एक्स्प्लोर
मंत्र्यांचा फोन न घेतल्याला वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांचे निलंबन रद्द
एकाच वेळी अनेक रुग्ण महाविद्यालयात आले त्यावेळी डॉक्टर आणि स्टाप रुग्णांची परिस्थिती हाताळत होते काहींची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांची त्यांच्यावर उपचार करताना तारांबळ सुरू होती.
यवतमाळ : महाविकास आघाडी सरकारमधली मंत्र्याचा फोन उचलला नाही म्हणून निवासी डॉक्टरवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. यामध्ये एका नर्सला आणि दोन वॉर्ड बॉयला मेमो देण्यात आला होता. त्याच प्रकरणी आज पडदा पडला असून डॉक्टरांचे निलंबन महाविद्यालय प्रशासनाने मागे घेत असे वर्तन पुढे होणार नाही अशी सूचना ताकीद विद्यार्थ्यांना देऊन निलंबन मागे घेतले आहे, असे महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांनी सांगितले आहे.
यवतमाळच्या स्व. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये 3 फेब्रुवारी रोजी विषबाधेचा रुग्ण महाविद्यालयामध्ये दाखल झाला होता. या रुग्णाच्या नातेवाईकांनी उपचार योग्य होत नसल्याच्या संभ्रमावरून ठाकरे सरकार मधील मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांना थेट फोन लावला. दरम्यान संजय राठोड यांनी नातेवाईकाच्या फोन वरून डॉक्टरला फोन देण्यासाठी सांगितले. मात्र डॉक्टर तिथे असलेल्या रुग्णांवर शर्थीचे प्रयत्न करीत उपचार करीत होते.
Hinganghat Women Ablaze | शाळेपासून मुलींना सेल्फ डिफेन्स शिकवण्याची गरज : विद्या चव्हाण | ABP Majha
दरम्यान राजकीय वशिला घेऊन आलेल्या व्यक्तीने त्या वेळेस डॉक्टर यांना भाऊचा फोन आहे सांगितले. मात्र रुग्णांवर उपचार करीत असलेल्या डॉक्टर यांनी विषबाधेच्या रुग्णावर उपचार सुरू असल्याने तिथे भाऊ चा फोन म्हणजे नेमका भाऊ कोण हे समजू शकले नाही नंतर बोलतो असे सांगितले. तसेच तुमच्या भाऊला रुग्णालयात घेऊन या असेही उत्तर दिले. तो आवाज पालकमंत्र्यांनी ऐकल्याने भाऊने या प्रकरणी लोकप्रतिनिधीशी सौजन्याने आणि सौहार्दपूर्ण वागणे अपेक्षित असतांना तसा संवाद साधण्याची गरज असताना ते झाले नाही म्हणून या संदर्भात कारवाई करण्याचे वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाला सांगितले होते.
लोकप्रतिनिधी यांच्याशी सौजन्याने संवाद साधण्याची गरज असतांना सौहार्दपूर्ण वागणे अपेक्षित असतांना असभ्य वर्तन केल्या प्रकरणी निवासी डॉक्टर याला 8 दिवसासाठी निलंबित केले होते तर तिथे उपस्थित असलेल्या 1 महिला नर्स आणि 2 पुरुष नर्सला कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
संबंधित बातम्या :
ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचा फोन न घेतल्यानं एक डॉक्टर निलंबित तर तीन कर्मचाऱ्यांना मेमो
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement