्ता ऐकायला मिळू शकते. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. घर, प्लॉट खरेदी करण्याची इच्छा असेल तर हा योग चांगला आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 15 June 2023 : सिंह, तूळ, धनु, कुंभ राशीच्या लोकांनी आज 'या' चुका करू नका; जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Baba Vanga: बाबा वेंगाच्या 'नोव्हेंबर 2026' भविष्यवाणीची जोरदार चर्चा! 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर? पैसा, नोकरी, प्रेमात 'असे' बदल, तुमची रास?
बाबा वेंगाच्या 'नोव्हेंबर 2026' भविष्यवाणीची जोरदार चर्चा! 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर? पैसा, नोकरी, प्रेमात 'असे' बदल, तुमची रास?
Dhanteras 2026: धनत्रयोदशीला 'धणे' पूजनाला मोठं महत्त्व? का करतात धणे पूजन? पूजनाची योग्य पद्धत, धार्मिक महत्त्व, परंपरा...
धनत्रयोदशीला 'धणे' पूजनाला मोठं महत्त्व? का करतात धणे पूजन? पूजनाची योग्य पद्धत, धार्मिक महत्त्व, परंपरा...
November 2026 Horoscope: नोव्हेंबर महिना 12 राशींसाठी कसा जाणार? दिवाळीत ग्रहांचे पॉवरफुल योग, कोणाला धनलाभ? कोणाला टेन्शन, मासिक राशीभविष्य...
नोव्हेंबर महिना 12 राशींसाठी कसा जाणार? दिवाळीत ग्रहांचे पॉवरफुल योग, कोणाला धनलाभ? कोणाला टेन्शन, मासिक राशीभविष्य...
Diwali 2026: दिवाळीत 'या' 2 दिवशी भरा कुलदेवतेची ओटी! दिवाळीत कुलदेवतेच्या पूजेची योग्य पद्धत, काय काळजी घ्याल? धार्मिक मान्यता, परंपरा...
दिवाळीत 'या' 2 दिवशी भरा कुलदेवतेची ओटी! दिवाळीत कुलदेवतेच्या पूजेची योग्य पद्धत, काय काळजी घ्याल? धार्मिक मान्यता, परंपरा...

व्हिडीओ

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Police Security: पुणे पोलीस आयुक्तालयाचा मोठा निर्णय; विद्यानंद बापटांसह 'या' व्यक्तींचे पोलीस संरक्षण काढलं, तर फरार राणा सूर्यवंशी अन् लक्ष्मण हाकेंचं संरक्षण 'जैसे थे'
पुणे पोलीस आयुक्तालयाचा मोठा निर्णय; विद्यानंद बापटांसह 'या' व्यक्तींचे पोलीस संरक्षण काढलं, तर फरार राणा सूर्यवंशी अन् लक्ष्मण हाकेंचं संरक्षण 'जैसे थे'
Sanjay Raut: उज्ज्वल निकमांनी केलं टोरेंट पॉवर प्रकल्पाचं समर्थन ; संजय राऊतांनी व्यक्त केला संताप; म्हणाले, '10 झाडं म्हणजे एक कसाब, अब्रुची लक्तरे...'
उज्ज्वल निकमांनी केलं टोरेंट पॉवर प्रकल्पाचं समर्थन ; संजय राऊतांनी व्यक्त केला संताप; म्हणाले, '10 झाडं म्हणजे एक कसाब, अब्रुची लक्तरे...'
बंडखोरी, मतभेदाच्या राजकारणानंतर छत्रपती संभाजीनगर पदवीधर निवडणुकीसाठी 41 उमेदवारांचे भवितव्य पणाला; कोण होणार गुलालाचा मानकरी?  
बंडखोरी, मतभेदाच्या राजकारणानंतर छत्रपती संभाजीनगर पदवीधर निवडणुकीसाठी 41 उमेदवारांचे भवितव्य पणाला; कोण होणार गुलालाचा मानकरी?  
Pune Maharashtra Vidhan Parishad Result 2026 : गोकुळप्रमाणे पुणे शिक्षकच्या मतमोजणी केंद्रावर सापडली चिठ्ठी; शिक्षकानं लिहलं, 'आम्हाला कुणी विकत घेऊ शकत नाही, जुनी पेन्शन योजना लागू करा नाहीतर बघा...'
गोकुळप्रमाणे पुणे शिक्षकच्या मतमोजणी केंद्रावर सापडली चिठ्ठी; शिक्षकानं लिहलं, 'आम्हाला कुणी विकत घेऊ शकत नाही, जुनी पेन्शन योजना लागू करा नाहीतर बघा...'
Ram Purnekar and Eknath shinde: साहेब नाही, माझी वडील गेलेत...; राम पूर्णेकर ढसाढसा रडला, पोलिसांनी रिक्षात कोंबले; ठाण्यात हायव्होल्टेज ड्रामा, VIDEO
साहेब नाही, माझी वडील गेलेत...; राम पूर्णेकर ढसाढसा रडला, पोलिसांनी रिक्षात कोंबले; ठाण्यात हायव्होल्टेज ड्रामा, VIDEO
Pune Vidhan Parishad Election Result 2026 : पेन डायऱ्या बाहेर काढून ठेवायला लावल्या, गाडीची चावीही, अन् घड्याळावरून वाद, नेमकं काय-काय बाहेर ठेवायला सांगितलं? मतमोजणीच्या पहिल्या तासात पुण्यात काय घडलं?
पेन डायऱ्या बाहेर काढून ठेवायला लावल्या, गाडीची चावीही, अन् घड्याळावरून वाद, नेमकं काय-काय बाहेर ठेवायला सांगितलं? मतमोजणीच्या पहिल्या तासात पुण्यात काय घडलं?
Bhimashankar Karjat Torrent Power Project: सह्याद्रीच्या कुशीतील टोरेंट पॉवर प्रकल्प नेमका कसा, वस्तुस्थिती काय?; उज्जवल निकम यांनी A टू Z सांगितलं!
सह्याद्रीच्या कुशीतील टोरेंट पॉवर प्रकल्प नेमका कसा, वस्तुस्थिती काय?; उज्जवल निकम यांनी A टू Z सांगितलं!
Gokul Chairman Election 2026: फडणवीसांच्या भेटीआधीच सतेज पाटलांची सर्वात मोठी चाल, गोकुळचं गणित बिघडण्यापूर्वीच हसन मुश्रीफांशी चर्चा!
फडणवीसांच्या भेटीआधीच सतेज पाटलांची सर्वात मोठी चाल, गोकुळचं गणित बिघडण्यापूर्वीच हसन मुश्रीफांशी चर्चा!
Embed widget