Javed Akhtar : श्रीराम आणि सीता हे फक्त हिंदूचे दैवत नाहीत, जो स्वत:ला हिंदुस्थानी समजतो त्या सर्वांचं दैवत; जावेद अख्तरांचं बेधडक वक्तव्य
मनसेच्या दीपोत्सवाचे उद्घाटन पटकथा लेखक सलीम खान आणि गीतकार जावेद अख्तर यांच्या हस्ते झाले. यावेळी ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर (Lyricist Javed Akhtar) यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.
Javed Akhtar : मी अशा देशात जन्मलो आहे की, ज्या देशात राम आणि सीता यांचा जन्म झाला आहे. श्रीराम आणि सीता हे फक्त हिंदूचे दैवत नाहीत, तर जो स्वत:ला हिंदुस्थानी समजतो, त्या सर्वांचं दैवत असल्याचे मत ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर (Lyricist Javed Akhtar) यांनी व्यक्त केलं. काही गोष्टी जरा खुल्या पद्धतीनं बोलल्या पाहिजेत असेही ते म्हणाले. मनसेच्या दीपोत्सवाचे उद्घाटन पटकथा लेखक सलीम खान आणि गीतकार जावेद अख्तर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी जावेद अख्तर बोलत होते. यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे व्यासपीठावर उपस्थित होते.
मनसेच्या दीपोत्सवाचे यंदाचे 11 वर्ष आहे. यंदाच्या दीपोत्सवाचे थाटात उद्घाटन झाले. यावेळी राज ठाकरे यांच्यासह अमित ठाकरे, अभिनेता रितेश देशमुख तसेच अनेक कलाकार उपस्थित होते. यावेळी जावेध अख्तर यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटेल की इथं जावेद अख्तर कसे. जावेद अख्तर नास्तिक आहेत आणि धार्मिक कार्यक्रमाला कसे येतात. पण राज ठाकरे माझे घनिष्ठ मित्र आहेत. राज ठाकरेंनी विरोधकाला बोलावले तरी ते येतील असे जावेध अख्तर म्हणाले. दरम्यान, यावेळी जावेद अख्तर यांनी राज ठाकरे यांचे आभार मानले. माझा जन्म श्रीराम आणि सीता यांच्या देशात झाला आहे. यावेळी बोलतना जावेद अख्तर यांनी रामायण आणि महाभारताचा देखील उल्लेख केला. रामकथा सीतेशिवाय पूर्म होऊच शकत नसल्याचे अख्तर म्हणाले.
मनसेच्या वतीने दरवर्षी दिवाळीत वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. शिवाजी पार्कवर होणाऱ्या दीपोत्सवाची मनसैनिक आतुरतेने वाट पाहत असतात. मनसेच्या दीपोत्सवाचं यंदा अकरावे वर्ष आहे. सलीम-जावेद (Salim-Jawad) यांच्या शुभहस्ते 'दिपोत्सव 2023'चं उद्धाटन झाले. सलीम खान (Salim Khan) आणि जावेद अख्तर (Javed Akhtar) या जोडीने आजवर अनेक कलाकृतींसाठी पटकथा लिहिल्या आहेत. बॉलिवूडमधील ही लोकप्रिय पटकथालेखन करणारी जोडी आहे. सलीम-जावेद यांनी 1970 मध्ये भारतीय सिनेसृष्टीत क्रांती घडवून आणली आहे. बॉलिवूडपट ब्लॉकबस्टर करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. सलीम-जावेद यांच्या लिखानाचा भारतीयांवर प्रभाव पडतो. 1970 मध्ये त्यांनी सामाजिक, आर्थिक, राजकीय अशा विविध विषयांवर भाष्य केलं. डॉन, सीता-गीता, मजबूर, क्रान्ती, त्रिशूल, शोले, मिस्टर इंडिया, शक्ति, जंजीर, शान, काला पत्थर, हाथी मेरे साथी, यादों की बारात, दीवार अशा अनेक सिनेमाचं लेखन सलीम-जावेद या जोडीने केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या: