एक्स्प्लोर
वसतिगृहातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग, मुख्याध्यापक, अध्यक्षासह चौघांना अटक
या अल्पवयीन मुलीसोबत वारंवार विनयभंगाचा प्रकार वाढला होता. याबाबतची माहिती सांगली पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी सदर मुलीला विश्वासात घेत चौकशी केली. यावेळी पीडित मुलीने सर्व हकीकत सांगितली.
सांगली : सांगलीतील एका मुलींच्या वसतिगृहात अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विनयभंग करणारा वाहनचालक आणि वसतिगृहाचा मुख्याध्यापक, वसतिगृह अध्यक्षासह चौघांना अटक करण्यात आली आहे. सांगलीच्या एका मुलींच्या वसतिगृहामध्ये एका वाहनचालकाकडून अल्पवयीन मुलीसोबत अश्लिल चाळे करून विनयभंग केल्याचा प्रकार घडला.
सदर वसतिगृहात संजय किणीकर नामक व्यक्ती वाहनचालकाचे करतो. तर त्याची पत्नी मध्यान्न भोजनाचे काम करते. संजय किणीकर हा या वसतिगृहात असणाऱ्या एक अल्पवयीन मुलीसोबत गेल्या काही दिवसांपासून अश्लील चाळे करून मुलीचा वारंवार विनयभंग करत असल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर सदर मुलीने संबंधित वसतिगृहाच्या मुख्याध्यापक आणि अध्यक्ष यांच्याकडे याबाबतची तक्रार दिली होती. मात्र या प्रकरणी कोणतीच कारवाई झाली नाही.
या अल्पवयीन मुलीसोबत वारंवार विनयभंगाचा प्रकार वाढला होता. याबाबतची माहिती सांगली पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी सदर मुलीला विश्वासात घेत चौकशी केली. यावेळी पीडित मुलीने सर्व हकीकत सांगितली. यानंतर सांगली पोलिसांनी संजय किणीकर, त्याची पत्नी तसेच वसतिगृहाचे मुख्याध्यापक आणि वसतिगृहाचे अध्यक्ष यांच्यावर गुन्हा दाखल करत चौघांना अटक केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement