एक्स्प्लोर

 Maharashtra political crisis : आता लढाई कोर्टात! शिंदेंच्या बाजूने लढणार हरीश साळवे, तर ठाकरे सरकारकडून कपिल सिब्बल मैदानात 

 Maharashtra political crisis : बंडखोर आमदारांवर होत असलेल्या अपात्रतेच्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी एकनाथ शिंदे गटाकडून करण्यात आली आहे.

 Maharashtra political crisis : शिवसेनेविरोधात बंड करून ठाकरे सरकारच्या सत्तेला सुरूंग लावणाऱ्या एकनाथ शिंदे गटाने आता थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची कोर्टात बाजू मांडण्यासाठी नामांकित वकील हरीश साळवे मैदानात उतरले आहेत. तर महाविकास आघाडीच्या बाजूने जेष्ठ वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी असणार आहेत.  

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच आता शिवसेनेकडून होत असलेल्या अपात्रतेच्या कारवाई विरोधात शिंदे गट सुप्रीम कोर्टात गेला आहे. बंडखोर आमदारांवर होत असलेल्या अपात्रतेच्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. तसेच  अजय चौधरींच्या गटनेते पदाला शिंदे गटाचा आक्षेप असल्याची याचिका देखील कोर्टात दाखल करण्यात आली आहे. 

एकनाथ शिंदे गटाकडून सुप्रीम कोर्टात दोन वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. उद्या या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे. कोर्टाच्या या सुनावणीकडे आता  संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. 

एकनाथ शिंदे गटाला बजावण्यात आलेल्या अपात्रतेच्या नोटिसांना शिंदे गटाने हायकोर्टात आव्हान दिले आहे. याबरोबरच अजय चौधरी यांच्या नियुक्तीला देखील शिंदे  गटाने याचिकेद्वारे आव्हान देले आहे. शिवाय शिंदे गटाच्या आमदारांना पोलीस संरक्षण देण्याचीही याचिकेत मागणी करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे गटातील दोन सदस्यांची याबाबत सुप्रीम कोर्टात  याचिका दाखल केली आहे. 

शिंदे गटाकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेमार्फत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी शिवसेनेच्या बाजूनं कौल दिल्यामुळे त्यांच्या निर्णयाविरोधात थेट आव्हान दिले आहे. एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले या दोघांकडून दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. 

महत्वाच्या बातम्या

Maharashtra Political Crisis : शिंदे गट कसा अडकला कायद्याच्या चौकटीत; शिवसेनेने स्पष्ट सांगितले 

Maharashtra political crisis : ज्या यशवंत जाधव, प्रताप सरनाईकांची संपत्ती ईडीने जप्त केली त्यांना मोदी सरकारची Y+ सुरक्षेची बक्षिसी!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :15 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
Embed widget