एक्स्प्लोर

Morning Headlines 18th August : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च, अहवाल आयोगाला सादर

Gujarat Elections: मागील वर्षी म्हणजे 2022 मध्ये झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने विरोधकांना धूळ चारत दणदणीत विजय मिळवला होता. या निवडणुकीत भाजपने किती पैसा खर्च केला होता हे आता उघड झालं आहे. या खर्चाचा संपूर्ण हिशेब पक्षाने निवडणूक आयोगाकडे सादर केला आहे. भाजपने 2022 च्या विधानसभा निवडणुकीत 209 कोटी रुपयांपेक्षा अधिक पैसा खर्च केला आहे. वाचा सविस्तर

दिल्लीत शेट्टींनी घेतली गडकरींची भेट, इथेनॅालच्या किंमतीसह साखर निर्यातीच्या धोरणावर मार्ग काढण्याची मागणी 

Raju Shetti : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी शेट्टींनी शेती प्रश्नाच्या विविध मुद्यांवर त्यांच्याशी चर्चा केली. तसेच इथेनॅालच्या किंमत वाढीसह साखर निर्यातीच्या धोरणावर केंद्र सरकारनं मार्ग काढावा अशी मागणी देखील राजू शेट्टींनी मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. वाचा सविस्तर

तेल कंपन्यांकडून आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जारी; एक लिटर पेट्रोलसाठी किमती पैसे मोजाल?

Petrol Diesel Rate on 18th August 2023: आधीच महागाईनं त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांचं लक्ष आता पेट्रोल-डिझेलच्या किमतींकडेच लागलं आहे. पेट्रोल-डिझेलचे दर कमी झाले की, नाही? महागड्या इंधन दरांपासून सुटका झाली का? याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. अशातच देशातील तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. आज 18 ऑगस्ट, आजही देशातील महानगरांमधील पेट्रोल-डिझेलच्या किमती जैसे थे आहेत. देशातील काही जिल्ह्यांमध्ये मात्र पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये किरकोळ बदल पाहायला मिळत आहे. वाचा सविस्तर

तब्बल 9 वर्षांनंतर 'छोटा अमरनाथ यात्रा' पुन्हा सुरु होणार; सुरक्षेसाठी कडक व्यवस्था तैनात

Chota Amarnath Yatra 2023 : उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील 'छोटा अमरनाथ यात्रा' फार प्रसिद्ध आहे. ही यात्रा आता तब्बल 9 वर्षांनंतर पुन्हा सुरु होणार आहे. छोटा अमरनाथ यात्रा येत्या 31 ऑगस्टपासून सर्व भक्तांसाठी सुरु करण्यात येणार आहे. 'छोटा महाराजा यात्रा' 2013 मध्ये पंचवीस वर्षांच्या कालावधीनंतर सुरु झाली होती. पण, 2014 नंतर सुरक्षेच्या कारणास्तव ही यात्रा पुन्हा थांबवण्यात आली. वाचा सविस्तर

दिल्ली - बिहारमध्ये तापमानात वाढ, तर 'या' राज्यांमध्ये अलर्ट जारी; काय आहे हवामान विभागाचा अंदाज?

IMD Weather Update : देशभरातील अनेक राज्यांमध्ये हवामानात बदल झाले आहेत. काही राज्यांमध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे तर, तर काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. आज हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, राजधानी दिल्लीत हवामान चांगले असणार आहे. तर, 19 आणि 20 ऑगस्ट रोजी पावसाची शक्यता आहे. याशिवाय दिल्लीचे कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 28 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता वर्तवण्यात आहे. वाचा सविस्तर

मोठी बातमी! मुंबई विद्यापीठाची पदवीधर सिनेट निवडणूक अचानक स्थगित; विद्यार्थी संघटना संतप्त

मुंबई : मुंबई विद्यापीठाने पदवीधर मतदारसंघासाठी जाहीर करण्यात आलेल्या सिनेट निवडणुकीला पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. राजकीय पक्ष त्यासोबतच विद्यार्थी संघटनाकडून निवडणूक कार्यक्रम  स्थगित झाल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.  9 ऑगस्ट रोजी मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम मुंबई विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आला होता. मात्र दहा दिवसाच्या आतच सिनेट निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय आज घेण्यात आलेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आल्याचे परिपत्रक मुंबई विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आले आहे. वाचा सविस्तर

विजयदुर्गवर साजरा होणार 'जागतिक हेलियम दिवस', राज्य मंत्रिमंडळाची बैठक; आज दिवसभरात...

18th August Headlines : आज दिवसभरात महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने ओढ दिली. त्या पार्श्वभूमीवर आजच्या मंत्रिमंडळात चर्चा होण्याची शक्यता आहे. काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे विजयदुर्गवर 'जागतिक हेलियम दिवस' साजरा होणार आहे. विजयदुर्गवर हेलियमचा शोध लागला होता. तर, मुंबई विद्यापीठाने गुरुवारी रात्री अचानक सिनेट निवडणूक स्थगित केल्याने त्याचे पडसाद आज उमटण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर 

मेष, मिथुन सह 'या' राशींसाठी आजचा दिवस भाग्याचा; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

Horoscope Today 18 August 2023 : आज शुक्रवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार आज मिथुन राशीचे लोक कुटुंबीयांबरोबर चांगला वेळ घालवतील. तर, कुंभ राशीच्या लोकांना खूप उत्साही वाटेल, ज्यामुळे तुम्ही तुमची रखडलेली कामे पूर्ण करू शकाल. आजचा शुक्रवार मेष ते मीन राशीसाठी कसा असेल? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
Ahilyanagar Leopard Attack : गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी

व्हिडीओ

Ravindra Waikar Delhi : मुंबईत जलमेट्रो सुरू व्हायला हवी, राज्य सरकारकडून प्रस्ताव पाठवला जाईल
Majha Mahakatta : भारतीय संस्कारांचा अभिमान, शिक्षण क्षेत्रात काम, Yash Birla 'माझा महाकट्ट्यावर'
Kalyan Dombivali Rapido captain : कल्याणमध्ये रॅपिडो चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
Eknath Shinde On CIDCO : नवी मुंबईत सर्वसामान्यांसाठी घर घेणं झालं स्वस्त, सिडकोच्या घरांमध्ये सूट
Dombivli Pollution :  गुलाबी रस्ता आणि डोंबिवलीकर रागाने लाले लाल Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
Ahilyanagar Leopard Attack : गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
Dattaprasad Jadhav: 'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
Congress Rally Against SIR: व्होट चोर, गद्दी छोड! 'मतचोरीच्या' विरोधात काँग्रेसचा आज दिल्लीत रामलीला मैदानात एल्गार; राहुल गांधींसह प्रमुख नेते उपस्थित राहणार
व्होट चोर, गद्दी छोड! 'मतचोरीच्या' विरोधात काँग्रेसचा आज दिल्लीत रामलीला मैदानात एल्गार; राहुल गांधींसह प्रमुख नेते उपस्थित राहणार
Sunil Pal: एकेकाळचा कॉमेडी किंग सुनील पालची धक्कादायक अवस्था, स्वस्तातला शर्ट अन् गॉगल घालून इव्हेंटला पोहोचला, जावेद अख्तर समोर येताच...
एकेकाळचा कॉमेडी किंग सुनील पालची धक्कादायक अवस्था, स्वस्तातला शर्ट अन् गॉगल घालून इव्हेंटला पोहोचला, जावेद अख्तर समोर येताच...
Embed widget