Raj Thackeray : मनसेची परप्रांतीय विरोधक प्रतिमा पुसण्याचे प्रयत्न; राज ठाकरे योगी आदित्यनाथ यांची भेट घेण्याची शक्यता
MNS Raj Thackeray Ayodhya Visit : राज ठाकरे हे 4 मे रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
मुंबई: परप्रांतीय विरोधक अशी प्रतिमा पुसण्याचा राज ठाकरेंकडून जोरदार प्रयत्न सुरू असल्याचं चित्र आहे. राज ठाकरे हे 5 मे रोजी आयोध्यामध्ये जाणार असून त्या आधी 4 मे रोजी ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेण्याची शक्यता आहे. योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमधील धार्मिक स्थळांवरील भोंगे हटवण्याच्या निर्णयाचे राज ठाकरेंनी या आधी कौतुक केलं आहे.
उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी धार्मिक स्थळांवरील भोंगे हटवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबद्दल आता राज ठाकरे योगींची भेट घेऊन अभिनंदन करणार असल्याची चर्चा आहे. राज ठाकरे यांनी या आधीच्या सभेतही योगी आदित्यनाथ यांच्या कामाचे कौतुक केलं होतं.
राज ठाकरेंनी आता हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला आहे. जर हिंदुत्वाच्या मुद्द्याला घेऊन पुढे जायचं असेल तर हिंदी भाषिकांमध्ये सकारात्मक वातावरण आणि प्रतिमा निर्माण करणे आवश्यक आहे, जेणेकरून हे लोक आपल्याशी जोडले जातील अशी मनसेची रणनीती आहे. त्यामुळे हिंदी भाषिक नेत्यांच्या भेटीगाठी घेण्याची भूमिका आता मनसेने घेतली आहे. याचा फायदा हा मुंबई महापालिकेतील निवडणुकीत होईल असंही अनेकांना वाटतंय.
राज ठाकरेंची या आधीची प्रतिमा ही परप्रांतीय विरोधक अशी होती. राज ठाकरेंनी आता हिंदुत्वाची भूमिका घेतल्यानंतर परप्रातीय विरोधक ही प्रतिमा अडचणीची ठरणार आहे. त्यामुळे ही प्रतिमा पुसून काढण्यासाठी आता मनसेनं कंबर कसली असून राज ठाकरेंची योगी आदित्यनाथ