Mhada Lottery: म्हाडाच्या सर्वच गटाच्या अनामत रकमेत होणार वाढ, म्हाडा उपाध्यक्षांसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येणार प्रस्ताव
म्हाडाने अत्यल्प गटासाठी 25 हजार रुपये, अल्प गटासाठी 50 हजार रुपये, मध्यम गटासाठी एक लाख रुपये आणि उच्च गटासाठी दीड लाख रुपये अशी अनामत रक्कम प्रस्तावित केली आहे.
MHADA Lottery : म्हाडाच्या सर्वच गटाच्या अनामत रकमेत वाढ होणार आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाने 2023 च्या सोडतीसाठी अत्यल्प आणि अल्प गटातील अनामत रक्कमेत कोणतीही वाढ करणार नसल्याचे जाहीर केले होते. आता मात्र मंडळाने घुमजाव करत अत्यल्प आणि अल्पसह सर्वच उत्पन्न गटाच्या अनामत रकमेत भरमसाठ वाढ प्रस्तावित केली आहे.
म्हाडाने अत्यल्प गटासाठी 25 हजार रुपये, अल्प गटासाठी 50 हजार रुपये, मध्यम गटासाठी एक लाख रुपये आणि उच्च गटासाठी दीड लाख रुपये अशी अनामत रक्कम प्रस्तावित केली आहे. यासंबंधिचा प्रस्ताव लवकरच म्हाडा उपाध्यक्षांसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. म्हाडाच्या सोडत प्रक्रियेत बदल करण्यात आला असून भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सोडतीनंतरची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन केली आहे. तर नव्या प्रक्रियेसह सोडत काढताना पुणे आणि कोकण मंडळाने अनामत रक्कमेत वाढ केली आहे. अनामत रक्कम वाढल्याने या दोन्ही मंडळाच्या सोडतीला कमी प्रतिसाद मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मुंबई मंडळाने मात्र मुंबईतील घरांच्या सोडतीतील अत्यल्प आणि अल्प गटाच्या अनामत रक्कमेत कोणतीही वाढ केली जाणार नसल्याचे जाहीर करीत या गटातील इच्छुकांना मोठा दिलासा दिला होता. मात्र त्याच वेळी मध्यम आणि उच्च गटासाठी वाढ केली जाईल, असेही मुंबई मंडळाने स्पष्ट केले होते.
आता मात्र मंडळाने घुमजाव केले आहे. मंडळाने आता मध्यम- उच्चसह अत्यल्प आणि अल्प गटाच्या अनामत रक्कमेत भरमसाठ वाढ प्रस्तावित केली आहे. मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अत्यल्प गटासाठीची अनामत रक्कम 10 हजार रुपयांवरून थेट 25 हजार रुपये, तर अल्प गटासाठीची अनामत रक्कम 20 हजार रुपयांवरून 50 हजार रुपये करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. मध्यम गटासाठी 2019 च्या सोडतीत 30 हजार रुपये अनामत रक्कम होती. आता मात्र ही रक्कम चक्क एक लाख रुपये करण्यात येणार आहे. त्याच वेळी उच्च गटाची अनामत रक्कम दीड लाख रुपये करण्याचे प्रस्तावित आहे.अनामत रक्कमेत वाढ प्रस्तावित आहे. उपाध्यक्षांची परवानगी मिळाल्यानंतर याबाबतचा अंतिम निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
म्हाडाची प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाईन
म्हाडाच्या (MHADA) घरांची सोडत आणि ताबा प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाईन होणार आहे. त्यामुळे या प्रक्रियेत यापुढे हस्तक्षेप होणार नाही. म्हाडाच्या घरांची व्रिक्री करण्यासाठी म्हाडाने आपल्या संगणकीय सोडत प्रणालीत महत्वपूर्ण बदल केले आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन ही सोडत प्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे सोडत आज्ञावली अधिक पारदर्शक, सुलभ आणि सुरक्षित झाली आहे. म्हाडाच्या घरासाठी अर्ज करण्यापासून ते ताबा मिळेपर्यंतची संपूर्ण संपूर्ण प्रक्रिया आता ऑनलाईन करण्यात आली