एक्स्प्लोर

Radhakrishna Vikhe Patil : काँग्रेस नेतृत्वानं संन्यास घेऊन हिमालयात जावं, विखे पाटलांचा खोचक टोला, तर राऊत म्हणजे बिनबुडाचे गाडगे 

काँग्रेसच्या (Congress) नेतृत्वाने संन्यास घेऊन हिमालयात जावं असाच गुजरात विधानसभेचा निकाल (Gujarat Assembly Elections Result 2022) लागल्याचे वक्तव्य महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं.

Radhakrishna Vikhe Patil : गुजरातच्या (Gujarat) विकासाच्या मॉडेलवर पुन्हा एकदा मतदारांनी विश्वास दाखवला असल्याचे वक्तव्य राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केलं आहे. काँग्रेसच्या (Congress) नेतृत्वाने संन्यास घेऊन हिमालयात जावं असाच गुजरात विधानसभेचा निकाल (Gujarat Assembly Elections Result 2022) लागला आहे. त्यामुळं आता काँग्रेस पक्षाचं अस्तित्वच संपल्याचे विखे पाटील म्हणाले. गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील (Himachal) विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती येत आहेत. यावर विखे पाटील यांना प्रसारमाध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता ते बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली.

पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह यांचे विखे पाटलांनी केलं अभिनंदन 

गुजारतमध्ये भाजप आघाडीवर आहे. 150 हून अधिक जागांवर भाजपने गुजरातमध्ये आघाडी घेतली आहे. त्यामुळं तिथे सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टीनं भाजपची वाटचाल सुरु आहे. गुजरातच्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल विखे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे अभिनंदन केले. भाजपला गुजरातमध्ये 56 टक्के मतदान झालं आहे. हा देशाच्या इतिहासातील विक्रम असल्याचे विखे पाटील म्हणाले. गुजरातच्या विकासाच्या मॉडेलवर पुन्हा एकदा मतदारांनी विश्वास दाखवला असल्याचे पाटील म्हणाले.

हिमाचलमध्ये स्थानिक नेतृत्वाला पाहून काँग्रेसला मतदान 

गुजरातमध्ये जरी भाजप आघाडीवर असले तरी हिमाचल प्रदेशमध्ये मात्र, भाजप पिछाडीवर आहे. हिमाचलमध्ये काँग्रेसनं आघाडी घेतली आहे. तिथे भाजपला धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काँग्रेसनं भाजपला झटका देत हिमाचलमध्ये चांगलीच आघाडी घेतली आहे. याबाबत देखील प्रसारमाध्यमांनी विखे पाटलांनी विचारले. यावेळी ते म्हणाले की, हिमाचलमध्ये काँग्रेसचे नेतृत्व नव्हे तर स्थानिक नेतृत्वाला पाहून काँग्रेसला मतदान केले आहे. स्थानिक परिस्थितीवर आधारून काँग्रेसला हिमाचलमध्ये मतदान मिळाल्याचे विखे पाटील म्हणाले.

संजय राऊत म्हणजे बिनबुडाचे गाडगे

राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही जोरदार टीका केली. संजय राऊतांच्या आरोपांना काय उत्तर द्यावं. हे बिनबुडाचं गाडगं असल्याचा खोचक टोला विखे पाटलांनी लगावला. नॉन इशुला इशू करण्याचा त्यांचा केविलवाना प्रयत्न असल्याचे राऊत म्हणाले. भाजपाचा हा अश्वमेध आता निघाला आहे. महाराष्ट्राच्या आगामी सर्व निवडणुकांमध्ये भाजप आणि त्यांची आघाडीच सत्तेवर येईल याचा मला विश्वास असल्याचे पाटील म्हणाले.

पंजाबमध्ये आप चा अपघाताने विजय

पंजाबच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीचा अपघाताने विजय झाला असल्याचे विखे पाटील म्हणाले. काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदामुळं पंजाबमध्ये आपला संधी मिळाली. गुजरातमध्ये मात्र, आपची निशाणी मतदारांनी त्यांच्यावरच फिरवल्याचा टोला देखील विखे पाटलांनी लगावला.

महत्त्वाच्या बातम्या:

Himachal Pradesh Election : हिमाचलमध्ये भाजपला झटका, काँग्रेस आघाडीवर, कोण मारणार बाजी?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget